Jai Somnath Teaser: ‘मंदिरे पाडता येतात, श्रद्धा नाही!’, Sanjay Leela

“त्याच्या ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का?”; पिळगांवकरांच्या ट्रोलर्सला Ashok Saraf यांनी सुनावले खडे बोल
मराठी चित्रपटसृष्टीचा ९०चा ऐरा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने गाजवणारे २ दिग्गज कलाकार म्हणजे सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ (Ashok Saraf). मराठी विनोदी चित्रपटांची लाट आणणाऱ्या या दोन्ही कलावंतानी मराठी चित्रपटसृष्टी खऱ्या अर्थाने समृद्ध केली आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीतही दोघांनी उत्तम कामं केली आहेत. परंतु, सचिन पिळगांवकर यांना फारच ट्रोलिंगचा सामना त्यांनी सांगितलेल्या काही अनुभवांमुळे करावा लागला. यावर आता अशोक सराफ यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. नेमकं ते काय म्हणाले आहेत? जाणून घेऊयात.. (Sachin Pilgoankar Trolling)

तर, अशोक सराफ यांनी सचिन यांच्या ट्रोलिंगबाबत ‘मुंबई तक’शी बोलताना म्हटलं की, “निश्चितच वाईट वाटतं. कारण त्याने जे मिळवलंय ते सहजासहजी मिळवलेलं नाहीये. त्यासाठी त्याने कष्ट केलेत. त्याने प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आहे. तरुणपणीच त्याने दिग्दर्शन केलंय. त्याने संगीतसुद्धा दिलंय. त्याला एडिटिंगही येतं. हे सगळे प्रकार तो स्वत: शिकला आहे. तो काय बोलतो त्याच्यावरुन त्याला ट्रोल केलं जातं. त्याच्या ज्ञानावर ट्रोलिंग होत नाही. ज्ञानावर ट्रोल करा…एकाला तरी जमेल का? कारण तो काय करतोय किंवा काय नाही, हे त्यांना माहितच नाही. ट्रोलिंग करणं हा एक छंद झाला आहे. ट्रोल करून लोक विसरून जातात. काही जण तर तेच शोधत असतात की हा कुठे काय बोलतोय का किंवा सापडतोय का…”. त्यामुळे नक्कीच अशोक मामांनी ट्रोलर्सची तोंडं बंद केली आहेत शंकात नाही. (Ashok Saraf Reaction on Trollers)
================================
हे देखील वाचा : ….म्हणून Laxmikant Berde यांनी पिळगांवकरांचा ‘नवरा माझा नवसाचा’ रिजेक्ट केला!
================================
दरम्यान, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, दोघांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘नवरा माझा नवसाचा’ अशा अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. तसेच, नुकताच अशोक सराफ यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे ३’ (Punha Ekda Saade Maade Teen) हा चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस खरा उतरला आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi