MOM 2: श्रीदेवींच्या शेवटच्या चित्रपटाचा बनणार सिक्वेल; लेक khushi Kapoor

Ashok Saraf : “हा लक्ष्या अशोक शिवाय अपूर्णच राहिल”!
“तुटेल का रे वादा यारा नाय नाय नाय, ही दोस्ती तुटायची नाय…” खरंच मराठी चित्रपटसृष्टीत दोन मित्रांची जोडी ज्यांनी विनोदीपंटांचा एक अजरामर नजराणा प्रेक्षकांना देऊन ठेवला असे दोन ज्येष्ठ कलाकार म्हणजे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे. खरंच या दोघांना ५० पेक्षा अधिक चित्रपटात एकत्र पाहिल्यानंतर लक्ष्मीकांत यांच्या निधनानंतर प्रेक्षकांनाच काय Ashok Saraf यांनाही एकट्याने काम करणं अवघड झालं होतं. पण मैत्रीच्या जगात लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांनी मिसाल कायम केली आहे. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला.

यानिमित्ताने ‘स्टार प्रवाह’च्या कलाकारांनी अशोक सराफ यांच्यासाठी खास डान्स परफॉर्मन्स सादर करून त्यांचा सन्मान केला. यावेळी लक्ष्मीकांत यांचा अशोक सराफांना आलेला आभासी फोन सगळ्यांचेच डोळे पाणावून गेला. (Marathi films update)
===============================
हे देखील वाचा : Priyanka Chopra : मिस वर्ल्ड जिंकण्यासाठीच ‘ती’ आली होती!
==============================
स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांवर कलाकारांनी विविध परफॉर्मन्स सादर केले. सगळ्या कलाकारांनी मिळून मंचावर त्यांचं औक्षण केलं. यानंतर या ज्येष्ठ अभिनेत्याला एक आभासी फोन आला. हा फोन होता जिवलग मित्राचा, ते म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berne). “हॅलो हॅलो अशोक…. अरे आपण जवळपास ५० चित्रपट एकत्र केले मज्जा… तुझा आज होणारा सन्मान पाहून डोळे भरून आले बघ. हा लक्ष्या या अशोकशिवाय नेहमीच अपूर्ण राहील. ही दोस्ती तुटायची नाय….” आभासी फोनवरचे जवळच्या मित्राचे हे शब्द ऐकताच अशोक सराफ (Ashok Saraf) यांचे डोळे पाणावले. (Entertainment tadaka)

अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘शेजारी शेजारी’, ‘धुमधडाका’, ‘अफलातून’, ‘चंगु मंगू’ असे अनेक चित्रपट एकत्र केले. महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडगोळीने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. मात्र, चित्रपटसृष्टीच्या लाडक्या लक्ष्या मामांची अचानक झालेली एक्झिट मनाला चटका लावून गेली. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी जितक्या विनोदी भूमिका उत्तम साकारल्या तितक्याच गंभीर भूमिकाही चोख बजावल्या. खरंच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जाण्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा तारा निखळला.(entertainment masala)