Angry Rantman: युट्यूबर अँग्री रँटमन उर्फ अभ्रदीप साहा यांचे वयाच्या २७ व्या वर्षी निधन
सोशल मीडिया सेन्सेशन आणि अँग्री रॅंटमॅन म्हणून ओळखले जाणारे युट्यूबर अभ्रदीप साहा आता आपल्यात नाही. अभ्रदीपच्या कुटुंबीयांनी बुधवारी ही माहिती दिली. अभ्रदीप साहा उर्फ अँग्री मॅन याचे 17 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी निधन झाले,सकाळी 10 वाजून 18 मिनिटांनी निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांच्या निधनाच्या बातमीवर चाहत्यांचा विश्वास बसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या बातमीवर विश्वास ठेवणे खूप कठीण झाले आहे. अभिदीप साहा हा केवळ 27 वर्षांचा होता. अँग्री रॅंटमॅन कोण होता? इतका प्रसिद्ध का होता? जाणून घेऊया.(Youtuber Angry Rantman Dies)
अभ्रदीप साहा मूळचा कोलकात्याचा असून तो कंटेंट क्रिएटर होता. त्याने 2017 मध्ये त्याच्या यूट्यूब चॅनेलच्या प्रवासाची सुरुवात केली आणि त्याचा पहिला व्हिडिओ “मी अॅनाबेलचा चित्रपट का पाहणार नाही” या अॅनाबेल चित्रपटावर होता. या व्हिडिओमध्ये तो ओरडत होता की त्याने कॉन्ज्युरिंगला कसे पाहिले आणि ते पाहून तो कसा घाबरला. अभिदीपचा हा पहिला व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला होता. आणि यानंतर त्याची फॅन फॉलोइंग वाढली.
अभ्रदीपच्या मृत्यूचे कारण मल्टीऑर्गन निकामी झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या महिन्यात त्यांना बेंगळुरूयेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया ही करण्यात आली होती. पण या आठवड्यात त्यांची प्रकृती खालावली आणि त्याला व्हेंटिलेटरवर ही ठेवण्यात आले. आणि अनेक अवयव निकामी झाल्याने युट्यूबर अभ्रदीप साहाचे निधन झाले.(Youtuber Angry Rantman Dies)
===================================
====================================
युट्यूबर अभारदीप साहाच्या इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबीयांच्या वतीने एक पोस्ट शेअर करण्यात आली , ज्यात लिहिले आहे की, ”अत्यंत दु:खाने आम्ही कळवत आहोत की अभ्रदीप साहा उर्फ अँग्री रँटमन यांचे निधन झाले आहे’. अभिदीपने आपल्या प्रामाणिकपणाने, विनोदाने आणि अढळ भावनेने लाखो लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आणि त्याला ओळखणार्या प्रत्येकाला त्याची खूप आठवण येईल.”