B. R. Chopra : ‘गुमराह’चा आणि दिलीप कुमारच्या या प्रेम प्रकरणाचा
Amjad Khan : ‘ही’ भूमिका स्वीकारताना अमजद खानची द्विधा मनस्थितीत होती !
‘शोले’ (Sholay) चित्रपटातील अमजद खान (Amjad Khan) यांचा ‘गब्बर’चा रोल त्यांच्या सर्व भूमिकांमधील टॉपचा रोल म्हणावा लागेल. हा रोल त्यांना कसा मिळाला हे आता बहुतेक सर्व वाचकांना माहीत झाले आहे. सिप्पी यांनी या भूमिकेसाठी डॅनीला अलमोस्ट फायनल केले होते पण Feroz Khan यांच्या ‘धर्मात्मा‘ (Dharmatma) शूटिंगसाठी त्याला अफगानिस्तानला जायचे असल्याने त्याने ही भूमिका नाकारली.
अमजद खानची व्यवस्थित स्क्रीन टेस्ट झाली. मुंबईच्या चोर बाजारातून आणलेला लष्करी गणवेश चढवला. दाढी लावली. दात काळे केले. डायलॉग डिलिव्हरी ओके होती. अमजदचे सिलेक्शन झाले आणि त्याच दिवशी दुपारी त्याला पुत्र रत्न प्राप्त झाले. तो दिवस होता. २० सप्टेंबर १९७३. परंतु ही भूमिका स्वीकारताना अमजद खान (Amjad Khan) खूप डायलेमामध्ये होते, डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यांना ही भूमिका आपण करू शकतो की नाही याची खात्री वाटत नव्हती. त्यामुळे ते खूप नैराश्यात होते. या चित्रपटाची शूटिंग बेंगलोरजवळ होणार होती. निर्मात्याने अमजद खानकडे विमानाचे तिकीट पाठवले.
आदल्या दिवशी अमजद खान खूपच अस्वस्थ होते. ते घरात येरझारा घालत होतो आणि बेगमला सतत विचारत होते की ही भूमिका मी करू शकेल की नाही? त्यावर त्यांच्या पत्नीने सांगितले, ”नक्की करू शकाल. तुमचे अनेक प्ले मी पाहिलेले आहेत!” तेव्हा अमजद खान (Amjad Khan) म्हणाले की, ”नाटकात काम करणं वेगळं आणि सिनेमात काम करणं वेगळं.” त्यावर पत्नी म्हणाली, ”तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही चांगले कलाकार आहात. त्यामुळे टेन्शन सोडा. ही भूमिका तुम्ही शंभर टक्के चांगली करणार.” बेगमच्या या विश्वासाने त्यांना थोडी उभारी आली तरी पुन्हा पुन्हा ते आपल्या घरातील कुराणला आपल्या कपाळावर लावून अल्लाची आराधना करत होते. सकाळी उठल्यावर पुन्हा त्याने आपल्या डोक्यावर पवित्र कुराण ठेवले आणि तो अल्लाची प्रार्थना करू लागला. बेगमने ओळखले तो आतून घाबरला आहे. तिने सांगितले, ”तुम्ही चांगले अभिनेते आहात. तुमचे वडील मोठे अभिनेते आहेत. घाबरू नका. खुदा सब ठीक कर देगा.”
दुसऱ्या दिवशी विमानतळावर जाताना टॅक्सीमध्ये त्यांच्या मनात तीच उलझन होती ही भूमिका मला जमेल का? मी काम करू शकेल का? या कश्मकशमध्येच त्यांनी विमानात प्रवेश केला. विमानाने टेक ऑफ घेतला पण विमान बेंगलोरकडे गेलेच नाही त्यात एक तांत्रिक खराबी आल्यामुळे ते मुंबई शहरांवर घिरट्या मारत राहिले आणि काही वेळानंतर पुन्हा मुंबई एअरपोर्टवर लँड झाले. सर्व प्रवासी खाली उतरले. अमजद खान (Amjad Khan) ला हा थोडा अपशकुन वाटला. सुरुवातच ही अशी विचित्र झाली आहे त्यामुळे ही भूमिका आपल्याला जमणार नाही. या नैराश्याने पुन्हा त्यांना घेरले. सात आठ तास ते मुंबई एअरपोर्टवरच बसून राहिले. त्यांनी घरी फोन देखील केला नाही.
संध्याकाळी जेव्हा पुन्हा विमानाची दुरुस्ती झाली आणि विमान बेंगलोरकडे जायला निघाले; त्यावेळेला सर्व प्रवासी सुखरूप बंगलोर जायची प्रार्थना करत होते त्यावेळी मात्र अमजद खान (Amjad Khan) आपल्या पत्नी आणि एक महिन्याच्या मुलाची आठवण न काढता अल्लाकडे दुआ करत होते की मला सुखरूप घेवून जा, जर माझे काही बरे वाईट झाले किंवा ही भूमिका मला करता आली नाही तर ती भूमिका पुन्हा डॅनीकडे जाईल! अखेर बेंगलोरला विमान सुखरूप लँड झाले.
===============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
===============
अमजद खान (Amjad Khan) ला त्याच वेळी आत्मविश्वासा आला जेव्हा त्यांनी चित्रपटातील सुरुवात केली दोन-तीन शॉट कम्फर्टेबली दिले. त्याचा पहिला शॉट होता, ”कितने आदमी थे?” सुरुवातीला गब्बरच्या गेट अपमध्ये अवघडल्या सारखा असायचा, त्याला तंबाखू हातावर चोळायाची होती पण त्याला ही सवयच नव्हती त्यामुळे तो नर्व्हस व्हायचा. छायाचित्रकार द्वारका दिवेचा यांनी त्याला सेटवर कायम याच पोशाखात राहायला सांगितले. शॉट असो वा नसो. जयाच्या वडलांनी चंबळच्या डाकूंवर लिहिलेले पुस्तक तो सतत वाचत असायचा. त्यातून त्याने डाकूंच्या काही लकबी हेरल्या. ही आठवण अनुपमा चोप्रा यांनी मेकिंग ऑफ शोले या पुस्तकात दिली आहे.