Sania Mirza चा 6 वर्षांचा मुलगा बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? Farah

Avinash Narkar पाठवणीला ऐश्वर्यासोबत अविनाश नारकर देखील रडले, जाणून घ्या त्यांच्या लग्नाचा किस्सा
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा, मोठा आणि अविस्मरणीय दिवस असतो. सगळेच आपल्या लग्नाची कळत नकळतपणे तयारी करत असतात. प्रत्येकाच्या डोक्यात आपल्या लग्नात आपल्याला नक्की काय करायचे, कसा लूक पाहिजे, कसे डेकोरेशन पाहिजे आदी सर्वच गोष्टींचे प्लॅनिंग करत असतात. आजच्या काळात तर लग्न म्हणजे अतिशय मोठा आणि काही अंशी प्रतिष्ठेचा सोहळा झाला आहे. (Avinash Narkar)
मात्र आपण लग्नाच्या आधी किती प्लॅनिंग केली, सर्व नीट ठरवलेले असले तरी त्या दिवशी अशी काहीतरी घटना घडते किंवा अशी गोष्ट घेते जी कायम आपल्या लक्षात राहते आणि आपले लग्न संस्मरणीय करून टाकते. याला कलाकार देखील अपवाद नाही. नुकतेच जेष्ठ मराठी अभिनेते अविनाश नारकर (Avinash Narkar) यांनी त्यांच्या लग्नाचा एक गमतीदार किस्सा एका मुलाखतीदरम्यान सर्वाना सांगितला आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील एव्हरग्रीन आणि आदर्श कपल म्हणून अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर (Avinash narkar and Aishwarya narkar) यांच्या जोडीकडे पाहिले जाते. या दोघांनी मोठ्या सचोटीने आपले लग्न निभावले आहे. मनोरंजनविश्वात काम करताना हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पट मंगनी पट ब्याह असे त्यांचे लग्न होते. अविनाश नारकर यांनी त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, त्यांच्या लग्नात ते स्वतः पाठवणीच्या वेळेस रडले होते.(Marathi Latest News)
अविनाश नारकर यांनी त्यांच्या लग्नाचा किस्सा सांगताना म्हटले की, “आजच्या काळात एक एक आठवडा पंधरा – पंधरा दिवस लग्न चालतात. अनेक नानाविध प्रकरचे कार्यक्रम यात संपन्न होतात. आमच्या वेळी संगीत वगैरे कोणतेही प्रकार नव्हते. एका दिवसात आमचे लग्न झाले होते. आमच्यावेळी एका दिवसात किंवा दीड दिवसात लग्न व्हायचे. आमचे लग्न एका दिवसात झाले. ऐश्वर्याने मला आधीच सांगितले होते की आपल्या लग्नात सगळे विधी झालेच पाहिजे. एका दिवसात लग्न होणार आणि त्यातही सगळे विधी होणार असल्यामुळे ऐश्वर्या आणि तिचे कुटुंब डोंबिवलीवरुन सकाळी लवकर निघाले होते. (Entertainment mix masala)

आमच्या लग्नाच्या वेळी दोघांच्याही आई – वडिलांना लग्नानासाठी फार काही त्रास झाला नाही. ते लगेच आमच्या लग्नाला तयार झाले. त्यांनी लग्नासाठी लगेच हो म्हटले आणि मग लगेच एक दिवस लग्नासाठी ठरवला आणि त्या दिवशी आमचे लग्न झाले. ऐश्वर्या आणि तिचे कुटुंब डोंबिवलीवरुन आणि मी आणि माझे कुटुंब करी रोडवरुन माटुंग्याला पोहोचलो. तिथे आमचे एका दिवसात लग्न झाले. लग्नाचे विधी, पाठवणी, रडणं आदी सर्वच त्या एका दिवसात झाले. ऐश्वर्याच्या पाठवणीच्या वेळी तर मी सुद्धा तिच्यासोबत रडलो होतो.” (Celebrity Interviews)
========
हे देखील वाचा : Lata Mangeshkar संगीतविश्वाला पडलेले सुमधुर स्वप्न भारतरत्न लता मंगेशकर
========
ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांनी ३ डिसेंबर १९९५ मध्ये लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, अविनाश आणि ऐश्वर्या यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, हे दोघे सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून ते नेहमीच नवनवीन ट्रेंड्स फॉलो करत त्यांचे व्हिडिओ शेअर करत असतात. ट्रेंडिंग गाण्यांवर देखील ते डान्स रील्स बनवत ते सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करतात. त्यांच्या डान्स रील्समुळे या दोघांना अनेकदा ट्रोलसुद्धा केले जाते. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात किंवा कधी कधी ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील देतात.
अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ते मालिका विश्वामध्ये प्रसिद्ध असून, अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारताना दिसतात. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेमध्ये झळकत आहेत. तर ऐश्वर्या नारकर यांच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला.