‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या मंचावर अंकुश चौधरीला अश्रू अनावर
लहान मुलांमधील नृत्य कलेला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनीने ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनिअर्स’ चा हा कार्यक्रम सुरु केला. चिमुकल्यांच्या अंगात असलेली नृत्याची आग जगासमोर येत नाही. पण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक मुलांचं टॅलेण्ट समोर येत आहे. या कार्यक्रमात अभिनेता अंकुश चौधरी परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळतो. अंकुश यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला.अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. खानदेशच्या प्रथम बोरसे याने नृत्यातून साकारलेला आपला जीवनपट पाहून अंकुश चौधरी भावूक झाला. प्रथमने सादर केलेल्या परफॉर्मन्सच्या निमित्ताने अंकुश यांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. हा खास परफॉर्मन्स या आठवड्यात पाहायला मिळणार आहे.(Ankush Chaudhari)
मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाला प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळतेय. बच्चेकंपनीचे दमदार परफॉर्मन्सेस, फुलवा खामकर आणि वैभव घुगे यांचं मार्गदर्शन आणि सुपरजज अंकुश चौधरीचा सळसळता उत्साह यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. छोट्या दोस्तांचे असेच नवनवे परफॉर्मन्स या कार्यक्रमात पहायला मिळतात. ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष ज्युनियर्सचा’ या धमाकेदार डान्स रिऍलिटी शोमध्ये ४ ते १४ वयोगटातील स्पर्धकांना आपलं टॅलेण्ट सिद्ध करण्याची संधी मिळते.
या कार्यक्रमाची घोषणा करताना अभिनेता अंकुश चौधरी याने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर रिऍलिटी शोचा एक प्रोमो शेअर केला होता . या पोस्टमध्ये अग्निशमन अधिकाऱ्याच्या रुपात दिसत होता आणि मुलं त्यांच्या अंगात नृत्याची आग दाखवत आहेत अस दाखवण्यात आले होते. आणि अभिनेत्याने शोचा प्रोमो शेअर करत कॅप्शनमध्ये, ‘हा डान्स आहे की ह्याच्या अंगात आलंय??? येतोय ज्युनियर्सचा नवा कोरा डान्स शो. ‘मी होणार सुपरस्टार – जल्लोष ज्युनियर्सचा’ १८ फेब्रुवारीपासून, शनि-रवि रात्री ९:०० वाजता Star प्रवाह वर…’ असं लिहीलं होत. अंकुश ने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती आणि तेव्हापासूनच प्रेक्षक या तूफान कार्यक्रमाची वाट पाहत होते.त्याच बरोबर महत्त्वाचं म्हणजे या मंचावर फक्त स्पर्धकच नाही तर, जजेसही परफॉर्म करतात . ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा हा कार्यक्रम नवी ऊर्जा घेऊन येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक, स्पर्धकांसोबतच अंकुश चौधरी देखील प्रचंड उत्सुक आहे.अशी भावना अंकुश के व्यक्त केली होती.(Ankush Chaudhari)
==============================
हे देखील वाचा: ‘शेवट कधीच सोपा नसतो…! तू तेव्हा तशी मालिकेला निरोप देताना स्वप्निल जोशी भावूक
=============================
अखेर १८ फेब्रुवारी पासून या नव्या कोरया शो ची सुरुवात झाली. आणि खुप कमी वेळात या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमातील लहान लहान बच्चे कंपनीचा डान्स पाहुन थक्क व्हायला तर होतच पण भल्याभल्यांना त्यांचा डान्स पाहून घाम फुटेल असा त्यांचा परफॉर्मन्स असतो.