Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Amruta Khanvilkar पोहोचली केदारनाथला!
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) कायमच तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते… फिरण्याची प्रचंड आवड असणारी अमृता काही दिवसांपूर्वीच जपानला गेली होती… आणि आता अमृता थेट केदारनाथला पोहोचली आहे…(Marathi entertainment news)

उत्तराखंडमधील केदारनाथ (Kedarnath Temple) धामचे दरवाजे उघडण्यात आले असून दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक दर्शनासाठी निघाले आहेत. या भाविकांच्या गर्दीत काही सेलिब्रिटी देखील दरवर्षी जात असतात.. आता या यादीत अम-ता खानविलकरचं नाव अॅड झालं आहे…(Entertainment news)

अमृता खानविलकर सध्या उत्तराखंडमध्ये देवभूमी मानल्या जाणाऱ्या केदारनाथ धाम मध्ये पोहोचली आहे. केदारनाथ शिवलिंगाचं दर्शन अमृताने घेतलं असून सोशल मिडियावर तिने फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरमसाट कमेंट्स केल्या असून घरबसल्या तिच्या चाहत्यांना तिने केदारनाथचे दर्शन घडवल्यामुळे तिचं कौतुक केलं जात आहे…(Bollywood)
================================
हे देखील वाचा: अमृता खानविलकर…. हिंदीचं ग्लॅमर, मराठी ठसका
=================================
अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘सुशीला सुजीत’ चित्रपटात अमृता आणि गश्मीर एका गाण्यात झळकले होते.. याशिवाय हिंदीतही चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये अमृता उल्लेखनीय भूमिका सादर करताना दिसत आहे..लवकरच अमृता खानविलकर ‘ललिता बाबर’ या बायोपिकमध्ये आणि ‘कलावती’ या हॉरर-कॉमेडी चित्रपटात झळकणार आहे…(Amruta Khanwilkar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi