राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Bharat Jadhav : ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचा जगभरात डंका!
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपट आणि प्रेक्षकांसाठी फार खास आहे असं वाटत आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत असून प्रेक्षक हिंदी प्रमाणेच मराठी चित्रपटांनाही पुन्हा गर्दी करत असल्याचं सुखद चित्र दिसून येत आहे. १ मे रोजी हिंदीच्या’ रेड २’ सोबत ‘गुलकंद’ आणि ‘आता थांबायचं नाय’ हे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले. प्रेक्षकांनी या दोन्ही चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद दिला असून जगभरात भरत जाधव यांच्या या चित्रपटाने जोरदार डंका वाजवला आहे…(Marathi Movies)

सॅकनिल्कच्या माहितीनुसार,’आता थांबायचं नाय’ (Aata Thambayach Naay) या चित्रपटाने आत्तापर्यंत देशभरात ६.६८ कोटी आणि जगभरात ७.४४ कोटी कमावले आहेत… प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून मुंबईच्या सफाई कामगाराची गोष्ट प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे… भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी,पर्ण पेठे, सिद्धार्थ जाधव, आशुतोष गोवारीकर, प्राजक्ता हनमघर अशा अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Atta thambaych nay box office collection)
================================
हे देखील वाचा: एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar ?
=================================
झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे. गुलराज सिंग यांचं धमाकेदार संगीत आणि मनोज यादव यांचे साजेसे गीतलेखन या चित्रपटाला लाभले आहे.(Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi