Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

यांचं ठरलंय! भर कार्यक्रमात Vijay Devarkonda नं दिली Rashmika Mandanna

DDLJ : ‘या’ लोकप्रिय गाण्याच्या आधी पंजाबी ओळी टाकण्याची आयडीया

“मी हिंदीत शिरण्याचा खूप प्रयत्न केला पण…”; Ajinkya Deo बॉलिवूडमधील

‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

“मुलं झोपू शकत नाहीयेत. त्यामुळे मी…” Dharmendra यांना डिस्चार्ज दिल्यानंतर

Aadinath Kothare दिसणार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत!

याला म्हणतात कमबॅक! पिवळी साडी, पायात मराठमोळी कोल्हापुरी चप्पल; Priyanka

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘Swargandharva Sudhir Phadke’ चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी

 ‘Swargandharva Sudhir Phadke’ चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी
Swargandharva Sudhir Phadke Movie
मिक्स मसाला

‘Swargandharva Sudhir Phadke’ चित्रपटाच्या निमित्ताने आशा भोसले यांनी शेअर केल्या बाबुजींसोबतच्या आठवणी

by Team KalakrutiMedia 10/04/2024

मराठी मनावर कोरलेले संगीतविश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके. म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबुजी. आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या बाबुजींची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके‘ चित्रपट येत्या १ मे रोजी रसिकप्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट म्हणजे आजवरचा सर्वात भव्य स्वरमयी बायोपिक ठरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्यासोबत गायलेल्या अनेक नामवंताच्या असंख्य गाजलेल्या गाण्यांना चित्रपटगृहात नव्याने अनुभवण्याची पर्वणी या कलाकृतीच्या माध्यमातून मिळणार आहे. दरम्यान ‘स्वरांची गंगा’ समजल्या जाणाऱ्या आशा भोसले यांनी बाबुजींसोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.(Swargandharva Sudhir Phadke Movie)

Swargandharva Sudhir Phadke Movie
Swargandharva Sudhir Phadke Movie

बाबुजी आणि आशाबाईंनी कायमच आपल्या प्रतिभेची चमक दाखवली आहे. त्यांच्या स्वर्गीय सुरांनी नटलेल्या प्रत्येक गाण्याला लाभलेली लोकप्रियता अवर्णनीय आहे. या दोघांनी गायलेली सगळीच गाणी ऐकताना त्या कलाकृतीच्या अलौकिकतेचा प्रत्यय येतो. ही गाणी सदाबहार असून ‘जगाच्या पाठीवर’, ‘या सुखांनो या’, ‘धाकटी बहीण’, ‘लाखाची गोष्ट’, ‘सुवासिनी’, ‘लक्ष्मीची पाऊले’ अशा अनेक चित्रपटांतील गाण्यांना या जोडीचा आवाज लाभला आहे. ही सगळीच गाणी अजरामर आहेत. 

Swargandharva Sudhir Phadke Movie
Swargandharva Sudhir Phadke Movie

आशा भोसले बाबुजींसोबतच्या आठवणींना उजाळा देताना म्हणतात, ” बाबुजी म्हणजे एक अष्टपैलू आणि कलासक्त कलाकार. ‘का रे दुरावा…’ चा एक गंमतीदार किस्सा म्हणजे. हे गाणे गाताना ‘का रे दुरावा… ही ओळ गाताना बाबुजींनी मला खूपच हावभाव व्यक्त करण्यास सांगितले. परंतु हे करताना मला खूप हसायला येत होते. मी असे हावभाव दिले तर लोकं वेडं म्हणतील मला. त्यावर त्यांचे उत्तर होते, नाही.. नाही… चांगलं म्हणतील. अशा पद्धतीने ते गाणं शिकवायचे. त्यामुळे आम्ही समृद्ध होत गेलो. मी बाबुजींना खूप मानते, ते माझे गुरूच आहेत. त्यांची आयुष्यगाथा सांगणारा चित्रपट येतोय. चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद.”(Swargandharva Sudhir Phadke Movie)

============================

हे देखील वाचा: महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’,नवीन टिझर झाला दाखल

============================

सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Asha BHosale Celebrity Entertainment Marathi Movie Mrunmayi deshpande Sunil Brve Swargandharva Sudhir Phadke Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.