Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Marathi Film Review : गुंतागुंतीची मर्डर आणि लव्हस्टोरी….

Perfect Family Series Trailer: सोशल मिडिया सेन्सेशन गिरिजा ओक च्या

Isha Keskar चा ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेला रामराम? मालिकेच्या नव्या प्रोमोमुळे चर्चांना

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Ranveer Singh : लेखक ते अभिनेता असा प्रवास करणारा बॉलिवूडचा

‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

Bigg Boss 19 च्या नव्या व्होटिंग ट्रेंडनुसार Gaurav Khanna नाही तर

Asha Marathi Movie Teaser: बाईपणाच्या संघर्षाची गोष्ट दाखवणाऱ्या रिंकू राजगुरुच्या

जेव्हा Amitabh Bachchan आणि धर्मेंद्रचे सिनेमे एकाच आठवड्यात प्रदर्शित झाले!

१,३०० मुलींना पछाडत २० वर्षांची ‘धुरंधर’ चित्रपटातील रणवीर सिंगची नायिका

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Asha Bhosle : ४ महिने गरोदर असताना आशा ताईंनी आत्महत्येचा का केला होता प्रयत्न?

 Asha Bhosle : ४ महिने गरोदर असताना आशा ताईंनी आत्महत्येचा का केला होता प्रयत्न?
मिक्स मसाला

Asha Bhosle : ४ महिने गरोदर असताना आशा ताईंनी आत्महत्येचा का केला होता प्रयत्न?

by रसिका शिंदे-पॉल 25/06/2025

भारतीय संगीत क्षेत्रात अमुल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्नविभूषण आशा भोसले (Asha Bhosle) यांच्या आवाजाची जादू आजही कायम आहे… वय वर्ष ९० असून आजही आशा भोसले आपल्या करिअरच्या बाबतीत Passionate आहेत… मंगेशकर कुटुंबात जन्माला आलेल्या आशा भोसले यांचं संगीत क्षेत्रातील करिअर जरी यशस्वी झालं असलं तरी त्यांच्या वैयक्तिक जीवनात मात्र फारच अशांतता होती… तुम्हाला माहित आहे का? आशा भोसले यांनी गरोदर असताना चक्क आत्महतेच्या प्रयत्न केला होता… ‘आशा भोसले: अ लाईफ इन म्युझिक’ या त्यांच्या आत्मचरित्रात आशा ताईंनी त्यांच्या वैयक्तिक आणि सांसारिक जीवनाबद्दल उघडपणे लिहिले आहे…(Bollywood News)

आशा भोसले यांनी त्यांच्या वैयक्तिक जीवनात असंख्य वादळांना तोंड दिलं होतं… आशा भोसले यांनी घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं… १९४९ मध्ये आशा भोसले यांनी वयाच्या १६व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केलं.. आशा ताईंच्या या निर्णयावर मंगेशकर कुटुंब फार नाराज होतं..इतकंच नाही तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) बरीच वर्ष आशा ताईंशी बोलतही नव्हत्या… त्यांच्या या आत्मचरित्रात उल्लेख केल्याप्रमाणे गणपतराव हे आशा भोसले यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी मोठे होते…(Entertainment Trending News)

आशा ताईंचं लग्न झाल्यानंतर काही काळ त्यांच्या संसार सुरळीत सुरु होता पण नंतर मिठाचा खडा पडला आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या…पुस्तकात लिहिल्याप्रमाणे गणपतराव मद्यपान करायचे आणि पत्नीवर म्हणजे आशा ताईंवर हातही उचलायचे…अगदी जेव्हा आशा भोसले गरोदर होत्या तेव्हाही त्यांच्यावर गणपतराव यांनी हात उचलला होता आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे लागले होते..पुस्तकात, आशा ताईंनी लिहिले आहे की त्यांच्या सासरची लोकं खूप संकुचित विचारांचे होते आणि त्यांची सून एक गायन सुपरस्टार आहे हे सहन होत नव्हतं. त्यांनी लिहिलं आहे की, “माझा नवरा खूप रागीट होता. कदाचित त्याला मला दुखावण्यात मजा येत असे. तो एक दुःखी व्यक्ती होता. पण बाहेरील कोणालाही हे माहित नव्हते. मी माझी सर्व कर्तव्ये पार पाडली, जसे हिंदू धर्मातील प्रत्येक पत्नी करते.”(Indian Music Industry)

================================

हे देखील वाचा: ‘Swargandharva Sudhir Phadke’ चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी

=================================

या चरित्रात आशा ताईंच्या गरोदरपणाबद्दल लिहिलं आहे की,आशा भोसले तिसरा मुलगा आनंदच्या वेळी गरोदर होत्या, तेव्हा त्यांच्या सासरच्या लोकांनी त्यांना घराबाहेर हाकलून लावलं होतं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि याच वेळी आशा यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात आशा यांनी लिहिलंय की, “एकेकाळी मला वाटले की मी स्वतःचा जीव घ्यावा. मी आजारी होते, चार महिन्यांची गर्भवती होते, रुग्णालयात परिस्थिती अशी होती की हे नरक आहे असे वाटत होते. मी मानसिकदृष्ट्या इतकी खचले होते की मी झोपेच्या गोळ्यांची एक संपूर्ण बाटली संपवली होती.. पण माझ्या मुलावर माझे प्रेम इतके होते की त्याने मला मरू दिले नाही. मला काहीही झाले नाही.” आशा भोसले यांची वेगळी ओळख खरं तर करुन देण्याची काही गरज नाही… आपल्या जादूई आवाजाने प्रेक्षकांना भूलवणाऱ्या आशा भोसले यांनी आजवर हजारोंच्या घरात विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत.. आशा ताईंचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंदवले गेले आहे.(Bollywood Masala)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: asha bhosle asha bhosle songs Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment latest news Indian Music lata mangeshkar marathi entertainment news
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.