दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शोमॅन सुभाष घई (subhash ghai) एकदा म्हणाले होते “गीतकार आनंद बक्षी यांना मला चित्रपटातून काय सांगायचं आहे ते खूप लवकर कळायचं त्यांना फारसं समजावून सांगायला लागायचं नाही. त्यामुळे गाण्याच्या सिच्युएशनची जागा आणि प्रसंग सांगितला की ते आपसूकपणे माझ्या मनातील भावना त्यांच्या शब्दातून उतरवायचे”. एक दिग्दर्शक आणि गीतकार यांचं इतकं चांगलं ट्युनिंग दुसरीकडे क्वचितच पाहायला मिळतात.
गोल्डन इरा मध्ये असे अनेक कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतात पण नंतरच्या काळामध्ये मात्र याची दुर्मिळ उदाहरणं सापडतात त्यापैकी हे एक होतं.” सुभाष घई (subhash ghai) यांच्या ‘गौतम गोविंदा’(१९७८) या चित्रपटात पहिल्यांदा आनंद बक्षी यांनी गाणी लिहिली आणि त्यानंतर पुढची वीस-पंचवीस वर्ष आनंद बक्षी सुभाष घई यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी लिहीत होते. या दरम्यान काही वेळेला सुभाष घई यांनी संगीतकार बदलले पण गीतकार मात्र कायम आनंद बक्षीच ठेवले. १९८० साली सुभाष घई यांनी ‘कर्ज’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या सिनेमाच्या एका गाण्याच्या मेकिंग ची गोष्ट खूप भन्नाट आहे.
‘कर्ज’ हा चित्रपट पुनर्जन्मावर आधारित होता. हॉलिवूडच्या “The Reincarnation of Peter Proud,” या सिनेमावर ‘कर्ज’ आधारलेला होता. पण भारतात जेव्हा हा सिनेमा बनला त्याला एक म्युझिकल टच देण्यात आला. या चित्रपटात एक गिटारची ट्यून होती जी या सिनेमाची थीम होती आणि सिनेमात बऱ्याचदा ही धून वाजवली गेली. ही ट्यून गोरख शर्मा यांनी वाजवली होती. गोरख शर्मा हे संगीतकार प्यारेलाल यांचे धाकटे बंधू. त्यांनी स्वतंत्ररित्या देखील काही चित्रपटांना संगीत दिलं होतं. गोरख शर्मा हे बास गिटारिष्ट होते. ‘कर्ज’ या चित्रपटातील हि धून आज मोबाईलच्या काळामध्ये देखील तितकीच लोकप्रिय आहे.
या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला सुभाष घई (subhash ghai) यांना एक गाणं हवं होतं आणि हे गाणं या लोकप्रिय गिटार ट्यून वर हवं होतं. त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना तशी कल्पना सांगितली. संगीतकारांनी सुभाष घई यांना सांगितले,” तुम्ही आनंद बक्षी यांना गाणं लिहायला सांगा. खरं तर एवढ्या छोट्या इन्स्ट्रुमेंटल पीस वर गाणं लिहिता येईल की नाही आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आनंद बक्षी यांना भेटा. दुसऱ्या दिवशी सुभाष घई आनंद बक्षी यांच्या घरी गेले आणि त्यांना त्या गिटारच्या पीस वर गाणे लिहायला सांगितले.
गीतकार आनंद बक्षी यांनी सुभाष घई (subhash ghai) यांना विचारले,” तुम्हाला या गाण्यातून नेमकं काय अभिप्रेत आहे?” त्यावर सुभाष जी म्हणाले, ”हे गाणे चित्रपटाच्या क्लायमॅक्सला येते आणि मला या गाण्यामधून संपूर्ण चित्रपटाची स्टोरी प्रेक्षकांना पुन्हा सांगायची आहे. या गाण्याच्या वेळेला त्या कलाकाराच्या आताच्या वर्तमान जीवनातील आणि मागच्या आयुष्यातील काही पात्र देखील उपस्थित आहेत. हे सर्व लक्षात घेऊन तुम्ही गाणं लिहा.” आनंद बक्षी यांनी ते आव्हान पेलले आणि दुसऱ्या दिवशी ते म्युझिक सीटिंगला गेले. दुसऱ्या दिवशी एलपी यांना त्यांनी पुन्हा एकदा ठेवून वाजवायला सांगितले आणि लगेच कागद आणि पेन काढून घ्यायला सुरुवात केली.
आनंद बक्षी बहुतेक आपली सर्व गाणी उर्दू भाषेत लिहित असत. गाणं लिहून झाल्यानंतर त्यांनी ते गाणं डिक्टेट केलं. सुभाष घई (subhash ghai) यांनी ते हिंदीमध्ये लिहून घेतले. लिहिता लिहिता सुभाष जी यांच्या लक्षात आले की गाणं खूप मोठं झालय पण त्यांच्या असे देखील लक्षात आलं की काय फंटास्टिक लिहिलं आहे! आनंद बक्षी यांच्या या गाण्यात संपूर्ण सिनेमा कव्हर होतो. हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात रेकॉर्ड झालं.
==============
हे देखील वाचा : सिनेमात सिच्युएशन आणि गाण्यात लॉजिक नसताना ही, दोन्ही झाले सुपर हिट!
==============
तब्बल साडेसात मिनिटाचं हे गाणं होतं. गाण्याचे बोल होते ‘एक हसीना थी एक दीवाना था!’ सुभाष घई (subhash ghai) आणि आनंद बक्षी यांचे कॉम्बिनेशन जबरदस्त होतं. त्यांनी सुभाष जी च्या १४ चित्रपटातून जवळपास ७५ गाणी लिहिली होती आणि बहुतेक सगळ्या सिनेमातील गाणी खूप गाजली होती. बऱ्याच सिनेमात एक थीम सॉंग असायचेच. कर्मा चित्रपटातील ‘हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए’ ‘मेरी जंग’ या चित्रपटातील ‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ आणि ‘ ताल’ चित्रपटातील ‘इश्क बिना क्या जीना यारो…’