Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Cannes film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

मराठी भावगीतांचा अरुणोदय : अरुण दाते.

 मराठी भावगीतांचा अरुणोदय : अरुण दाते.
कलाकृती विशेष

मराठी भावगीतांचा अरुणोदय : अरुण दाते.

by रश्मी वारंग 04/05/2021

मराठी संगीताने अनेकविध गीतप्रकार आपल्या अंगाखांद्यावर खेळवले. त्यातला अतिशय संपन्न प्रकार म्हणजे भावगीत गायन, आणि या भावगीतांच्या समृद्ध दुनियेतील ‘शुक्रतारा’ म्हणजे गायक अरुण दाते(Arun Date). त्यांच्या जन्मदिनी जाणून घेऊया त्यांच्याविषयी

अरुण दाते यांचे वडील रामुभैया दाते म्हणजे इंदूर येथील प्रतिथयश गायक तसेच रसिक. स्वतः पुलंनी रामुभैयांवर लेख लिहावा इतकं संपन्न व्यक्तिमत्व अरुण दाते यांना वडील म्हणून लाभलं. घरात गायनाचे वातावरण होतेच. शिवाय अरुण दाते यांनी सुरुवातीला पंडित कुमार गंधर्व आणि नंतर के महावीर यांच्याकडे गायकीचे शिक्षण घेतले. १९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. त्यांच्या कारकीर्दीला नव्या नावासह मिळालेल्या वळणाचा किस्सा गमतीशीर आहे.

सुप्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी अरुणजींना मराठी गीत गायनाबद्दल विचारले तेव्हा सुरवातीला चक्क त्यांनी नकार दिला. इंदूरमध्ये वाढल्याने आपले मराठी फारसे चांगले नाही असा न्यूनगंड त्यांना होता पण वडीलांनी आग्रह केल्याने ते गीत अरुणजी गायले. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’ कार्यक्रमासाठी ‘शुक्रतारा’ ध्वनिमुद्रीत झाले, गीतप्रसारणावेळी गायकाचे नाव सांगितले जाते. अरुणजीचे खरे नाव अरविंद पण घरी सगळे त्यांना ‘अरु’ नावाने संबोधत. त्यामुळे अरुण नाव असावे असा खळेजींचा गैरसमज झाला. त्यांनी गायकाचे नाव अरुण असे कळवले. आणि अरविंद दाते यांचे अरुण दाते नामकरण झाले ते कायमचे.

 Marathi singer Arun Date
Marathi singer Arun Date

‘शुक्रतारा’ या गाण्याने अरुणजींना प्रचंड लोकप्रियता मिळाली. ‘शुक्रतारा’ याच नावाने अरुणजींनी भावगीत गायनाचे अडीज हजारांहून अधिक कार्यक्रम केले. अरुण दाते, मंगेश पाडगावकर, यशवंत देव या त्रयीने महाराष्ट्राला भावगीतांचा सदाबहार खजिना दिला. मराठी संगीताला आशयघन भावगीतांकडे पुन्हा वळवण्याचे श्रेय दाते यांना निःसंशय जाते.

बीबीसी लंडनमधील स्टुडीयोत आतापर्यंत फक्त दोन मराठी गाणी गायली गेली आहेत. ही गीत म्हणजे शुक्रतारा आणि भातुकलीच्या खेळामधली… अरुणजी ब्रिटनमध्ये शुक्रताराचे कार्यक्रम करत होते. त्याकाळी विमानप्रवास आजच्या इतका सोपा आणि परवडणारा नव्हता. त्यामुळे तबल्यावर अरुणजीचे काका शामुभैया दाले, सूत्रसंचालक सुप्रसिद्ध लेखक व.पु. काळे आणि अरुणजी स्वतः असे तिघेच कार्यक्रम करत हार्मोनिअमवाल्याचा खर्च वाचावा म्हणून वपु स्वतः हार्मोनियम शिकले होते, ते साथ करत. केवळ या दोघांच्या जोडीने ब्रिटनमधील मैफिलीत अरुणजी हजारों श्रोत्यांना कसे मंत्रमुग्ध करतात हे बीबीसीच्या वार्ताहरांनी पाहिल्यावर अरुणजींना बीबीसी स्टुडीयोत आमंत्रित करून त्यांचे ध्वनीमुद्रण झाले.

अरुणजींची सगळीच भावगीतं म्हणजे मास्टरपीस आहेत. या जन्मावर या जगण्यावर, शुक्रतारा, जेव्हा तिची नी माझी, भातुकलीच्या खेळामधली, स्वरगंगेच्या काठावरती, दिवस तुझे हे फुलायचे, मान वेळावुनी धुंद जपून चाल पोरी जपून चाल, डोळे कशासाठी, काही बोलायाचे आहे, डोळ्यात सांजवेळी, सखी शेजारणी, धुके दाटलेले उदास उदास, भेट तुझी माझी स्मरते, सूर मागू तुला मी कसा, लतादिदिंबरोबरचं संधीकाली या अशा ही आणि इतर सगळीच गाणी लोकप्रिय आहेत.

मराठी संगीत कितीही बदललं तरी अरुण दाते यांची भावगीत मात्र सदैव नवनव्या पिढ्यांना आपलंसं करत राहतील इतका गोडवा त्या गीतांमध्ये नक्की आहे. शब्दांमधील काव्य त्याच्या अर्थासह नजाकतीने पोहोचवणारे गायक म्हणून अरुण दाते कायम स्मरणात राहतील.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Marathi Movie marathi Show Marathi songs Singer
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.