Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

Kishore Kumar यांनी गायलेल्या गाण्याच्या मेकिंगचा रंजक किस्सा!
भारतीय सिनेमाच्या क्षेत्रात पूर्वीच्या काळी एक निरोगी आणि निकोप अशी स्पर्धा होती. स्पर्धा नक्कीच होती पण एकमेकांचे पाय ओढणं नव्हतं उलट एकमेकांच्या कलाकृती बद्दल अभिमान असायचा आदर असायचा. त्यामुळेच त्या काळातील सर्व जण आपली चांगली कला प्रेक्षकांपर्यंत कशी पोहोचेल या प्रयत्नात असायचे. एखाद गाणं आपल्या प्रकृतीला सूट नाही असं वाटत असेल तर तो कलाकार ते गाणं स्वतःहून दुसऱ्या गायकाकडे देत असे! इतकं निकोप आणि चांगलं वातावरण त्याकाळी होतं.
याच काळातला हा एक किस्सा आहे. गायक किशोर कुमार (Kishore Kumar) एक गाणं गायला तयारच नव्हते पण अभिनेता आणि संगीतकारांनी ते गाणं त्यांना गायला लावलं. किशोरने ते गाणं गायलं आणि आज पन्नास वर्षे उलटून गेले तरी या गाण्याची जादू अद्यापही देखील कायम आहे. कोणता होता तो चित्रपट कोणतं होतं ते गाणं? आणि मुख्य म्हणजे किशोर कुमार ते गाणं गायला का तयार नव्हते? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे!

१९६९ साली आलेल्या ‘आराधना’ नंतर राजेश खन्नासाठी किशोर कुमार हे एक फिक्स कॉम्बिनेशन ठरले. त्यामुळे त्यांच्या पुढच्या सर्व चित्रपटांमध्ये प्रामुख्याने किशोर कुमार यांचाच स्वर राजेश खन्नासाठी वापरला जाऊ लागला. आन मिलो सजना, कटी पतंग या चित्रपटानंतर तर राजेश खन्ना आणि किशोर कुमार (Kishore Kumar) हे प्रेक्षकांचे देखील आवडीचे कॉम्बिनेशन बनले. अर्थात या काळातील सिनेमातील एखाद दुसरे गाणे रफी, मुकेश यांच्या स्वरात नक्की असायचे पण राजेशसाठी किशोर हाच त्या काळातील यशाचा मंत्र होता.
याच काळात दिग्दर्शक दुलाल गुहा एक कथानक घेऊन राजेश खन्ना यांना भेटायला गेले. यातील नायकाची भूमिका ही काहीशी ग्रे शेडची होती. राजेश खन्नाला कथानक तर आवडले पण हा चित्रपट चालेल की नाही याची मनात शंका निर्माण झाली. पण तरीही एक एक्सपरिमेंट म्हणून हा एक वेगळ्या प्रकारचा चित्रपट करावा असे त्यांना वाटले. परंतु त्यांनी दुलाल गुहा यांना सांगितले, “मी हा चित्रपट करायला तयार आहे पण या चित्रपटातील गाणी चांगली असावीत आणि माझ्यावर चित्रित सर्व गाणी किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायला हवीत!”

राजेश खन्नाच्या या दोन्ही अटी दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी मान्य केल्या. या चित्रपटात एकूण चार गाणी होती. दोन सोलो गाणी लताच्या आवाजात होती. (देखो देखो देखो दिल्ली का कुतुब मिनार देखो, बलम सिपाहीया) किशोर कुमार आणि लता यांच्या आवाजात एक युगलगीत होतं.’मैने देखा तुने देखा.. दुश्मन दुश्मन दोस्तो से प्यारा है’ ही तीन गाणी रेकॉर्ड झाली. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. (Bollywood mix masala)
चित्रपटाची स्टोरी थोडीशी वेगळी होती. यात नायक Rajesh khanna एक ट्रक ड्रायव्हर असतो आणि त्याच्या हातून एक अपघात घडतो त्यात एका शेतकऱ्याचा त्यात मृत्यू होतो. कोर्ट त्याला शिक्षा सुनावताना त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात दोन वर्ष राहण्याची सजा देते. ते कुटुंबीय त्याला दुश्मन म्हणून पुकारात असतात. परंतु दोन वर्षाच्या कालावधीत तो आपल्या प्रेमाने सर्वांना जिंकून घेतो! काहीसं वेगळं असं हे कथानक होतं.

या चित्रपटात आणखी एक गाणं होतं ते किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायचे ठरले होते. वस्तूतः ते कव्वाली सारखे गाणे होते. किशोर कुमारने तो पर्यंत कव्वाली फारशी कधी गायलेलीच नव्हती. त्यामुळे तो संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना म्हणाला, “हे काही रोमँटिक गाणे नाही किंवा डान्स नंबर नाही किंवा गंभीर देखील गाणे नाही त्यामुळे हे गाणं मी जाऊ शकत नाही हे गाण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे मोहम्मद रफी! तुम्ही त्यांना अप्रोच करा आणि त्यांच्याकडून गाणे गाऊन घ्या!” पण राजेश खन्नाने मात्र हे गाणे किशोर कुमार यांनीच गायला पाहिजे असं दिग्दर्शकाला सांगितलं होतं त्यामुळे तेच प्रश्न निर्माण झाला. डिस्ट्रीब्यूटर यांचा देखील किशोरच्या नावाचा आग्रह होता.
शेवटी संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल दिग्दर्शक दुलाल गुहा आणि राजेश खन्ना किशोर कुमार यांच्या घरी गेले आणि किशोर कुमारनेला विनंती केली. राजेश खन्ना म्हणाले, ”जर हे गाणे तू गाणार नसशील तर आपण हे गाणे चित्रपटातूनच काढून टाकू.” त्यावर किशोर कुमारने सांगितले, ”हे गाणे माझ्या प्रकृतीचे नाही. माझ्याकडून या गाण्याचा सत्यानाश होईल. या गाण्यासाठी रफी योग्य आहेत. तेव्हा कृपया हे गाणे तुम्ही रफी यांच्याकडून गाऊन घ्या!” पण राजेश खन्नाचा हट्ट एकच होता हे गाणे किशोर कुमारने गावे. त्यावर तोडगा असा निघाला की गाण्याची भरपूर रिहर्सल किशोरकडून करून घ्यायची गाणे रेकॉर्ड करायचे. (Untold stories)
==========
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
==========
सर्वांना योग्य वाटले तर सिनेमात ठेवायचे नाही तर पुन्हा आनंद बक्षी यांच्याकडून नवीन गाणे लिहून घ्यायचे आणि नवीन गाणे रेकॉर्ड करायचे. त्या पद्धतीने किशोर कुमारने (Kishore Kumar) मन लावून रिहर्सल केली आणि दुसऱ्या दिवशी रेकॉर्डिंग झाले, रेकॉर्डिंग झाल्यानंतर ते गाणे सर्वांनाच खूप आवडलं आणि ते गाणं चित्रपटात कायम राहिलं गाणं होतं ‘सच्चाई छुप नाही सकती बनावट के उसुलो से की खुशबू आ नही सकती कभी कागज के फुलो से मै इंतजार करू, ये दिल निसार करू मै तुझसे प्यार करू मगर कैसे ऐतबार करू झूटा है तेरा वादा वादा तेरा वादा ….’ किशोर कुमारने पहिल्यांदाच कव्वाली सदृश्य गाणे गायले होते आणि गाणे प्रचंड हिट झाले. किशोर कुमारला देखील आपण अशा प्रकारचे गाणे गाऊ शकतो याचा त्यांना आत्मविश्वास आला !