Yere Yere Paisa 3 : मराठी चित्रपटांसाठी महाराष्ट्रात पुन्हा ‘खळ्ळ

Tumbbad राही बर्वेने बनवला नाही तर….
२०१८ साली प्रदर्शित झालेला Cult Classic ‘तुंबाड’ (Tumbbad Movie) आजही सगळ्यांना लक्षात आहे… हस्तर हे Character तर प्रेक्षक कधीच विसरु शकत नाहीत. तुंबाडमध्ये आणखी एक गोष्ट खास होती ती म्हणजे राही अनिल बर्वे यांचं दिग्दर्शन ! या चित्रपटाचं शुटींग जवळपास ६ वर्ष सुरु होतं… आता चित्रपट रिलीज होऊन ७ वर्ष उलटली आणि अचानक या चित्रपटाचे Creative Director आनंद गांधी यांनी “मीच ‘तुंबाड’ चित्रपट दिग्दर्शित केला आहे”, असा गौप्यस्फोट केला आहे… नुकत्यात इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे. (Bollywood News)

आनंद गांधी ‘तुंबाड’ चित्रपटाबद्दल म्हणाले की, “‘तुंबाड’ चित्रपटाबद्दल मला एक गोष्ट प्रकर्षाने सांगाविशी वाटते ती अशी की मी तुंबाड चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे… जरी मला चित्रपटाच्या क्रेडिट्समध्ये माझ्या नावाचा उल्लेख क्रिएटीव्ह डायरेक्टर असं लिहिलं जरी असलं तरी सुरुवातीला जरी राही अनिल बर्वे याने ‘तुंबाड’चं दिग्दर्शन केलं होतं पण नंतर मी Take Over केलं. (Entertainment)

पुढे आनंद असं देखील म्हणाले की, “जेव्हा मी दिग्दर्शक म्हणून माझं काम करायला लागलो तेव्हा आधी केलेलं शुट मी स्क्रॅप केलं होतं… कारण, तुंबाड चित्रपटासाठी मी लेखक आणि निर्माता म्हणून सुरुवात केली होती… मात्र, नंतर ‘तुंबाड’ पूर्णपणे मीच दिग्दर्शित केला पण ठरल्याप्रमाणे राही अनिल बर्वेला दिग्दर्शक हे क्रेडिट दिलं आणि मी स्वत:ला क्रिएटिव्ह डायरेक्टर हे क्रेडिट घेतलं.
===============================
===============================
दरम्यान, ‘श्वास पाने’ या राही अनिल बर्वे यांच्या पुस्तकात त्यांनी स्वत: तुंबाड चित्रपटाच्या मेकिंगवेळी त्यांच्यात आणि आनंद गांधी यांच्यात मतभेद झाले होते याचा उल्लेख देखील केला आहे. त्यामुळे आता आनंद गांधी यांच्या वक्तव्यावर राही अनिल बर्वे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात ‘गुलकंद टेल्स’, ‘रक्त ब्रम्हांड’, ‘पहाडपांगिरा’, ‘पक्षीतिर्थ’ हे आगामी राही अनिल बर्वे यांचे प्रोजेक्ट्स भेटीला येणार आहेत. (Latest Bollywood News)