‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, जाणून घ्या कधी आणि कुठे प्रदर्शित होणार चित्रपट
चित्रपटसृष्टीत आतापर्यंत असे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत, जे महिलाप्रधान चित्रपट आहेत. लवकरच या यादीत आणखी एका चित्रपटाचे नाव जोडले जाणार आहे. आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप तिच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या जगात पाऊल ठेवणार आहे. ताहिरा कश्यपचा पहिला चित्रपट ‘शर्माजी की बेटी‘ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटाच्या प्रीमिअरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे, ज्यात चित्रपटाच्या रिलीज डेटपासून अनेक माहिती ची घोषणा करण्यात आली आहे.(Tahira Kashyap Movie)
ताहिरा कश्यपच्या ‘शर्माजी की बेटी’ या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 28 जून रोजी प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम केला जाणार आहे. गेल्या वर्षी जिओ मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता, त्यानंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या ग्लोबल प्रीमिअरची घोषणा केली आहे. अॅप्लॉज एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि एलिप्सिस एंटरटेनमेंट प्रॉडक्शननिर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप ने केले आहे.
आकांक्षा, स्वप्ने आणि तरुणाईच्या रोलरकोस्टर राइडवर प्रेक्षकांना घेऊन जाणारा हा चित्रपट २८ जून रोजी भारतात आणि २०० हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. शर्माजी की बेटी हा प्राइम मेंबरशिपमध्ये समाविष्ट होणारा नवीन चित्रपट आहे. ‘शर्माजी की बेटी’ ही महिला सक्षमीकरण आणि त्यांच्यासमोरील आव्हानांची कथा आहे. अगदी साधेपणाने भरलेली ही कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करेल असा विश्वास सिनेमाच्या टीमला आहे.(Tahira Kashyap Movie)
==============================
हे देखील वाचा: चित्रपट कलाकारांची संघर्ष कहाणीवर आधारित वेबसिरिज ‘इंडस्ट्री’चा ट्रेलर प्रदर्शित
==============================
हा चित्रपट तीन मध्यमवर्गीय महिला आणि दोन लहान मुलींसह पाच महिलांच्या जीवनावर आधारित आहे. या सर्वांचे आडनाव ‘शर्मा‘ म्हणजे सारखेच आहे. त्यांची जनरेशन गॅप दाखवणारा हा चित्रपट त्यांचे अनोखे अनुभव आणि संघर्ष समोर आणणारा आहे. सिनेमाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर साक्षी तंवर, दिव्या दत्ता आणि सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत, तर वंशिका तापरिया, अरिस्ता मेहता, शारिब हाश्मी आणि परवीन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत.