Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

पद्मश्री Ashok Saraf यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, जाहिर झाला ‘हा’ पुरस्कार!
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) यांना नुकताच अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद कोल्हापूर शाखेतर्फे देण्यात येणारा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे… आजवर विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे…

मिळालेल्या माहितीनुसार अशोक सराफ यांना हा पुरस्कार ४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदान करण्यात येणार आहे… या पुरस्काराचं स्वरुप शाल, श्रीफळ, मानपत्र आणि ५१ हजार रोख असे असणार आहे… ५० वर्षांपेक्षा अधिक काळ मराठी नाट्यसृष्टीत अमुल्य योगदान दिल्याबद्दल त्यांचा हा सन्मान केला जाणार आहे…
================================
हे देखील वाचा : Ashok Saraf पद्मश्री अशोक सराफ यांची कारकीर्द
=================================
७०च्या दशकापासून इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अशोक सराफ यांनी कॉमेडी किंग ही ओळख निर्माण केली… नुकतेच ते वंदना गुप्ते यांच्यासोबत अशी ही जमवा जमवी चित्रपटात दिसले होते… यानंतर लवकरच त्यांचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट रिलीज होणार असून यात त्यांच्यासोबत भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत….(Movies of Ashok Saraf)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi