Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Ashok Saraf : ‘अशी ही जमवा जमवी’ चित्रपटाचा विशेष शो!
कौटुंबिक मूल्यं, नातेसंबंधांची गुंफण आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण असा ‘अशी ही जमवा जमवी’ हा मराठी चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.(Marathi entertainment news)
नुकतंच ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमाचे मुंबईत विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते याला अनेक मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. इतकच नव्हे तर या विशेष स्क्रीनिंगला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि चित्रपटाच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते तसेच प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर, सचिन पिळगांवकर , भरत जाधव, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, संगीतकार अमितराज यांच्यासह अनेक कलाकारांनी खास हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरणात उत्साह आणि जल्लोष होता. (Bollywood tadaka)

“अशा ही जमवा जमवी” हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला असून, व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांचे हे पहिले निर्मिती आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अशी ही जमवा जमवी” या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक चांगली छाप सोडली आहे. (Entertainment)
===============================
हे देखील वाचा: अशोक सराफ…. एक आदर्शवत कलाकार!
===============================
मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले; अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटात केवळ तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी दाखवण्यात आली आहे. (Marathi movies)