Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Ashok Saraf : अभिनयाचे बादशाह!
मनोरंजनसृष्टीला पडलेलं निखळ स्वप्न म्हणजे पद्मश्री अशोक सराफ... बालपणापासूनच अभिनयाची आवड असणाऱ्या अशोक यांनी संगीत नाटकापासून आपला कलेचा प्रवास सुरु केला होता. बॅकस्टेज करणाऱ्या अशोक सराफ यांना कालांतराने नाटकांमध्ये भूमिता मिळाली आणि हळूहळू घडत गेला The Ashok Saraf Era. ४ जून १९४७ रोजी मुंबईत अशोक सराफ यांचा ज्नम झाला. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीवर एक नजर टाकूयात…(Padma Shri Ashok Saraf)

गेल्या ५० दशकात आपल्या आगळ्या-वेगळ्या भूमिकेने त्यांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच, पण यासोबतच त्यांचे असेही अनेक किस्से आहेत, जे अनेक प्रेक्षकांना माहित नाहीत. आपल्याला वाटतं की मराठीत सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांनीच बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं, पण अशोक सराफ अवघे ६ वर्षांचे असताना त्यांनी थिएटर करायला सुरुवात केली होती. (Bollywood)
अशोक सराफ यांनी आपल्या बहारदार बहुआयामी अभिनयाने नेहमीच स्वतःला एक सशक्त अभिनेता म्हणून सिद्ध केले. मराठी चित्रपट गाजवताना त्यांनी हिंदीमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. अशोक सराफ मूळचे बेळगावचे मात्र त्यांचा जन्म मुंबईत झाला. दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. नाट्य अभिनेते रघुवीर नेवरेकर (Raghuveer Nevrekar) हे अशोक सराफ यांचे मामा होते. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ‘ययाती आणि देवयानी’ या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. अशोक मामांनी काही संगीत नाटकांतून देखील भूमिका केल्या. (Ashok Saraf Journey)

अशोक सराफ यांनी आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. त्यांनी जवळपास १० वर्षे ही नोकरी केली. काम करत असतानाही अभिनय त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. याच कारणामुळे ते नोकरी सांभाळत नाटकांमध्ये देखील भाग घेत होते. नाटकांमध्ये त्यांना यश मिळू लागले आणि त्यांच्या अभिनयाच्या चर्चा सुरु झाल्या. नाटकांमध्ये यश मिळवल्यानंतर अशोक यांच्याकडे चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. (Ashok Saraf conferred with padma shri )
अशोक सराफ यांना प्रथम मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. १९७५ साली आलेल्या ‘राम राम गंगाराम’ चित्रपटात त्यांनी काम केले. मात्र त्यांना खरी ओळख दिली १९७७ साली आलेल्या ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने. या चित्रपटामुळे त्याच्या कारकीर्दीला यशाचे शिखर मिळाले. या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यानंतर हळूहळू ते मराठी सिनेमाचे एक मोठे नाव बनले. त्यांनी विनोदी, गंभीर, ट्रेजडी आदी सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी सहज निभावल्या.(Entertainment)
अशोक सराफ हे नाव मराठी सिनेविश्व गाजवत असताना त्यांना हिंदीमधून देखील चित्रपटांच्या ऑफर्स यायला सुरुवात झाली. हिंदीमध्ये अशोक यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम आणि संस्मरणीय भूमिका साकारल्या. सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत सर्वच दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले होते. सहाय्यक भूमिकांमधून देखील अशोक सराफ यांनी आपली छाप निर्माण केली आणि ते हिंदी विश्वात देखील लोकप्रिय झाले. (Bollywood movies)
अशोक सराफ हे मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असताना त्यांनी टेलिव्हिजन विश्वात देखील काम करण्यास सुरुवात केली. ९० च्या दशकातील सर्वांचीच आवडती आणि आजही लक्षात असणारी कॉमेडी मालिका म्हणजे ‘हम पांच’. या मालिकेमध्ये आनंद माथूर ही भूमिका साकारली आणि टीव्ही विश्वात एकच धमाका केला. टीव्ही इंडस्ट्रीच्या इतिहासातील आजपर्यंतची सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॉमेडी मालिका म्हणून हम पांचला ओळखले जाते.(Television insdustry)
अशोक सराफ यांची लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे या कलाकारांसोबत जमलेली जोडी नेहमीच गाजली. अशोक सराफ यांनी या कलाकारांसोबत मिळून मोठया पडद्यावर एकच कल्ला केला. दरम्यान मामांनी त्या त्या काळातील सर्वच लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केले. मुख्य म्हणजे त्यांची जोडी प्रत्येक अभिनेत्रीसोबतच गाजली.
================================
=================================
अशोक सराफ यांनी आजवर २५० हून अधिक चित्रपटांमध्ये कामं केली आहेत. त्यापैकी १०० पेक्षा अधिक चित्रपट कर्मशिअली यशस्वी झाले आहेत. अशोक सराफ यांना मराठी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक ३ वेळा फिल्मफेअर best actor चा अवार्ड मिळाला आहे तर सर्वाधिक ७ वेळा नॉमिनेशनसुद्धा मिळालं आहे… ५५ वर्षांपेक्षाव अधिक काळ मराठी नाट्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीला वाहून देणाऱ्या पद्मश्री अशोक सराफ यांना ‘कलाकृती मिडिया’तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा! (Entertainment news)