Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!
निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी १९८५ साली ज्येष्ठ मराठी साहित्यिक चि. त्र्य. खानोलकर यांच्या ‘कालाय तस्मै नम:’ या साहित्य कृतीवर एक हिंदी चित्रपट बनवला होता ‘अनकही’. ज्योतिष्य शास्त्र आणि आधुनिक विज्ञान यांच्या परस्पर संबंधावरील भाष्य करणारा हा एक अप्रतिम चित्रपट होता. चित्रपटाला व्यावसायिक यश मिळाले नाही पण एक क्लासिक मूवी म्हणून आज देखील हा चित्रपट ओळखला जातो. या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा अमोल पालेकर यांनी नुकताच एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. हे गाणं गायिका आशा भोसले यांनी अंगात १०२ ताप असताना गायलं होतं! या चित्रपटाच्या संगीताला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. हा किस्सा सांगताना अमोल पालेकर खूप भाऊक झाले होते आणि खरोखरच त्या काळातील कलावंतांचं कलेबद्दलची आत्मीयता, आस्था आणि परस्परांविषयी असलेला आदर बघून आपल्याला देखील आश्चर्य वाटतं. कोणतं होतं ते गाणं ? आणि काय होता हा नेमका किस्सा? (Bollywood News)

१९८५ साली जेव्हा अमोल पालेकर यांनी ‘अनकही’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवलं ; त्यावेळेला तत्कालीन गीतकारांकडून गाणी लिहून घेण्यापेक्षा आपल्या पारंपारिक रचना आणि संत रचना यांचा यामध्ये वापर करायचे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी बालकवी बैरागी, गोस्वामी तुलसीदास आणि संत कबीर यांच्या रचना निवडल्या. चित्रपटाला संगीत संगीतकार जयदेव देणार होते. संत कबीर यांची एक रचना त्यांना या चित्रपटात घ्यायची होती हि रचना आशा भोसले यांनी गावी अशी त्यांची इच्छा होती. ‘कौन ठगवा नगरिया लूटल हो..’ हि रचना होती. (Retro Bollywood News)
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
अमोल पालेकर आशा भोसले यांना भेटले आणि त्यांना हे गीत आपण गावे हि इच्छा व्यक्त केली. आशा भोसले यांना खूप आनंद वाटला. त्यांनी सांगितलं की “हे गाणं मी नक्की गाईन.” त्यावर अमोल पालेकर म्हणाले,” या गाण्याचे मानधन आपण किती घ्याल?” तेव्हा आशा भोसले यांनी पालेकरांना विचारलं,” हा चित्रपट तुम्हीच निर्माण करत आहात का? तुमचेच पैसे या चित्रपटाला लागणार आहेत का? की कोणी आणखी फायनान्सर आहे?” त्यावर अमोल पालेकर म्हणाले,” नाही. कोणी दुसरा फायनान्सर नाही. या सिनेमाचा सर्व खर्च मीच करणार आहे.” आशा भोसले म्हणाल्या,” ठीक आहे. हे गाणं गाण्यासाठी माझी एक अट आहे . या गाण्याच्या सर्व रिहर्सल मी स्वतः जयदेव यांच्याकडे जाऊन करेन. संगीतकार जयदेव यांना कुठलाही त्रास मी देणार नाही. त्यांच्याकडे मी स्वतःच जाईन आणि रिहर्सल करेल आणि त्यानंतरच गाण्याचे रेकॉर्डिंग करेल.”(Untold stories of Asha Bhosle)

