
Ashok Saraf : “तिच्यासोबत माझी चांगली जोडी..”, रंजनाबद्दल पहिल्यांदाच बोलले सराफ!
मराठी मनोरंजनसृष्टीच्या इतिहासात महाराष्ट्रभूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आजवर अजरामर चित्रपट दिले. विनोदी भूमिकांसह विविधांगी भूमिका कायमच प्रेक्षकांना अशोक सराफ यांनी दिल्या. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी चित्रपटात कामं केली पण रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांच्यासोबत ऑनस्क्रिन रंगलेली त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अधिक भावली. आत्तापर्यंत कधी अशोक सराफ यांनी रंजना यांच्या नावाचा उल्लेख कोणत्याच मुलाखतीमध्ये केला नव्हता. मात्र, पहिल्यांदाच त्यांनी रंजना आणि त्यांच्या जोडीबद्दल अशोक सराफ व्यक्त झाले. (Marathi entertainment news)

अशोक सराफ यांनी नुकतीच रेडिओ सिटी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना “तुमची आवडती ऑनस्क्रीन जोडी कोणती?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत अशोक सराफ म्हणाले की, “खरं सांगायचं तर माझी चांगली जोडी जमली ती रंजनासोबत. ती एक फाइन आर्टिस्ट होती, यात शंकाच नाही. मेहनती कलाकार होती. आपल्याला ही गोष्ट जमत कशी नाही, मी ती करणार…असा तिचा ध्यास सतत असायचं. एवढा जेवढा तुमचा ध्यास असतो तेव्हाच तुम्ही यशस्वी होता. म्हणून ती यशस्वी झाली. तिने सुरुवातीला केलेले सिनेमे मी पाहिले आहेत. ते सिनेमे तिने का केले, असे होते. पण, नंतर तिने स्वत:ला खूप डेव्हलप केले. इंडस्ट्रीत आमच्या जोडीचे जास्त सिनेमे झाले. त्या वेळेला तिची आणि माझी जोडी जमली होती”. (Entertainment news)
===============================
हे देखील वाचा: Ranjana Deshmukh: “कुण्या गावाचं आलं पाखरू…” आठवणींतील रंजना!
===============================
अशोक सराफ (Ashok Saraf) आणि रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांनी ‘एक डाव भूताचा’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘सुशीला’, ‘गुपचूप गुपचूप’, ‘हिच खरी दौलत’, ‘सासू वरचढ जावई’, ‘हळदी कुंकू’, ‘कशाला उद्याची बात’, ‘सावित्री’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामं केली आहेत. सध्या अशोक सराफ ‘अशी ही जमवाजमवी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले असून यात त्यांच्यासोबत वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. १० एप्रिलला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्यांच्यासोबत सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. (Marathi upcoming films)