Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘मला माहीत नाही मी परत येईल की नाही…’ Neha Kakkar

Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले…

Shiv Thakare ‘या’ वर्षी करणार लग्न; स्वत:चं दिली वेडिंग अपडेट

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात येणार मोठा ट्विस्ट;

रणजीत गजमेर यांचे मादल वाद्य आणि त्यावरची R.D.Burmanची बेहतरीन गाणी!

Big Boss Marathi Season 6 च्या घरातील चावी चोराचा रितेश

Rajkumar Rao-Patralekha यांनी लेकीचं ठेवलंय ‘हे’ नाव, हिंदू संस्कृतीशी नावाचं

“Dilip Kumar यांनी पाकिस्तानातच राहाला जावं”; बाळासाहेब असं का म्हणाले

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

SHATAK : RSS शताब्दीच्या निमित्ताने ‘शतक’ चित्रपटाचा ट्रेलर मुंबईत प्रदर्शित!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

२८ जुलैपासून लागू होणार मनोरंजनाची ‘आणीबाणी’… 

 २८ जुलैपासून लागू होणार मनोरंजनाची ‘आणीबाणी’… 
kalakruti-anibani-marathi-movie-anibani-movie-to-hit-the-screens-soon-marathi-info
मिक्स मसाला

२८ जुलैपासून लागू होणार मनोरंजनाची ‘आणीबाणी’… 

by शुभांगी साळवे 27/06/2023

आणीबाणी हा शब्द आपल्यातील प्रत्येकाने ऐकलाच असेल.आता लवकरच आणीबाणी लागणार आहे असं तुम्हाला सांगितल तर. घाबरू नका कारण ही आणीबाणी मनोरंजनाची असणार आहे. आपल्या या समाजात कधी काय घडेल याचा नेम नसतो. आता हेच बघा ना आपल्या प्रत्येकाला ‘आणीबाणी’ साठी सज्ज होण्याचे फर्मान काढलं आहे. २८ जुलैपासून ही  ‘आणीबाणी’  लागू होणार आहे.आणि  विशेष म्हणजे या ‘आणीबाणी’ला मराठीतल्या काही कलाकारांनी जाहीर पाठींबा दिला आहे.उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, सयाजी शिंदे, संजय खापरे, वीणा जामकर, उषा नाईक, प्राजक्ता हनमघर, सीमा कुलकर्णी, रोहित कोकाटे, सुनील अभ्यंकर, पद्मनाभ बिंड, किशोर नांदलस्कर अशा मराठीतील दिग्गजांचा या ‘आणीबाणी’त सहभाग असणार आहे.या ‘आणीबाणी’चा जनतेला कोणताही त्रास न होता, फक्त आणि फक्त मनोरंजनाचा दिलखुलास आनंद अनुभवायला मिळणार आहे.कारण ही मनोरंजनाची ‘आणीबाणी’ असणार आहे. दिग्ग्ज कलाकारांची मोट एकत्र बांधत सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’साठी  पुढाकार  घेतला आहे.(Anibani Marathi movie)

Anibani Marathi movie
Anibani Marathi movie

‘दिनिशा फिल्म्स’ निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर बरंच काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखकाच्या सोबतीने  दाखवलं  आहे. आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही हलकी-फुलकी गोष्ट आहे. या चित्रपटातील नायकाच्या अभिमन्यूच्या अफलातून संघर्षाची. एखाद्या सरकारी आदेशाची अंमलबजावणी करताना होणाऱ्या गोंधळाची. नवरा बायकोच्या प्रेमाची आणि सोबत बाप लेकाच्या नात्याची. राजकीय परिस्थितीवर आपल्या मिश्किल लिखाणाने प्रहार करत लेखक अरविद जगताप यांनी आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर  ही रंजक कथा लिहिली आहे. ‘आणीबाणी’  कोणासाठी अडचण ठरणार? आणि अडचणीत सापडलेले या ‘आणीबाणी’ तून कसे बाहेर पडणार ? याची मनोरंजक कथा चित्रपटात  मांडण्यात आली आहे.

Anibani Marathi movie
Anibani Marathi movie

कृष्णा जगताप, योगेश शिंदे, सचिन जगताप, अमोल महाडिक ‘आणीबाणी’ चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा,पटकथा,संवाद अरविंद जगताप यांचे आहेत. गीतकार वलय मुळगुंद आणि प्रसन्न यांनी लिहिलेल्या गीतांना हरिहरन, अवधूत गुप्ते, आदर्श शिंदे, सायली पंकज, गणेश चंदनशिवे यांनी स्वरबद्ध केले आहे.(Anibani Marathi movie)

===========================

हे देखील वाचा: प्रशांत दामले, हृता दुर्गुळे, समीर चौघुले झळकणार ‘एका काळेचे मणी’ या धम्माल सिरीजमध्ये !

===========================

देवदत्त मनीषा बाजी, आदित्य पटाईत, पंकज पडघन यांनी संगीतसाज दिला आहे. पार्श्वसंगीत पंकज पडघन यांचे आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक तर कलादिग्दर्शन सुधीर सुतार यांचे आहे. साऊंड डिझाईनची जबाबदारी निखिल लांजेकर यांनी सांभाळली आहे. डी.आय, किरण कोट्टा आणि मिक्सिंग नागेश राव चौधरी यांनी केले आहे. छायांकन मंगेश गाडेकर यांनी  केले असून  संकलन प्रमोद कहार यांनी केले आहे. नृत्यदिग्दर्शक संग्राम भालकर आहेत. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anibani Marathi movie Entertainment marathi movie 2023 pravin tarade upendra limaye
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.