‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Ankita Lokhande होणार आई? ; ‘लाफ्टर शेफ्स 2’च्या नव्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली!
Ankita Lokhande आणि विकी जैन ही जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या लग्नानंतर दोघांनी अनेकदा विविध शो आणि कार्यक्रमांमध्ये एकत्रित सहभाग घेतला आहे. आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे आणि यावेळी कारण आहे एक गोड बातमी , ती म्हणजे अंकिता गरोदर असल्याची शक्यता! नेटवर सध्या जोरदार व्हायरल होत असलेला ‘लाफ्टर शेफ्स 2’ या विनोदी शोचा प्रोमो यामागचं कारण आहे. या प्रोमोमध्ये दिसतं की, कृष्णा अभिषेक अंकिताच्या हातातून जेवण हिसकावतो आणि ती त्याच्या मागे धावते. अचानक ती आपलं पोट धरून थांबते आणि म्हणते, “मी गरोदर आहे!” हे ऐकताच सेटवर उपस्थित सगळ्यांना धक्का बसतो.त्यावर कृष्णा लगेच गंमतीत म्हणतो, “एक लल्ला होणार!” आणि करण कुंद्राही लगेच विचारतो, “हे खरंच आहे का?” ही मजेशीर पण गूढ अशी झलक पाहून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.(Ankita Lokhande Pregnant)

हा प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट होताच नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. ऐकाने कमेंट करत “जर हे खरंच असेल, तर खूप खूप शुभेच्छा!“लिहिल आहे तर अजुन एकाने “देव आशीर्वाद देवो, तुमचं कुटुंब पूर्ण व्हावं!“आणि “ती खरंच गरोदर आहे का?” अशा प्रकारच्या हजारो प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर दिसत आहेत. अर्थात, ही घोषणा खरोखरची आहे की केवळ शोसाठीचा भाग आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण चाहत्यांना मात्र या बातमीमुळे प्रचंड आनंद झाला आहे.

अंकिता आणि विकी यांचं लग्न डिसेंबर 2021 मध्ये थाटामाटात पार पडलं होतं. तेव्हापासून हे दोघं अनेक रिअॅलिटी शो, पुरस्कार समारंभ आणि सोशल मीडिया पोस्ट्समधून चर्चेत राहिले आहेत.अंकिता लोखंडे हिने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली. ‘अर्चना’च्या भूमिकेने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही प्रवेश केला आणि ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकली.(Ankita Lokhande Pregnant)
=====================================
======================================
तिने नुकतीच ‘बिग बॉस 17’ मध्येही भाग घेतला होता, जिथे तिची प्रामाणिकता आणि पारदर्शकतेमुळे ती चर्चेत राहिली. ‘लाफ्टर शेफ्स 2’ हा शो लवकरच ऑफ एअर होणार असल्याची माहिती मिळाली असून, या शेवटच्या टप्प्यावर अंकिताकडून आलेली ही सूचक घोषणा ही फक्त स्क्रिप्टचा भाग आहे की खऱ्या आयुष्यातील आनंदाची बातमी, हे लवकरच स्पष्ट होईल. तोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा ओघ सुरूच राहील यात शंका नाही.