‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Ashok Saraf : “जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे केले असते”; अशोक मामांनी सांगितला ‘तो’ प्रसंग
पद्मश्री अशोक सराफ यांनी ५० वर्षांपेक्षा अधिक काळ रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्राला वाहून दिलं आहे… आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या अशोक सराफ यांचा जीव एकदा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वाचवला आहे… अभिनय शैलीच्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर अशोक सराफ (Ashok Saraf) आणि नाना पाटेकर (Nana Patekar) म्हणजे दोन टोकाचे कलाकार.. मात्र, इंडस्ट्रीत एकत्र राहून गेले अनेक वर्ष दोघांनी आपली मैत्री मात्र जपली आहे… अशोक सराफ यांच्यावर एकदा लोकांचा जमाव धावून आला होता आणि आपल्या या मित्राला वाचवण्यासाठी नानांनी प्रसंगावधान राखत अशोक सराफ यांची मदत केली होती… काय होता किस्सा जाणून घेऊयात…(Marathi movies)
तर, झालं असं होतं की, अशोक सराफ यांच्यावर एकदा जमाव धावून गेला होता. त्यावेळी नाना पाटेकर यांनी प्रसंगावधान दाखवत अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता. नाना पाटेकर नसते तर लोकांनी मला मारलं असतं असं अशोक सराफ यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितलं होतं. “हमिदाबाई नाटकाच्या वेळी नीट दिसत असल्याने लोकांनी गोंधळ घातला होता. पाच मिनिटात पडदा खाली पडल्यानंतर हळूहळू गडबड वाढू लागली. प्रेक्षक संतापले आणि सगळ्या खुर्च्या तोडून टाकल्या, ट्युबलाईट फोडल्या. लोकांनी बसच्या काचा फोडल्या. नाना पाटेकरला संभाव्य धोक्याची कल्पना आली होती. त्याला मी टार्गेट आहे हे लक्षात आलं. त्यावेळी नाना पाटेकरने मला तेथून अक्षरश: पळवलं होतं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही पळालो. मला घेऊन तो अक्षरश: धावत होता,” अशी आठवण त्यांनी सांगितली होती. “ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वत: चालवू लागला आणि मला घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला आहे. मी नानाचे उपकार विसरु शकत नाही. जर नाना नसता तर लोकांनी माझे तुकडे केले असते,” अशी आठवण अशोक सराफ यांनी मुलाखतीत सांगितली होती. (Marathi entertainment News)

पुढे अशोक सराफ म्हणाले होते की, “नाना पाटेकर आणि माझा सहवास फक्त आठ महिन्यांचा होता. आम्ही एकत्र काम केलं होतं. एक दोन चित्रपट आम्ही सोबत केले. पण त्याला सहवास म्हणता येणार नाही. पण ‘हमीदाबाईची कोठी’ नाटकाच्या निमित्ताने आम्ही आठ महिने एकत्र होतो. ‘हमीदाबाईची कोठी’ दरम्यान त्याची आणि माझी इतकी घट्ट मैत्री झाली जी आजपर्यंत आहे. महत्त्वाचं म्हणजे नाना पाटेकरही ते मानणारा आहे. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा स्वभाव. तो खडूस वाटतो, पण तसा तो नाही. तो सरळ आहे, फक्त स्पष्टवक्ता आहे. पण तो त्याचा गुणच आहे. मैत्रीला एकदम छान माणूस आहे. तुम्ही अडचणीत आहात सांगितलं तर तो केव्हाही मदतीला धावून येऊ शकतो. अंगावरचे कपडेही काढून देईल असा माणूस आहे,” असं सांगत अशोक सराफ यांनी नाना पाटेकर यांचं कौतुक केलं…
================================
हे देखील वाचा: Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!
=================================
दरम्यान, ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकाव्यतिरिक्त अशोक सराफ आणि नाना पाटेकर यांनी सावित्री, प्रतिघात आणि राघुमैना या चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली होती… तर नाना पाटेकर नुकतेच ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) मध्ये झळकले होते. तर अशोक सराफ लवकरच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटात दिसणार आहेत. (Nana Patekar and Ashok Saraf Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi