Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Sairaj Kendre बालकलाकार साईराज केंद्रेने वर्षाच्या शेवटी पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना म्हटले धन्यवाद
२०२४ हे वर्ष आजपासून संपत असून, उद्यापासून २०२५ हे नवीन वर्ष सुरु होत आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी २०२४ हे वर्ष अनेक कारणांमुळे चांगले वाईट ठरले असेल. अनेक चढ उतार पार करून लोकं आज रात्रीपासून २०२५ मध्ये प्रवेश करणार आहे. (Sairaj Kendre)
त्यापूर्वी २०२४ या सालाने आपल्याला काय दिले काय नाही याचा मागोवा सगळेच घेत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे वर्ष त्यांच्यासाठी कसे होते याबद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात अनेक कलाकारांचा देखील समावेश आहे. (Marathi Serial NEws)
यातलाच एका कलाकार म्हणजे साईराज केंद्रे (Sairaj Kendre). ‘अप्पी आमची कलेक्टर‘ (Appi Amchi Collector) या मालिकेत बालकलाकराची (Child Artist) भूमिका साकारणाऱ्या साईराज केंद्रेने खूपच कमी वयात चांगलीच लोकप्रियता आणि प्रसिद्धी कमवली. ‘आमच्या पप्पाने गणपती आणला’ (Amchya Pappane Ganpati Anla) या गाण्यात दिसलेला साईराज अप्पी आमची कलेक्टर मालिकेमुळे मनोरंजनविश्वात आला आणि त्याचे जीवनच बदलून गेले.
साईराज केंद्रेने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एका पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने २०२४ (2024 year end) वर्षाने त्याला काय दिले याबद्दल लिहिले आहे. साईराजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “२०२४ नमस्कार, मी आपला लाडका साईराज केंद्रे म्हणजेच सिंबा. या सरत्या वर्षाने मला खूप काही दिलं. १८ एप्रिल २०२४ हा दिवस माझ्यासाठी खूप मोठा होता. कारण, म्हणजे माझा वाढदिवस आणि याच दिवशी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मला ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही माझी पहिली मालिका मिळाली. (Entertainment mix masala)
त्याचदिवशी आम्ही पहिलं शूट सिंहगड येथे केलं. तो दिवस आजही आठवतोय. सिंहगडाच्या शेकडो पायऱ्या चढून थकलेला मी जेव्हा शूटिंग लोकेशनला पोहोचलो तेव्हा समोरून आलेली पहिली हाक म्हणजे ये बबड्या…ती पहिली हाक म्हणजे माझ्या अप्पूमाँची… अप्पू माँ म्हणजे माझी सिरीयल मधली माझी आई…ती जरी खरी नसली तरी तीच प्रेम मात्र खऱ्या आईपेक्षा कमी नाहीये. ती माझे खूप लाड करते, मला फिरायला नेते आणि हो चुकलं तर ओरडते सुद्धा अगदी खऱ्या आईप्रमाणे… आणि याच दिवशी मला आणखी एक ओळख मिळाली ती म्हणजे सिंबा (अमोल).
‘झी मराठी’ आणि वज्र प्रोडक्शनच्या रूपात मला एक नवीन कुटुंब मिळालं. या गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलाला ही संधी दिली याबद्दल मी ‘झी मराठी’ आणि ‘वज्र प्रोडक्शन’चा कायम ऋणी राहील… २०२४ मध्ये अनुभवलेले काही आनंदी क्षण मी आज तुमच्याबरोबर शेअर करतोय.
१) १८ एप्रिल २०२४ रोजी मला कलाक्षेत्रामध्ये काम करण्याची पहिली संधी मिळाली.
२) झी मराठी, वज्र प्रोडक्शन आणि ‘अप्पी आमची कलेक्टर’च्या रूपात नवीन कुटुंब मिळालं.
३) रोहित पवार सरांसारखे गुरु मिळाले.
४) ज्या गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने माझी सगळीकडे ओळख झाली, त्याच गणपती बाप्पासाठी मला माझ्या आवाजातील माझ्या आयुष्यातलं माझं पहिलं गाणं गाण्याची संधी मिळाली.
५) झी मराठी २०२४… सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळाला.
६) ११ डिसेंबर २०२४ …गौरीसारखी छोटीशी बहीण माझ्या आयुष्यात आली आणि आमचं कुटुंब पूर्ण झालं. वर्ष येत राहतील जात राहतील पण आपलं प्रेम, आपली भावना आणि आपली श्रद्धा मात्र तशीच राहिली पाहिजे. माझ्या सर्व चाहत्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.”
============
हे देखील वाचा : Pran : प्राण यांच्या हिंदी सिनेमातील प्रवेशाचा भन्नाट किस्सा!
============
साईराजच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा देत आशीर्वाद दिले आहेत. मागच्यावर्षी सोशल मीडियावर ‘आमच्या पप्पाने गणपती आणला’ हे गाणे तुफान हिट झाले. या गाण्यात साईराज दिसला होता. तेव्हाच त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तो जेव्हा अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत पहिल्यांदा दिसला तेव्हा त्याच्या फॅन्सला खूपच आनंद झाला.
साईराज खूपच लाघवी आणि चांगला कलाकार आहेत. लहान वयात देखील त्याचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कॅमेऱ्यासमोर अगदी सहज वावरताना साईराज कुठेही नकली वाटत नाही. त्यामुळेच त्याच्यावर प्रेम करणार अनेक लोकं आहेत.