Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Avadhoot Gupte : ‘आई’ या भावस्पर्शी अल्बमध्ये दिसणार ‘हा’ अभिनेता !
संगीतविश्वातील गायक, संगीतकार व निर्माता अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) आपल्या चाहत्यांसाठी एक आगळा-वेगळा भावनिक अल्बम घेऊन आले आहेत. ‘आई’ (Aai) या अतिशय सर्वाच्याच जिव्हाळ्याच्या विषयावर आधारित असलेला हा चार गाण्यांचा अल्बम प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Avadhoot Guptes Aai New Album)

अल्बममधील पहिले गाणे ‘सोप्पं नव्हं माय’, नुकतेच प्रदर्शित झाले असून याचे गीतलेखन वैभव जोशी (Vaibhav Joshi) यांनी केले आहे. यात लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब (Actor Prathmesh Parab) झळकत असून, एक हळवं आणि संवेदनशील दृश्यरूप यात पाहायला मिळत आहे.

या अल्बमच्या पार्श्वभूमीवर ‘आई’ या संकल्पनेवर आधारित एक विशेष पॉडकास्ट ही सादर करण्यात आले आहेत. आणि या पॉडकास्टमध्ये ‘आई‘ या नात्याचा भावनिक वेध घेत कलाकार मंडळींनी आपल्या अनुभवांची मनमोकळी चर्चा ही केली आहे.(Avadhoot Guptes Aai New Album)
=========================
=========================
या अल्बम बद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, “आई या नात्याला शब्दांत पकडणं शक्य नाही, परंतु गाण्यातून त्या भावना पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला आहे. ही केवळ गाणी नाहीत, तर प्रत्येकाची एक व्यक्तिशः भावना आहे, आईसाठी. ‘आई’ या नात्याच्या असंख्य पदरांना स्पर्श करणारा हा अल्बम प्रेक्षकांना नक्कीच भावेल, अशी आशा आहे.”