Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

अरे ओ सांभा….
मागच्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट म्हणजे रमेश सिप्पी यांचा ‘शोले’! या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराला विशेष ओळख मिळाली. अगदी छोट्यातील छोटी भूमिका करणारा कलावंत देखील जगभर प्रसिद्ध झाला. त्यापैकीच एक होता मॅकमोहन. ‘शोले’ चित्रपटात त्याने गब्बर सिंगचा साथीदार सांभाचा (sabma) रोल केला होता. संपूर्ण चित्रपटात त्याला एकच डायलॉग होता ‘पुरे पचास हजार….’ परंतु या एकमेव डायलॉग मुळे त्याला अभूतपूर्व अशी प्रसिद्धी मिळाली. आणि मॅकमोहन ची ‘सांभा’ (sabma) हीच आयडेंटिटी झाली. परंतु तुम्हाला माहित आहे का मॅकमोहनला सिनेमात यायचेच नव्हते. त्याला बनायचे होते क्रिकेटर. क्रिकेट खेळायला मिळेल म्हणूनच तो मुंबईमध्ये आला होता. परंतु नशिबाचे असे फेरे झाले की तो क्रिकेटपटू तर बनू शकला नाही पण सिनेमांमध्ये कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून त्याने चांगले नाव कमावले. दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅकमोहन ने ‘शोले’ हा चित्रपट प्रदर्शनानंतर तब्बल सहा महिन्यानंतर पाहिला होता! असं का घडलं होतं? याचं देखील एक मनोरंजक कारण आहे.त्याचाच हा किस्सा.

मॅकमोहन (sabma) याचे खरे नाव मोहन माखीजानी. त्याचा जन्म २४ एप्रिल १९३८ चा. पाकिस्तान मधील कराची इथला. वडील ब्रिटिश कालीन सैन्यातील मोठे अधिकारी. त्याचा जन्म झाल्यानंतर वडिलांची बदली कराची होऊन लखनऊला झाली. मोहन चे सर्व शिक्षण लखनऊ आणि मनाली येथे झाले. १९५२ साली त्याचे सर्व कुटुंबीय मुंबईत आले. कारण त्याच्या आईचे आजारपण वाढले होते आणि त्याच्या इलाजासाठी ते सर्व कुटुंब मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर मॅकमोहन याला खूप आनंद झाला. कारण ही त्याच्या दृष्टीने क्रिकेटमध्ये जाण्याची एक मोठी संधी होती.
मुंबईत शाळा आणि कॉलेजमध्ये तो क्रिकेटचा जबरदस्त सराव करत होता. शाळेच्या टीमचा तो कॅप्टन होता एक दिवस भारतीय संघाकडून आपण खेळूत याचा त्याला विश्वास होता. परंतु माणूस ठरवतो एक पण होतं भलतच. या काळात क्रिकेट सोबतच त्याला नाटकांमध्ये काम करण्याची देखील संधी मिळाली. एका नाटकांमध्ये त्याच्या आईची भूमिका शौकत आजमी यांनी केली होती. त्यांना त्याचा अभिनय आवडला आणि इप्टा च्या ‘इलेक्शन तिकीट’ या नाटकात त्यांनी त्याला भूमिका दिली. ही भूमिका फिल्मालय चे मुखर्जी यांनी बघितली त्यांना ती भूमिका खूपच आवडली. लगेच त्यांनी त्यांच्या एक्टिंग स्कूलमध्ये त्याला येण्याची निमंत्रण दिले. एक्टिंगचा विधिवत कोर्स पूर्ण केल्यानंतर मॅकमोहन यांना चेतन आनंद यांचा ‘हकीकत’ (१९६४) हा चित्रपट मिळाला. परंतू श्रेय नामावली मध्ये त्याचे नाव चुकून ब्रिजमोहन असे पडले! त्याचे मित्र त्याला मॅकी म्हणून बोलवत असे या मॅकी नंतर मॅक झाले आणि पुढे मोहन हा शब्द लागला. तो कसा? तर फिल्मफेअर मासिकाचे संपादक एल पी राव यांनी ‘हकीकत’ चे समीक्षण लिहिताना ब्रिजमोहन ऐवजी मॅकमोहन लिहिलं. आणि मॅकीचा मेकमोहन झाला. नंतर त्याने अनेक चित्रपटातून भूमिका केल्या. क्रिकेट हळूहळू आयुष्यातून जात राहिलं आणि सिनेमा या क्षेत्रात तो काम करू लागला. पण इथे देखील संघर्ष मोठा होता.

एका मुलाखतीत त्याने असे सांगितले होते की रोज तो टेरेसवर जाऊन वेगवेगळ्या अभिनेत्यांच्या आवाजात मोठमोठ्याने डायलॉग म्हणत असे याचा त्रास शेजाऱ्यांना होत असे. त्याच्या शेजारी ख्यातनाम दिग्दर्शक रघुनाथ झालानी राहत होते. त्यांनी त्याचे ते वेड पाहिले आणि आपल्या एका सिनेमात त्याला चक्क एका वेड्याच्या भूमिकेसाठी घेतले. ही भूमिका चांगलीच गाजली. रवी टंडन हे मॅकमोहन यांचे मेव्हणे. त्यांनी ‘अनामिका’ या चित्रपटात मॅकमोहनला मुख्य खलनायक म्हणून घेतले. त्याची ही भूमिका पाहूनच रमेश सिप्पी यांनी ‘शोले’ या चित्रपटात गब्बर सिंगचा साथीदार म्हणून त्याला भूमिका दिली. या भूमिकेत त्याला एका टेकड्यावर बसून गब्बर सिंग यांच्या सोबत संवाद साधायचा होता. या चित्रपटाचे संकलन होत असताना मॅकमोहन याची भूमिका बऱ्यापैकी कापली गेली. त्यामुळे मॅकमोहन म्हणून खूप नाराज झाला आणि तो ‘शोले’ च्या प्रीमियरला गेलाच नाही. तसेच पार्टीला देखील गेला नाही. तडक तो राजस्थानला निघून गेला.
=========
हे देखील वाचा : लोकप्रिय सिनेमाचे लेखक: गुलशन नंदा
=========
देशभर ‘शोले’ सुपरहिट झाला त्यानंतर मुंबई झाल्यानंतर लोक त्याच्याभोवती जमा होऊ लागले. त्याला लक्षात येत नव्हते लोक आपल्याकडे का पाहत आहेत. एकदा कुलाब्याला त्याच्याभोवती लोकांनी मोठा घोळका केला; आणि ‘अरे ओ सांभा’ ‘ अरे ओ सांभा’(sabma) म्हणून त्याला ओरडू लागले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपली ‘शोले’ तील भूमिका लोकांना आवडली आहे मग त्याने सहा महिन्यानंतर ‘शोले’ हा चित्रपट बघितला. थिएटरमध्ये आपल्या सोबत मॅकमोहन सांभा देखील आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोंधळ सुरू केला. थिएटरच्या मॅनेजरने मागच्या दाराने त्याला बाहेर काढले. त्यावेळी तो शोले चा क्लायमॅक्स पाहूच शकला नाही! नंतर अनेक चित्रपटात तो झळकत राहिला परंतु त्याची आयडेंटिटी राहिली शोलेतील सांभा म्हणूनच राहिली. पुढे त्याने काही दूरदर्शन मालिकांमध्ये देखील कामे केली. रविना टंडन हि अभिनेत्री त्याची भाची. वयाच्या ७२ व्या वर्षी २०१० साली मॅकमोहन सांभा यांचे निधन झाले!