गाण्याच्या मानधनाचा प्रश्न त्यांनी टाळला! त्यानंतर आशा भोसले जयदेव यांच्याकडे जाऊन गाण्याचे रिहर्सल करू लागल्या. संगीतकार जयदेव यांनी या गीताला भैरवी रागात बांधले होते. आशाला हे गाणं त्याची चाल खूपच आवडली होती. तीन-चार रिहर्सल्स झाल्यानंतर गाण्याच रेकॉर्डिंग ठरले. अमोल पालेकर यांनी रेकॉर्डिंग स्टुडिओ बुक केला. सर्व म्युझिशियनस , संगीतकार जयदेव, अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी चित्रा पालेकर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये पोहोचले. त्या काळात म्युझिशियन अससिएशनचा मोठा इम्पॅक्ट निर्मात्यावर असायचा. त्यांच्या नियमानुसार जर म्युझिशियनस रेकॉर्डिंग रूममध्ये आले , त्यांची वाद्य उघडली, रिहर्सल वगैरे झाली आणि जरी समजा गाणे काही कारणाने कॅन्सल झाले तरी त्या म्युझिशियनसला त्या दिवसाचा संपूर्ण पेमेंट करणे निर्मात्याला अनिवार्य असायचे. या गाण्यासाठी तर मोठमोठे म्युझिशियनस उपस्थित होते संतूरवर शिवकुमार शर्मा, बासरी साठी हरिप्रसाद चौरसिया आणि सरोद वर जरीन दारूवाला होत्या. सर्वजण आपापली वाद्य काढून तयार होते. आता वाट पाहत होते गायिका आशा भोसले यांची. (Entertainment News Tadka)
पण त्याच वेळी आशा भोसले यांच्याकडून एक फोन आला त्यांच्या अंगात १०२ ताप आहे आणि त्या रेकॉर्डिंगला येऊ शकत नाही. अमोल पालेकर वर जणू बॉम्बच पडला. कारण रेकोर्डिंग स्टुडिओ चे भाडे एवढ्या वादकांचा खर्च आता देणं भाग होतं. ते मटकन खाली बसले. तरी जयदेव यांनी अमोल पालेकरला सांगितले “ तुम्ही एकदा आशा भोसले यांना विचारा की त्या थोडं उशीरा येऊ शकतात का?” त्या पद्धतीने अमोल पालेकर यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी असे लिहिले “आशाताई तुमची तब्येत कशी आहे? आपण रेकॉर्डिंग ला थोडं उशिरा येऊ शकता का? कारण सर्व म्युझियम्स आलेले आहेत आणि जर रेकॉर्डिंग कॅन्सल झाली तर हा खर्च माझ्या आटोक्या बाहेरचा आहे. तेव्हा तुम्ही काय तो निर्णय घ्यावा.” हे पत्र घेऊन त्यांनी आपल्या पत्नीला आशा भोसले यांच्याकडे पाठवले. अर्ध्या तासाने आशा भोसले यांच्याकडून फोन आला की त्या रेकॉर्डिंगला येत आहेत.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
सर्वजण तयार झाले. अंगात १०२ ताप असताना आशा भोसले रेकॉर्डिंगला आल्या आणि थेट टेक घेऊयात असे सांगितले. आणि त्या अवस्थेत एका टेकमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग पूर्ण झालं. हे रेकॉर्डिंग होत असताना जयदेव यांच्या डोळ्यातून सारखं पाणी येत होतं. कारण आशा भोसले तब्येत बरी नसताना, अंगात सणसणीत ताप असताना ज्या विलक्षण प्रतिभेने त्या गात होत्या ते पाहून त्यांना खूप भाऊक व्हायला झालं. गाण्याचं रेकॉर्डिंग संपलं. जयदेव आशा भोसले यांच्याकडे गेल. आणि त्यांच्या गळ्यात पडून रडू लागले. आशा भोसलेंनी विचारलं “ काही चूक झाली का? आपण आणखी एक टेक घेऊ “ त्यावर जयदेव म्हणाले,” नाही आशाताई .याच्याहून सुंदर गाणं होऊच शकत नाही. खूप चांगलं गाणं आपण गायलं आहे.” आशा भोसले त्यानंतर तडक रेकॉर्डिंग स्टुडिओच्या बाहेर पडल्या. जाताना अमोल पालेकर यांना म्हणाल्या की,” या गाण्याची टेप तुम्ही संध्याकाळी माझ्या घरी घेऊन या मी तिथेच ऐकेन. “ आशा भोसले अशक्तपणाने थकल्या होत्या.

संध्याकाळी अमोल पालेकर गाण्याची टेप घेऊन प्रभु कुंज पेडर रोडला गेले. आशा ताई बेडवर पडून होत्या. त्यांचा ताप काही उतरलेला नव्हता. त्या खूप मलूल वाटत होत्या. अमोल पालेकर यांनी सकाळचे गाणे ऐकवले, ते ऐकताना आशा भोसले यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. खरोखरच अप्रतिम गाणं झालं होतं. ते पाहून अमोल पालेकर यांच्या देखील डोळ्यात अश्रू उभे राहिले. आशा ताई म्हणाल्या,” खूप चांगलं गाणं झालं आहे.” त्यावर अमोल पालेकर म्हणाल्या,” हो. पण आशाताई या गाण्याचं पारिश्रमिक किती द्यायचं मी तुम्हाला?” त्यावर आशाताईंनी अमोल पालेकरचा हात हातात घेतला आणि त्याला जवळ बसवले आणि सांगितलं,” अशी गाणी द्यायला भाग्य लागते. अशी गाणी नशिबात असावी लागतात. मी खरं तर तुमचे आभार मानले पाहिजे की तुम्ही मला हे गाणं गायची संधी मला दिली. या गाण्याचा एक पैसाही मला नको. या गाण्याने दिलेलं समाधान, तृप्ती, आणि आत्मीय आनंद इतका आहे की त्यापुढे सर्व दौलत फिकी आहे! मला काही नको.” हे ऐकून अमोल पालेकर अक्षरशः रडायला लागले!
================================
हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!
================================
या मुलाखतीत अमोल पालेकर म्हणाले की ,”माझं नशीब चांगलं की अशी देवासारखी माणसं मला मिळाली म्हणून मी चित्रपट निर्मिती करू शकलो.” आशा भोसले यांनी गायलेले गाणं खरोखरच अतिशय अप्रतिम आहे. मी खाली या गाण्याची लिंक दिली आहे तुम्ही नक्की ऐका. चित्रपटात हे गाणं अभिनेत्री दीप्ती नवलवर चित्रित झाले आहे. या चित्रपटासाठी संगीतकार जयदेव यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. जयदेव खरोखरच गुणी संगीतकार. १९७१ साली ‘रेश्मा और शेरा ‘ १९७८ साली ‘गमन’ या चित्रपटासाठी देखील त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
https://youtu.be/_8koS4xQNYM?si=fiDFzuAP-nU7PCPz ( गाण्याची लिंक)