Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

‘भूल भुलैया ४’मध्ये Ananya Pandey ‘मंजुलिका’ बनणार?; कार्तिक आर्यनने शेअर केली ‘ती’ पोस्ट
प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूल भूलैय्या’ (Bhool Bhuliaya) हा चित्रपट २००७ मध्ये रिलीज झाला होता… अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या अभिनयाने आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनय आणि विनोदाने हा चित्रपट लोकप्रिय झाला… यानंतर या चित्रपटाचे २ भाग रिलीज झाले… ‘भूल भूलैय्या २’ आणि ३ यात अक्षय कुमारला कार्तिक आर्यनने रिप्लेस केलं… आणि आता लवकरच ‘भूल भूलैय्या ४’ येणार असं सांगितलं जात असून यात कार्तिक सोबत अनन्या पांडे दिसणार अशी शक्यता वर्तवली जात आहे…
दरम्यान, नुकताच अनन्या (Ananya Pandey) हिचा वाढदिवस झाला… यावेळी कार्तिक आर्यनने अभिनेत्रीसाठी एक खास पोस्ट शेअर केली. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त कार्तिकने चित्रपटाच्या सेटवरील एक पडद्यामागील कॉमेडी व्हिडीओ शेअर केला.

कार्तिकने(Kartik Aaruyan) शेअर केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला ‘भूल भुलैया ४’ असे लिहिलेले दिसते. व्हिडीओमध्ये अभिनेता अनन्याला चिडवताना दिसला, तर अनन्या म्हणते, ‘माझे गाणे.’ त्यावर कार्तिकने विचारले, ‘तुझे गाणे?’ यानंतर अनन्याने लगेच आपले शब्द बदलले आणि म्हणाली की ‘आमचे गाणे…’
अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हिडिओवर कमेंट करत चित्रपटाच्या चौथ्या भागात अनन्या पांडे ‘मंजुलिका’च्या भूमिकेत दिसू शकते असा अंदाज व्यक्त केला आहे… दरम्यान, असून मेकर्सने ‘भूल भुलैया ४’ बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता या कार्तिकने पोस्ट केलेल्या या व्हिडिओचा नेमका अर्थ काय आहे हे येत्या काळात लवकरच समजेल…
================================
हे देखील वाचा : गरोदर कॅटरिनाचे फोटो लीक; Sonakshi Sinha भडकली मीडियावर…
================================
तसेच, ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ बद्दल बोलायचे झाल्यास, कार्तिक आणि अनन्याचा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे… तर, श्रीलीलासोबतही कार्तिक आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं जात आहे… (Bollywood News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi