Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने ‘या’ कारणासाठी प्रेक्षकांचे आभार मानत
Anil Kapoor बॉलिवूडमधील चिरतरुण अभिनेते अनिल कपूर @67
बॉलिवूडमधील एव्हरग्रीन झक्कास अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) आज (२४ डिसेंबर) त्यांचा ६७ वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. त्यांना पाहून त्यांच्या वयाचा अंदाज लावणे निव्वळ अशक्य आहे. त्यांनी या वयातही त्यांचा फिटनेस कमालीचा जपला आहे. अनिल कपूर यांनी ८० आणि ९० च्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या प्रभावी अभिनयाचा डंका वाजवत मोठे नावलौकिक मिळवले. त्यांनी त्यांच्या जबरदस्त स्टाइलने बॉलिवूडवर राज्य केले किंबहुना आजही करत आहे. (Anil Kapoor Birthday)
कॉमेडी, ऍक्शन, इमोशनल, ट्रॅजेडी, खलनायक आदी सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी अगदी लीलया चित्रपटांमध्ये साकारल्या. अनिल कपूर यांनी या सिनेसृष्टीमधे अफाट यश मिळवले. अगदी सुपरस्टार (Superstar) अभिनेत्यांच्या श्रेणीमध्ये त्यांचे नाव घेतले गेले. आजही त्यांची क्रेझ प्रचंड आहे. मात्र हे एवढे यश मिळवणे त्यांच्यासाठी अजिबातच सोपे नव्हते. प्रचंड मेहनत, असंख्य प्रयत्न यांच्या जोरावर त्यांनी मोठे यश मिळवले.
आजही अनिल 2 तास जिममध्ये वर्कआउट करतात. सायकलिंग, जॉगिंग आणि मॉर्निंग वॉक करून ते स्वत:ला फिट ठेवतात. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला जवळपास चार दशके दिली आहेत, पण एवढा मोठा प्रवास करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते.
अनिल कपूर यांनी त्यांच्या चार दशकांच्या कारकिर्दीत फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. चित्रपटांव्यतिरिक्त अनिल कपूर यांनी वेब सीरिज (Webseries) आणि टीव्ही शोमध्येही आपली छाप सोडली. स्पॉटबॉय ते अभिनेते असा प्रवास केलेल्या अनिल कपूर यांनी चित्रपटाच्या थिएटरबाहेर ब्लॅकमध्ये चित्रपटांची तिकिटं देखील विकली. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा अभिनय प्रवास. (Bollywood Journey)
24 डिसेंबर 1956 रोजी मुंबईतील चेंबूर येथे अनिल कपूर यांचा जन्म झाला. तसे पाहिले तर अनिल कपूर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माता सुरेंद्र कपूर (Surendra Kapoor) आणि निर्मल कपूर (Nirmal Kapoor) यांचे चिरंजीव. सुरिंदर कपूर हे पृथ्वीराज कपूर (Pruthviraj kapoor) यांचे चुलत भाऊ होते. जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा काही वर्षे ते पृथ्वीराज कपूर यांच्या गॅरेजमध्ये राहिले. नंतर त्यांनी एका भागात एक खोली भाड्याने घेतली आणि तिथे ते बरेच वर्ष राहिले.
आर्थिक परिस्थिती खराब असूनही सुरिंदर कपूरने आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेतली. ते पृथ्वी थिएटरमध्ये (Pruthvi Theatre) काम करायचे. अनिल कपूर यांनी मुंबईतील लेडी ऑफ परपेचुअल सक्कौर स्कूल आणि सेंट जेवियर कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. अनिल कपूर यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले तेव्हा त्यांना समजले की त्यांचे वडील हृदयविकाराने त्रस्त आहेत.
या परिस्थितीमध्ये अनिल यांनी कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. अनिल नोकरी शोधू लागले. एके दिवशी ते एका चित्रपटाच्या सेटवर पोहोचले. तिथे त्यांना स्पॉटबॉय म्हणून काम मिळाले. यामध्ये कलाकारांना झोपेतून उठवणे, त्यांना विमानतळावर सोडणे आणि नंतर लोकेशनवर सोडणे अशी कामे त्यांना करायची होती.
पुढे काही काळाने अनिल कपूर कास्टिंग डायरेक्टरही (Casting Director) बनले. ‘हम पांच‘ (Hum Paanch) चित्रपटाचे कास्टिंग त्यांनी केले. या काळात त्यांच्या मनात अभिनय करण्याची इच्छा निर्माण झाली. यानंतर त्यांनी असे प्रोजेक्ट शोधायला सुरुवात केली ज्यात त्यांना अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळेल.
