Astad Kale : ‘छावा’ वाईट चित्रपट; स्वतःच्याच फिल्मबद्दल आस्तादचं धक्कादायक

Ankush Chaudhari अंकुश चौधरीने शेअर केली अशोक सराफ यांच्याबद्दल खास पोस्ट
मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून अंकुश चौधरीला (Ankush Chaudhari) ओळखले जाते. अंकुशने नाटकं, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये काम करत त्याने स्वतःची एक सुपरस्टार अभिनेता अशी ओळख कमावली आहे. अंकुशने ऍक्शन, कॉमेडी, रोमँटिक आदी सर्वच प्रकारच्या चित्रपटांमधून काम करत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. सोशल मीडियावर तसा फारसा सक्रिय नसलेल्या अंकुशने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. (Ankush Chaudhari)
काही दिवसांपूर्वीच आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि प्रत्येक मराठी माणसाची शान आणि महाराष्ट्राचा गौरव असलेल्या अशोक सराफ (Ashok Saraf) यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर आमपासून खासपर्यंत सगळ्यांनीच सोशल मीडियावर व्यक्त होतानाआपला आनंद आणि भावना मांडल्या होत्या. अशातच आता अंकुश चौधरीने देखील अशोक सराफ यांच्याबद्दल त्याच्या आठवणींना उजाळा देत, त्यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)
अंकुशने त्याचा पहिला दिग्दर्शकीय सिनेमा असलेल्या साडे माडे तीन या सिनेमाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर करत लिहिले, “अशोक सराफ’ हे नाव आमच्या संपूर्ण पिढीच्या आठवणींशी जोडलेलं आहे. त्यांच्या सिनेमांचे ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ बघणं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस असायचा. त्यांच्या विनोदी टाइमिंगवर फिदा होणाऱ्या लाखो प्रेक्षकांमध्ये मीही होतो आणि आजही आहे. त्यांचे डायलॉग्स, त्यांची स्टाईल, अभिनयातली सहजता, त्यातील बारकावे पाहिले, की वाटायचं हे असं आपल्यालाही जमायला हवं. म्हणूनच मी प्रेक्षक, अभिनेता आणि आता दिग्दर्शक अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून त्यांच्याकडून खूप काही शिकत आलोय आणि अजूनही शिकतोय. (Ankush Chaudhri Post)
माझ्या करिअरच्या सुरुवातीला १९९५ मधे ‘सूना येती घरा’ या चित्रपटांत पहिल्यांदा अशोक सरांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी केवळ त्यांचा अभिनयच नाही, तर त्यांची सहजता, सेटवरील त्यांची ऊर्जा आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहून मी प्रभावित झालो होतो. त्यानंतर ‘साडे माडे तीन’च्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून त्यांच्याबरोबर काम करता आलं आणि आता २०२५ मधे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटासाठी आम्ही परत एकदा एकत्र काम केलंय. (Social News)
राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा मोठा सन्मान आहे. पण त्यासाठी कमाल मेहनत आणि कायम दिलखुलास राहण्याची वृत्ती या गोष्टी सोप्या नसतात. पण अशोक सराफ हे नाव याला अपवाद आहे. अशोक सराफ सर, तुमच्या कला प्रवासाला सलाम! महाराष्ट्राच्या हृदयात आधीपासूनच तुमचं अढळ स्थान होतं. आज त्यावर ‘पद्मश्री’ची मोहोर उमटली आहे. मनापासून अभिनंदन आणि खुप प्रेम!”
======
हे देखील वाचा : Abhishek Bachchan अनेक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर चमकले अभिषेक बच्चनचे नशीब, आज आहे कोट्यवधी संपत्तीचा मालक
Pranit More कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण; वीर पहारियावर विनोद करणे पडले महागात
======
अंकुशची ही पोस्ट साध्य खूपच व्हायरल होत असून, त्यावर कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळेच कमेंट्स करताना दिसत आहे. दरम्यान अंकुशच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकताच त्याचा वाढदिवस झाला. त्याच्या वाढदिवशी अंकुशने तीन नव्या चित्रपटाची घोषणा झाली. यात ‘महादेव’, ‘पी.एस.आय.अर्जुन’, ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ हे अंकुशचे तीन नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. याशिवाय तो त्याचा सुपरहिट सिनेमा साडे माडे तीन सिनेमाचा दुसरा भाग याचवर्षी प्रदर्शित होणार आहे.