हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?
हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच मराठी कलाकारांनी हिंदी कलाकारांच्या तोडीस तोड अभिनय केला… अभिनेत्री रिमा लागू (Reema Lagoo) यांच्यामुळे तर चक्क श्रीदेवी (Sridevi) यांना कॉम्लेक्स आला होता… तसंच काहीसं घडलं होतं अभिनेते अमोल पालेकर आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यामध्ये… एका मुलाखतीमध्ये अमोल पालेकर यांनी राजेश खन्ना यांना चक्क नरभक्षक कलाकार असं म्हटलं होतं… काय झालं होतं नेमकी आणि पालेकर काय म्हणाले होते? जाणून घेऊयात…
तर, ७०-८० च्या दशकात हिंदीत अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करणारे उत्कृष्ट काम हिंदीत केलं… यावेळी त्यांनी राजेश खन्ना यांच्यासोबतही स्क्रिन शेअर केली होती.. खरं तर, बरीच वर्ष इंडस्ट्रीत काम केल्यानंतर राजेश यांच्या पदरी अपयश आले होते…अशा या राजेश खन्ना यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव अमोल पालेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता…

अमोल पालेकर म्हणाले होते की, “मला नेहमीच वाटतं की, कोणत्याही अभिनेत्याला आणि खासकरुन राजेश खन्ना यांच्यासारख्या सुपरस्टारला, समोरचा अभिनेता किती छोटा आणि मी किती मोठा हे दाखवण्याची गरजच काय आहे? मी त्यांना नरभक्षक मानतो… राजेश खन्ना (Rajesh Khanna) असे अभिनेते होते जे समोरच्या कलाकाराला खुप कमी लेखायचे आणि स्वत:चं वर्चस्व दाखवायचे… हे करायची त्यांना काहीच गरज नव्हती… तुम्ही आहात सुपरस्टार तर आहात… मग तुम्हाला ते दाखवायची गरज का पडते की मी मोठा आहे…. तुमच्या अभिनयाची उंची तुम्ही स्वत: ठरवू शकत नाही ती कर्तृत्वाने दिसते… त्यामुळे मी त्यांना नरभक्षक अॅक्टर मानतो… अॅक्टरची शेवटची स्टेज येते तेव्हा त्याला याची जाण होते…”

चित्रपटाच्या एका सीनबद्दल सांगताना अमोल म्हणाले की, “मी तर राजेश खन्ना यांच्यासमोर त्या सीनमध्ये काहीच बोलत नव्हतो. माझा डायलॉगच नव्हता. त्यामुळे, हा अभिनेता किती छोटा आहे हे मी दुनियेला दाखवून देईन, असं वागण्याची गरज का वाटते का तुम्हाला? माझं करिअर छोटं दाखवून तुमची उंची वाढणार नाहीये. मी त्यावेळेला एक गोष्ट ठरवली की, मी स्वतःसोबत असं कधीच होऊ देणार नाही आणि कोणासोबत असं वागणार नाही.. त्यामुळे त्या इनसिक्योरिटीमुळे कदाचित त्यांना असं वाटत होतं असेल”…(Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
=================================
अमोल पालेकर यांनी १९८० मध्ये राजेश खन्ना यांच्यासोबत ‘आंचल’ या चित्रपटामध्ये काम केलं होतं. या सिनेमानंतर अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांच्यात वाद झाला होता.चित्रपटातील एका सीनमध्ये अमोल यांना गुडघ्यावर बसून राजेश यांची माफी मागायची होती आणि त्यानंतर राजेश त्यांना लाथ मारणार होते. मात्र, अमोल यांनी हा सीन करण्यास थेट नकार दिला होता… त्यांना असं वाटलं की, त्यांच्या भूमिकेला कमीपणा दाखवला जात आहे…. त्यानंतर दिग्दर्शक आणि राजेश खन्ना यांच्यात काही चर्चा झाली आणि अनिल गांगुली यांनी अमोल यांना सांगितलं की, तुम्हाला राजेश खन्ना यांच्या पायाजवळ बसायचं आहे. अमोल यांनी या सीनसाठी होकार दिला… ज्यावेळी हा सीन शूट होत होता तेव्हा दिग्दर्शकाने राजेश यांना लाथ मारण्याचा इशारा केला आणि नंतर अमोल पालेकर आणि राजेश खन्ना यांच्यात मतभेद निर्माण झाले होते….(Bollywood Gossips)