अनिल कपूर यांनी १९८० मध्ये तेलुगू चित्रपट ‘वंश वृक्षम‘मधून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. मात्र, याआधी ते १९७९ मध्ये दिग्दर्शक उमेश मेहरा यांच्या ‘हमारे-तुम्हारे‘ (Hamare Tumhare) या चित्रपटात कॅमिओमध्ये दिसले होते. अनिल यांनी मुख्य भूमिका १९८३ मध्ये रिलीज झालेल्या ‘वो सात दिन’ (Woh Saat Din) चित्रपटामध्ये केली होती. या चित्रपटानंतर अनिल यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अनिल कपूर यांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा हिट असे अनेक सिनेमे दिले. ‘बेटा’, ‘मिस्टर इंडिया’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘तेजाब’, ‘कसम’, ‘राम लखन’, ‘हमारा दिल आपके पास है’, लाडला’, ‘नायक’, ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘वेलकम’, ‘परिंदा’,’पुकार’,’ किशन कन्हैया’, ‘नो एंट्री’, ‘दिल धडकने दो’, ‘ताल’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
१९८६ मध्ये आलेला ‘चमेली की शादी‘ (Chameli Ki Shadi) हा पहिला बॉलीवूड चित्रपट होता ज्यामध्ये अनिल कपूर यांनी केवळ मुख्य भूमिकाच केली नाही तर चित्रपटाचे शीर्षक गीत देखील गायले होते. अनिल यांची गायक म्हणूनही ही पहिलीच वेळ होती. अनिल कपूर आणि श्रीदेवी (Anil Kapoor And Shridevi) यांची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली होती. दोघांनी जवळपास १६ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मिस्टर इंडिया हा त्यांचा सर्वात यशस्वी चित्रपट होता.
१९८४ साली त्यांनी मॉ़डेल सुनीता (Sunita) यांच्याशी लग्न केलं. त्याआधी ते रिलेशनशिपमध्ये होते. अनिल यांच्या आयुष्यातील एक काळ असा होता की त्यांचा खर्चही सुनीता यांनी उचलला होता. १९ मे १९८४ (19th May 1984) साली त्यांनी लग्न केले. हे दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले होते तेव्हा अनिल कपूर एक स्ट्रगलिंग अॅक्टर होता आणि सुनीता एक प्रसिद्ध मॉडेल होती.
अनिल आणि सुनीता अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अनिल यांना आर्थिक स्थिरता आल्यानंतर लग्न करायचे होते. अनिलला ‘जंग‘ (Jung) हा चित्रपट मिळाला त्यानंतर त्याने ठरवले की आता घर विकत घेऊन स्थायिक होऊ शकतो. त्यांनी त्यांनी सुनीता यांना फोन केला आणि सांगितले चल लग्न करू कारण उद्या नाही तर कधी नाही. दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ मे १९८४ रोजी दोघांचे लग्न झाले. लग्नाला फक्त १० लोक उपस्थित होते. आज अनिल आणि सुनीता यांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण झाली असून, त्यांना सोनम, रिहा आणि हर्षवर्धन (Sonam, Riha and Harshwardhan) ही तीन मुलं आहेत.
=====
हे देखील वाचा : दोन सुपरस्टार्सनी नकार दिल्यानंतर अनिल कपूरला मिळाला हा सिनेमा!
‘या’ चित्रपटासाठी अनिल कपूरने केला आपल्या प्राणप्रिय ‘मिशांचा’ त्याग; पण तरीही…
=====
अनिल सध्याच्या घडीला १८ मिलियन डॉलर अर्थात १३४ कोटींच्या (134 Crore) संपत्तीचे मालक आहेत. त्यांना महागड्या गाड्यांचाही शौक आहे. सध्या अनिल यांच्याकडे १६ लाखापासून १.७० कोटींपर्यंत किंमतीच्या गाड्या आहेत. त्यांनी ही संपत्ती चित्रपट तसेच जाहिरातींद्वारे कमावली आहे. अनिल कपूर हे एका चित्रपटासाठी ५ ते १० कोटी रुपये घेतात.
अनिल कपूर यांना ब्रँड एंडोर्समेंटसाठी ५० ते ५५ लाख रुपये मिळतात. सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याची फी १५ लाख रुपये आहे. अनिल कपूर यांच्याकडे मुंबईत तीन घरे आहेत. या तीन घरांची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये आहे. कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर अनिल कपूरकडे पोर्श, बेंटले, बीएमडब्ल्यू, जग्वार आणि ऑडी सारख्या कार आहेत.