Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

“मला टोळी-काटा फरक पडत नाही, मी स्वत:साठी खेळणार”; Ruchita Jamdar

Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक,

Khote Sikkay : हॉलीवूड ‘करी वेस्टर्न’ टाईप सिनेमाचा भारतीय अवतार!

Virosh Wedding: व्हॉलीबॉल पूल पार्टी,जपानी खाद्यपदार्थांचा बेत अन् बरंच काही!

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा Tigheeचा ट्रेलर प्रदर्शित

Sai Tamhankar : “अमराठी कलाकारांच्या ग्लॅमरच्या नादात आपण आपल्याच मातीतील

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Ratan Tata : अतिशा नाईक म्हणते, “रतन टाटांना अमरत्व हवं होतं!”

 Ratan Tata : अतिशा नाईक म्हणते, “रतन टाटांना अमरत्व हवं होतं!”
मिक्स मसाला

Ratan Tata : अतिशा नाईक म्हणते, “रतन टाटांना अमरत्व हवं होतं!”

by रसिका शिंदे-पॉल 11/04/2025

बक्कळ पैसा असूनही काही माणसं त्यांच्या स्वच्छ, निर्मळ मनाने आणि त्यांच्या कर्तुत्वाने आपल्या मनावर अधिराज्य करतात. त्यापैकीच दोन नावं म्हणजे बाबा आमटे आणि रतन टाटा. रतन टाटा यांनी उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलीच पण समाजसेवा करुन लोकांची मनं देखील जिंकली. ही दोन्ही माणसं आपल्यातून कधीच निघून जाऊ नये असं प्रत्येकाला वाटतं. अशीच इच्छा मराठी अभिनेत्री अतिशा नाईकने (Atisha Naik) बोलून दाखवत देवाने त्यांना अमरत्व द्यायला हवं असं भावुक विधान तिने केलं आहे. नेमकं काय म्हणाली अतिशा जाणून घेऊयात…(Entertainment news)

अतिशा नाईकला आरपार चॅनलच्या मुलाखतीमध्ये तिच्या आदर्शांविषयी विचारण्यात आलं. तेव्हा अतिशाने दिवंगत बाबा आमटे आणि सर रतन टाटा यांची नावे घेत देवाने त्यांना अमरत्व द्यायला पाहिजे होतं असं म्हटलं. अतिशा म्हणाली, “रतन टाटा माझे आदर्श आहेत. मला सर रतन टाटा खूप आवडतात. माझं असं म्हणणं होतं की, परमेश्वराने कोणाला तरी अमरत्व द्यावं. हे खरे लोक आहेत आणि जे तुमच्या अमरत्वाने बदलणार नाहीत. त्यात माझ्यासाठी सर रतन टाटा पहिलं, कदाचित शेवटचं नाव आहे.” (Ratan tata news)

पुढे ती म्हणाली की, “तो माणूस इतका मोठा आणि महत्त्वाचा आहे की, ते जी पायवाट चालले असतील त्या पायवाटेच्या धुळीचा कण जरी मला मिळाला तरी माझ्या आयुष्यातील खूप गोष्टी या सुकर होतील. त्यामुळे रतन टाटा (Ratan Tata) मला खूप आडवतात. शिवाय बाबा आमटेही  (Baba Amte) आवडतात किंवा प्रकाश आमटे हेदेखील. ज्यांनी त्यांच्या कामात स्वत:ला अगदी झोकून दिलं आहे.” (social workers)

रतन टाटा, बाबा आमटे आणि प्रकाश आमटेंबद्दल अधिक भरभरुन बोलताना अतिशा म्हणाली की, “त्यांच्यातला खरेपणा दिसतो. त्यांचं काम दिसतं. कोणी म्हणणार आहे का प्रकाश आमटे अवॉर्ड घ्यायला सिल्कच्या झब्ब्यात का आले नाहीत. त्यांना ते शक्य आहे. अनेक लोक त्यांना मोठमोठ्या गाड्या पुरवतील. पण जो माणूस इतके वर्ष साधेपणातच जगला त्याला नंतर हे सगळं खूप खोटं आणि क्षुल्लक वाटायला लागतं.” (Entertainment)

===============================

हे देखील वाचा:  Devika Rani : हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली आधुनिक नायिका! 

===============================

अतिशा नाईक हिने आजवर नाटक, मालिका आणि चित्रपटामंध्ये उल्लेखनीय कामं केली आहेत. ‘हसा चकट फू’, ‘घाडगे अँड सून’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आभाळमाया’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.(Atisha naik serilas)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat Celebrity News Entertainment Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.