
वयाच्या ४४व्या वर्षी Aamir Khan याला मराठी बोलता यावं असं का वाटलं?
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) कायम त्याच्या चित्रपटांसोबत काही खास वक्तव्यांमुळे चर्चेत असतो… या वर्षी त्याचा ‘सितारे जमीन पर’ (Sitaare Zameen Par) हा चित्रपट रिलीज झाला होता… या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी आमिरने मराठी भाषेबदद्ल एक महत्वाचं विधान केलं होतं… तो म्हणाला होता की आधी मला मराठी बोलता ये नसल्यामुळे लाज वाटायची पण त्यानंतर मी मराठी शिकलो आणि ती चूक सुधारली…

मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही असे टोमणे कलाकारांनाही मारले जातातच.. पण या टोमण्यांचा राग न मानता आमिर खान याने चक्क ४४ व्या वर्षी मराठी भाषा शिकली होती… एका मुलाखतीत त्याने याचा किस्सा सांगताना म्हटलं होतं की, “मला थोडं थोडं मराठी बोलता येत. १५ वर्षांपूर्वी मला जाणवले की मला हिंदी, इंग्रजी बोलता येते. पण मराठी बोलता येत नाही. जेव्हा कोणी मराठीत बोलतात तेव्हा मला काही समजत नव्हते. माझी मातृभाषा उर्दू आहे ती मला बोलता येते पण वाचता येत नाही. तेव्हा माझी राज्यभाषा मराठी मला बोलता येत नसल्याची लाज वाटली. त्यामुळे तेव्हा मी मराठी शिकलो. मी चार वर्षे मराठीचे शिक्षण घेतले. मला सुहास लिमये यांनी मराठी शिकवली. आम्ही मराठीत गप्पा मारायचो. अनेक विषयांवर बोलायचो. तेव्हा मला मराठीचे महत्त्व समजलं.” (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Waves Summit 2025: “भारतात पुरेसे चित्रपटगृहच नाहीत…” आमिर खानची खंत
================================
दरम्यान, आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात तब्बल १० वर्षांनी जिनिलिया देशमुख हिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं होतं… तर, अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर असे नवे कलाकार झळकले होते… येत्या काळात आमिर खान ‘लाहौर १९४७’ या चित्रपटात सनी देओल आणि प्रिती झिंटा सोबत दिसणार आहे.. याशिवाय आणखी काही चित्रपटांमध्येही तो झळकणार आहे… (Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi