
Ashok Saraf : अशोक मामांच्या यशामागील ‘मामा’ म्हणजे कोण?
भारतीय चित्रपटसृष्टीतील हास्यसम्राट अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच ‘पद्मश्री’ (Padma Shri) पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अशोक सराफ यांनी आजवर विविधांगी भूमिका साकारल्या. आज त्यांना मिळालेल्या या यशाचं श्रेय त्यांनी अशा एका व्यक्तीला दिलं आहे ज्यांच्यामुळे त्यांचा अभिनयाचा प्रवास खरं तर सुरु झाला. अशोक मामांच्या जीवनातील ते मामा कोण आहेत ज्यांनी अशोक सराफ यांना खऱ्या अर्थाने घडवलं. जाणून घेऊयात…(Marathi entertainment news)

अशोक सराफ यांनी पद्मश्री पुरस्कार घेतल्यानंतर झी २४ तासशी संवाद साधताना या यशाचं श्रेय कुटुंबाला आणि त्यांचे मामा गोपीनाथ सावकार (Gopinath Savakar) यांना दिलं. अशो सराफ म्हणाले की, “हे सगळं माझ्या गुरुमुळेच झालं आहे. माझे गुरु माझे मामा आहेत. जे नाटक आणि सिनेमा इंडस्ट्रीत निर्माते आणि दिग्दर्शक होते. त्यांच्याकडून जे काही शिकलो ते मी माझ्या पद्धतीने लोकांपुढे सादर केलं. मला त्यांच्याकडून बाळकडू मिळालं, त्याबद्दल त्यांना श्रेय देईन. तसंच माझ्या कुटुंबाला देईन ज्यांनी मला समजून घेतलं. किती उपलब्ध असेन, घरी नसेन हे माहिती असतानाही सगळ्या कुटुंबाने अॅडजस्ट करुन घेतलं याचं कौतुक करतो”.(Bollywood news)
================================
=================================
अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रामध्ये त्यांचे मामा गोपीनाथ सावकार यांच्याबद्दल बऱ्याच आठवणी लिहिल्या आहेत. मामांमुळे त्यांना अभिनयाचा ब्रेक कसा मिळाला याचा प्रसंग देखील त्यांनी उल्लेखला आहे. अशोक सराफ यांचे मामा गोपीनाथ सावकार हे मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक, निर्माते होते. गोपीनाथ यांनी संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात अनेक संगीत नाटकं सादर केली होती. अशोक सराफ देखील त्यांच्या या संगीत नाटकांमध्ये सहभागी होते. भावबंधन, शाकुंतल, सुवर्णतुला, ययाति देवयानी अशा अनेक दर्जेदार संगीत नाटकांचे प्रयोग सावकारांनी एकहाती सादर केले होते.(Entertainment tadaka)