Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता असा मोगॅम्बो!
बॉलिवूड चित्रपटसृष्टीतीला पहिला साय-फाय चित्रपट म्हणून शेखर कपूर यांच्या ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India Movie) चित्रपटाची ओळख आहे… युनिक कथानकासह या चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं केलं होतं… खर तर चित्रपटात प्रेक्षकांना नायक सर्वात जास्त आवडतो… पण मिस्टर इंडिया चित्रपटातील खलनायक अर्थात मोगॅम्बो प्रेक्षकांना जास्त आवडला… चित्रपटात अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी मोगॅम्बोची भूमिका साकारली होती… पण तुम्हाला माहित आहे का अमरीश यांच्या ऐवजी हिंदीत दुसराच कलाकार ही भूमिका साकारणार होता… कोण होतो तो अभिनेता आणि अर्ध्यात त्या अभिनेत्या चित्रपटातून काढून का टाकलं होतं जाणून घेऊयात…

तर, १९८७ साली आलेल्या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत… त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला होता..कथानकाप्रमाणेच चित्रपटातील अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या भूमिका लक्षात राहिल्या, तसाच अमरीश पुरी यांनी साकारलेला मोगॅम्बोसुद्धा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मात्र,मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांच्या आधी अनुपम खेर (Anupam Kher) असणार होते. परंतु , त्यांना चित्रपटातून काढण्यात आलं होतं. याबद्दल स्वत: अनुपम खेर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

================================
हे देखील वाचा :Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!
=================================
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये अनुपम खेर यांनी या चित्रपटाची आठवण सांगताना म्हटलं होतं की,”जेव्हा मला ‘मिस्टर इंडिया’मधून काढून टाकलं आणि मोगॅम्बोच्या भूमिकेसाठी अमरीश पुरी यांना घेतलं, तेव्हा मला त्यांच्याविषयी मत्सर वाटला होता. तसंच मला स्वत:बाबत कमीपणा आणि वाईट वाटलं. मला का काढलं गेलं असा प्रश्न तेव्हा माझ्या मनात आला.”

पुढे खेर म्हणाले की, “मला मान्य आहे की हे अगदीच सहाजिक आहे. पण, ते मला आता समजत आहे. पण, त्या काळात मी स्वत:ला खूप कमी आणि दुर्लक्षित समजलं होतं. माझ्या डोक्यात सतत ‘तो रोल त्याला कसा काय मिळाला?’ हेच येत होतं.” दरम्यान, या आधीच्या एका मुलाखतीत अनुपम खेर यांनी असं सांगितलं होतं की, ‘मिस्टर इंडिया’चं बरंच शूटिंग झाल्यानंतर त्यांना चित्रपटातून काढण्यात आलं होतं. याबद्दल ते म्हणाले होते, “मोगॅम्बोची भूमिका आधी मला देण्यात आली होती, मात्र एक-दोन महिन्यांनी निर्मात्यांनी मला काढून अमरीश पुरी यांना घेतलं. चित्रपटातून काढून टाकल्यानंतर वाईट वाटणं सहाजिक आहे, पण जेव्हा मी ‘मिस्टर इंडिया’ पाहिला, त्यातील अमरीशजींचं काम पाहिलं, तेव्हा मला वाटलं की निर्मात्यांनी योग्य निर्णय घेतला.”
================================
हे देखील वाचा : Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!
=================================
‘मिस्टर इंडिया’ची आणखी एक खासियत म्हणजे हा चित्रपट चायनामध्ये हिट झाला होता. १९९० साली चायनामध्ये हा चित्रपट रिलीज झाला आणि भारतीय बॉक्स ऑफिसपेक्षा चालनामध्ये या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. अजून एक इंटरेस्टिंग बाब म्हणजे ‘मिस्टर इंडिया’मध्ये आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना कास्ट करण्याची चर्चा होती; पण त्यावेळी बच्चन राजकारणात जरा सक्रिय झाल्यामुळे ते शक्य झालं नाही आणि मुख्य नायकाची भूमिका अनिल कपूर यांच्याकडे गेली. मिस्टर इंडिया हा चित्रपट आजही हिंदीतील कल्ट क्लासिक चित्रपटांच्या यादीत आहे यात शंकाच नाही…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi