स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने वाढवली उत्सुकता
टीझर प्रदर्शित होताच चर्चेत आलेला मराठी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट ‘असंभव’ आता त्याच्या नव्या रहस्यमय पोस्टरमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या लक्षात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अद्याप कधीही न पाहिलेला असा भव्य थ्रिलर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. पोस्टरमध्ये गडद लाल आणि काळ्या रंगाच्या छटांचा वापर केल्यामुळे पहिल्याच क्षणीच प्रश्न उभा राहतो. ही कथा प्रेमाची आहे की बदला घेण्याची? सचित पाटील, मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या चेहऱ्यांवरील शांतता, त्यांच्या नजरेतील गूढ अस्वस्थता आणि हलके स्मित हे सर्व प्रेक्षकांना एक रहस्यमय कथा सांगतात. तीन चेहऱ्यांमागील सत्य काय आहे? पोस्टरमध्ये प्रेमाचे गूढ आणि संशयाची तीव्र धार दोन्ही एकत्र मिसळलेली आहेत, ज्यामुळे हा चित्रपट एक वेगळाच सिनेमॅटिक अनुभव देईल, असे जाणवते.(Asambhav Movie Poster)

दिग्दर्शक आणि निर्माते सचित पाटील म्हणाले, ‘असंभव’ हा चित्रपट केवळ सस्पेन्स थ्रिलर नाही, तर मानवी भावना आणि संघर्षाच्या खोल थरांना स्पर्श करणारा अनुभव आहे. प्रेम, रहस्य, भीती आणि संघर्ष यांच्या सीमारेषा यामध्ये एकत्र आणल्या आहेत. नैनितालच्या मोहक आणि गूढ वातावरणात चित्रित हा पहिला मराठी चित्रपट असून, प्रत्येक सीन तांत्रिकदृष्ट्या उत्तम आणि सिनेमॅटिक दृष्ट्या मनमोहक आहे.” निर्माते नितीन प्रकाश वैद्य यांनी सांगितले, “या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक अनुभवसंपन्न कलाकार आणि कुशल तंत्रज्ञांनी एकत्र काम केले आहे. सर्वांच्या मेहनतीमुळे हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. प्रेक्षकांना हा अनुभव नक्कीच भावेल, याची मला पूर्ण खात्री आहे.”

एरिकॉन टेलिफिल्म्सच्या शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि पी अँड पी एंटरटेनमेंटचे मंगेश परुळेकर यांनी सांगितले, “पोस्टरमध्ये दिसणारी गूढता फक्त सुरुवात आहे. ‘असंभव’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावनिकरीत्या भिडवणारा असून, सस्पेन्स आणि थ्रिलरचा थरार दोन्हींचे परिपूर्ण मिश्रण आहे.(Asambhav Movie Poster)
==========================
==========================
सहदिग्दर्शक पुष्कर श्रोत्री असून, सचित पाटील, मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि संदीप कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाची निर्मिती मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंटतर्फे सचित पाटील आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी केली असून, एरिकॉन टेलिफिल्म्स, पी अँड पी एंटरटेनमेंट, तसेच संजय पोतदार यांच्या सहनिर्मितीत हा प्रकल्प तयार झाला आहे.