
Ankush Chaudhari : ‘तोडी मिल फँटसी’ सारखं ब्रॉडवे नाटक करण्याची इच्छा!
वेगवेगळ्या माध्यमांमध्ये सक्रिय असूनही अनेक तरुण कलावंतांनी वाट धरली आहे ती रंगभूमीची. प्रयोगशीलतेबरोबरच काळ अवकाशाच्या अनेक शक्यता आपल्या नाट्यकृतीतून आजमावू पाहणारी सृजनशील युवा पिढी त्यांना पडणारे प्रश्न नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडत आहेत. रंगभूमीवर सध्या येत असलेले विषय तरुण पिढीला भावत आहहेत. ज्यावर संवाद घडण्याची गरज असते असे विषय हाताळले जात आहेत. अशाच काही सृजनशील युवा कलाकारांनी आणलेल्या ‘तोडी मिल फँटसी’ या रॉक म्युझिकल नाटकासासाठी अभिनेता अंकुश चौधरी आणि जिगीषा अष्टविनायक संस्थने सहकार्याचा हात पुढे केला आहे.

या नाटकाला सहकार्य करण्याबद्दल अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) म्हणाला, “माझ्या ‘ऑल द बेस्ट’ या एकांकिकेचे व्यावसायिक नाटक झालं आणि आजवर अनेक भाषांमध्ये त्याचे प्रयोग झाले. या एकांकिकेच व्यावसायिक नाटक व्हावे यासाठी ज्या दोन माणसांनी पुढाकार घेतला त्यातलं एक नाव म्हणजे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, दुसरं महेश मांजरेकर या दोन माणसांनी जो विश्वास दाखवला त्यामुळे हे शक्य झालं. नव्या उमद्या काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्यांसाठी मी काय करू शकतो? तर त्यांना सहकार्य करू शकतो, म्हणून हा सहकार्याचा हात”. (Bollywood tadaka)

गिरण्यांच शहर म्हणून मुंबईची ओळख होती. मुंबई बद्दलली गिरण्या इतिहासजमा होऊन त्यांची जागा आलिशान मॉल्स आणि पब्सनी घेतली. पूर्वीं गिरणी कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांची मूल आज त्याच मॉलमध्ये हाऊस किपिंगची काम करतात. मात्र आजूबाजूच्या चकचकीतपणाची भुरळ त्यांना पडल्याशिवाय रहात नाही. आणि जे खऱ्या आयुष्यात शक्य नाही ते स्वप्नात नक्की होऊ शकतं आणि इथेच जन्म घेते ती म्हणजे फॅन्टसी.. याच फॅन्टसी वर बेतलेलं गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणारं सुजय जाधव लिखित आणि विनायक कोळवणकर दिग्दर्शित ‘तोडी मिल फॅन्टसी’ नाटकचे नाटकाचे प्रयोग शुक्रवार १८ एप्रिल रात्रौ ८.३० वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे, १९ एप्रिल रात्रौ ८.३० वा. कालिदास नाट्यगृह मुलुंड, २० एप्रिल रात्रौ ८.३० वा. यशवंत नाट्यमंदिर माटुंगा या ठिकणी रंगणार आहेत. (Entertainment news)
===============================
हे देखील वाचा: Kajol : सनी देओलचा ‘गदर’ चित्रपट खरंच नाकारला होता का?
===============================
‘तोडी मिल फँटसी’ ही कथा आहे तीन मित्रांची – घंट्या, अम्या, शिऱ्या आणि त्यांच्या स्वप्नांची, ज्यांनी मुंबई ह्या स्वप्नांच्या नगरीमधे आपले जीवन व्यतीत केले आहे. ही कथा सुरू होते एका आलिशान रेस्टो-बारच्या वॉशरूममध्ये , जेव्हा त्या रात्री, जेव्हा घंट्या, अम्या आणि शिऱ्या त्यांच्या स्लम टुरिझम व्यवसायाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेणार असतात, तेव्हा ईशा सिंह नामक एक अत्यंत श्रीमंत मॉडेल, घंट्याच्या जीवनात अपघाताने प्रवेश करते आणि त्या सर्वांच्या जीवनात बदल घडतात. हे नाटक तुम्हाला एक संगीतमय प्रवास घडवते, तुम्हाला नाचवते, हसवते, रडवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरातील तुमच्या अस्तित्वाचा पुनर्विचार करायला लावते! या नाटकात शुभंकर एकबोटे, प्रमिती नरके, जयदीप मराठे, श्रीनाथ म्हात्रे, सुरज कोकरे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. मुंबईच्या या भूमिपुत्रांच्या फँटसीची गोष्ट नाट्य स्वरूपात उभी करण्याची संपूर्ण प्रकिया पुण्यात झाली आहे. या नाटकात रॅप, रॉक, मेटल, रेगे, कवाली अशा संगीताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर केला आहे. (Marathi natak)