
Amruta Khanwilkar : योगा मॅटवर सूचलं नव्या घराचं नाव; काय आहे किस्सा?
‘चंद्रा ते चिऊताई’ असं ट्रान्झिशन प्रेक्षकांना देणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanwilkar) सध्या चर्चेत आहे. तिचं सुशीला सुजीत या चित्रपटातील आयटम साँग चिऊताई चिऊताई दार उघड सोशल मिडीयावर ट्रेण्डिंग आहे. एकीकडे तिचा मनोरंजनसृष्टीतील प्रवास सुखकर सुरु असताना तिने स्वत:च नवं घर घेऊन सगळ्यांनाच आनंदाचा धक्का दिला होता… तिच्या नव्या घराचं नाव फार विशेष असून त्या नावामागची कथा तिने एका मुलाखतीमध्ये सांगितली आहे.. काय आहे वाचा…(Amruta Khanwilkar)
==========
हे देखील वाचा : अभिनेत्री अमृता खानविलकरचा stylish look 😍😍
==========
अमृता खानविलकर हिने नुकतीच लोकमतला मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या घराचं नाव ‘एकम’ ठेवल्याचं सांगितलं. अमृता खानविलकर म्हणाली की, “माझ्या फ्लॅटची संपूर्ण टोटल ही १ येते. त्यामुळे एक हा नंबर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे यापूर्वी मी एका रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत होते आणि मला आठवतं त्याचा नंबर ७०३ होता. तिथे राहत असताना मला ‘वाजले की बारा’ हे गाणं मिळालं होतं. ते ते घर माझ्यासाठी माझं आयुष्य संपूर्णपणे बदलणारं घर होतं आणि मी कुठेही गेली की तिथे नंबर पाहिल्यानंतर माझ्या मनात त्याची टोटल किती असेल, असे पाहावेसे वाटते. ओके करून बघूयात आणि सुदैवाने असं झालं की मी छोटसं क्युट घर घेतलं आणि मग त्याची टोटल योगायोगाने एक आली”. (Bollywood masala)

पुढे अमृता म्हणते, “मी एक सर्टिफाइड योगा टीचर आहे त्याच्यामुळे मी मॅटवर असताना मी विचार करत होते की, प्लॅट नंबर वगैरे सगळं ठीक आहे पण आता आपण बंगला तर काही घेऊ शकत नाही. अगदी त्या बंगल्याचं नाव वगैरे द्यायला तर आता आपण हे घर घेतलंय तर त्याला पण एक छोटसं नाव देऊयात तर काय नाव असू शकतं आणि आमच्या सूर्यनमस्कारमध्ये आपण जेव्हा हात वर करतो तेव्हा त्याला ‘एकम’ असं म्हटलं जातं. मी म्हटलं हे छान आहे आणि हे मला त्या योगा मॅटवर सुचलेलं नाव आहे. त्यामुळे ‘एकम’ असं माझ्या घराला मी नाव दिलं आणि त्याचीही टोटल एकच आहे”. (Entertainment news)

दरम्यान, अमृताच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ललिता बाबर या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे.. याशिवाय आत्तापर्यंत अमृता ‘लाईक आणि सबस्क्राईब’, ‘पॉंडिचेरी’, ‘मलंग’, ‘सत्यमेव जयते’, ‘राझी’ (Raazi), ‘हिमंतवाला’, ‘साडे माडे तीन’ अशा मराठीसह हिंदी चित्रपटातही झळकली आहे. (Amruta Khanwilkar movies)