Suraj Chavan : ‘झापुक झुपूक’ चित्रपटात सूर्यासह कलाकारांची मांदियाळी!

Ashok Saraf : “सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”
आत्ताच्या काळात कोणत्याही व्यक्तीवर, घटनेवर विनोद केला तर नक्कीच महागात पडू शकतं. कधी कुणाच्या भावना दुखावतील याचा काही नेम नाही. पण, एक काळ मराठी चित्रपटसृष्टीत केवळ विनोदी कलाकारांनी आपल्या निखळ विनोदामुळे गाजवला होता. यात दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर यांसारख्या दिग्गजांनी आपल्या निखळ विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. आता मात्र तसं चित्र राहिलेलं नाही. त्यामुळे सध्याच्या स्टॅडअप कॉमेडीबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी आपलं मत मांडलं आहे. (Marathi movies)

लवकरच अशोक सराफ (AShok Saraf) आणि वंदना गुप्ते यांचा ‘अशी ही जमवाजमवी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने अशोक सराफ यांनी ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले की, ‘आम्ही जी कॉमेडी करतो ती लोकांना पटेल का? या विचारानेच करतो. निदान मी तरी करतो. हे लोकांना पटणार आहे किंवा नाही याचा विचार करावाच लागतो. कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत आणि एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार निराळा असतो. आज मी जे करत आहे ते काही लोकांना आवडत नसेल सुद्धा किंवा काही लोकं जे करतात ते मलासुद्धा आवडणार नाही, असं होऊ शकतं. त्यामुळे ते एकमेकांना आवडू शकेल, हा अंदाजच असतो”.
===========================
हे देखील वाचा: Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द
===========================
पुढे ते म्हणाले (AShok Saraf) की, “हा अंदाज खरा ठरवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याकडून केला जातो आणि तो करायलाही पाहिजेच असं मला वाटतं. आम्ही बाकी कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही. भूमिका आणि पात्राचा विचार अधिक केला जातो. तुमची भूमिका किंवा तुमचं पात्र काय म्हणतंय? हे जास्त महत्त्वाचं असतं. त्या पात्राला अनुसरून तुमची कॉमेडी असली पाहिजे. एखाद्या गंभीर भूमिकेसाठी काहीतरी वेगळीच कॉमेडी असेल तर त्याला काही एक अर्थ नसतो. आपल्याबरोबर कोण आहे हेसुद्धा विचारात घेतलं पाहिजे. त्याला योग्य वाटेल अशी कॉमेडी केली पाहिजे. कॉमेडी वाटते तितकी सोप्पी नाही. लोकांना वाटतं की, कॉमेडी सहज केली जाते, पण तसं नाहीये. लोकांना हसवणं फार कठीण आहे आणि सतत हसवणं हेही कठीण आहे. तसंच कॉमेडीचा प्रभाव शेवटपर्यंत ठेवणं हे त्याहून कठीण आहे. त्यामुळे कॉमेडी विचाराने आणि लोकांना विचारात घेऊनच केली पाहिजे”. (Bollywood news)

कॉमेडी कशी असावी याबद्दल बोलताना (Ashok Saraf) ते म्हणाले की, “मी केलेली कॉमेडी ही सर्व वयोगटातील लोकांना आवडणारी आहे. त्यामुळेच माझे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळेच चाहते आहेत. मी घाणेरडं काही बोलत नाही की, जेणेकरून लोकांना वाटेल हे काय आहे, अशी कॉमेडी मला पसंत नाही आणि मी ती करतच नाही. असं काही असेल तर आम्ही ते काढूनच टाकतो. स्वच्छ, सुंदर आणि नाजुक अशी कॉमेडी असली पाहिजे”. (Entertainment news)
अशोक सराफ यांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ‘अशी ही जमवाजमवी’, ‘पुन्हा एकदा साडे माड़े तीन’ या चित्रपटातून भेटायला येणार आहेत. याशिवाय त्यांचं आणखी एक नाटक यावं अशी इच्छा देखील प्रेक्षक व्यक्त करत आहेत. (Ashok Saraf movies)