Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

B. R. Chopra : बी आर चोप्रा यांच्या अनुभवातून तयार झालं ‘हे’ गाण !
आयुष्यात घडलेल्या काही घटनांवरून पुढे कधीतरी त्या आठवणींवर एखादी रचना तयार होऊ शकते? निर्माता दिग्दर्शक बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांच्या तरुणपणी आलेल्या नैराश्याच्या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांना दिलेल्या काही उपदेशांमुळे त्यांच्या आयुष्य सावरले आणि त्यातूनच पुढे अनेक वर्षांनी एका लोकप्रिय गाण्याचा जन्म झाला ! हे गाणं अनेक लोकांकरिता प्रेरणादायक ठरलं. भारतीय लष्करातील जवानांना तर हे गाणं एक स्फूर्ती गीत म्हणून वाटू लागलं. या गाण्याला त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. अनेक अर्थाने हे गाणं आज देखील पन्नास-साठ वर्षानंतर देखील तितकेच लोकप्रिय आहे. कोणतं होतं ते गाणं? कोणता होता तो चित्रपट? आणि काय होता तो नेमका किस्सा ?

बलदेव राय चोप्रा तथा B. R. Chopra लहानपणापासूनच अभ्यासात अतिशय कुशाग्र बुद्धीचे. एम ए इंग्लिश लिटरेचर ते देखील पहिल्या श्रेणीमध्ये ते उत्तीर्ण झाले होते. हा काळ भारताच्या पारतंत्र्याचा होता. त्या काळात बी आर चोप्रा लाहोर येथे राहत होते. खरंतर त्यांना आयसीएस करायचे होते त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील सुरू केली होती. आयसीएस परीक्षा क्वालीफाय करून कलेक्टर होऊन जनतेची सेवा करावी अशी त्यांच्या घरच्यांची देखील इच्छा होती. सर्वांच्या शुभेच्छा बलदेव यांच्या पाठीशी होत्या.
बलदेवने देखील अपार मेहनत या परीक्षेसाठी घेतली होती. पण दुर्दैवाने त्यांना परीक्षेच्या काळातच विषमज्वर झाला. ते परीक्षा देवू शकले नाही पर्यायाने क्वालिफाय होऊ शकले नाहीत. बलदेव राय चोप्रा अतिशय निराश झाले. जे स्वप्न उराशी अनेक वर्ष धरलं होतं ते एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. बलदेव चोप्रा (B. R. Chopra) डिप्रेशनमध्ये गेले. त्यांनी अन्न पाणी सोडून दिल. ते कायम दुःखात राहू लागले. रात्री तर त्यांना हे दुःख खूप छळू लागलं. एकदा तर त्यांनी आयुष्याचा द एंड करण्याचा विचार देखील केला.
त्यांचे कुटुंबीय देखील आता बलदेव (B. R. Chopra) यांची ही अवस्था होऊन खूप काळजीत पडले. पण अशावेळी बलदेव यांचे वडील त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी एकदा त्याला आपल्या खोलीत बोलावले. खोलीचे दार बंद केले आणि त्याला सांगितले, ”आयुष्यात एक संधी गेली म्हणजे काही आयुष्य संपत नाही. मुळात आयुष्य जगणे हेच संघर्षाचे दुसरे नाव आहे. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींनी निराश कधी व्हायचं नाही आणि परीक्षेत अपयश आलं म्हणजे आयुष्य संपलं असं कधीच नसतं. तू अशी काय चूक केली आहेस? तू तुझ्या पद्धतीने खूप प्रयत्न केलास पण दुर्दैवाने परीक्षेत क्वालिफाय झाला नाहीस म्हणून तू काय हुशार नाही असे होते का? आयुष्यात संकटाला कधीच घाबरायचं नसतं. उलट त्याच्यावर स्वार होऊन त्याच्याशी मुकाबला करायचा असतो! आयुष्यात दुःखाचे किती जरी पहाड आले तरी त्याचा हसत हसत मुकाबला करायचा असतो. तेव्हा दुःख विसर. आयुष्यात जेव्हा एक दार बंद होते तेव्हा नवी चार दारं उघडलेली असतात. तेव्हा उद्यापासून पुन्हा नव्याने सुरुवात करा. नवीन अनेक क्षेत्र तुझी वाट पाहत आहेत!”
===============
हे देखील वाचा : Sridevi : ‘या’ सिनेमातील ‘तांडव’ नृत्य करायला श्रीदेवी का तयार नव्हत्या ?
===============
वडिलांच्या या आश्वासक शब्दांनी बलदेव यांच्या शरीरातून वीज चमकून गेली. त्यांच्यात एक आमुलाग्र बदल झाला. त्यांनी लगेच स्वतःला सावरले. त्यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि लाहोरच्या एका साप्ताहिकांमध्ये ते संपादक म्हणून रुजू झाले. हे फिल्मी साप्ताहिक होते. या साप्ताहिकाची चर्चा संपूर्ण हिंदुस्तानात होत असे. फाळणी नंतर ते मुंबईत आले आणि चित्रपटाच्या दुनियेत रुजू झाले. वडिलांची ती शिकवण त्यांना आयुष्यावर कामी आली.
एवढेच नाही ते १९६८ साली ‘हमराज’ हा चित्रपट ते निर्माण करत होते. या चित्रपटात एक सिच्युएशन होती त्यातील नायिका विम्मी आयुष्यात आलेल्या अनपेक्षित दुःखाने पूर्णपणे खचून गेलेली असते आपल्या आयुष्यातील सर्व काही संपले आहे आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असं तिला वाटत असतं. त्यावेळी चित्रपटाचा नायक सुनील दत्त तिच्या नैराश्यावर मात करण्यासाठी एक गीत गातो अशी सिच्युएशन होती.

गीतकार साहीर लुधियानवी यांना बी आर चोप्रा (B. R. Chopra) यांनी हे गीत लिहिताना आपल्या लहानपणीची ती गोष्ट सांगितली आणि वडिलांनी दिलेला उपदेश सांगितला. साहीर त्या स्टोरीने प्रभावित झाले. त्यातीलच की वर्ड्स घेऊन साहीर यांनी अप्रतिम गाणे लिहिले ‘ना मुंह छुपाके जिओ ना सर झुका के जियो गमों का दोर भी आये तो मुस्कुराके जियो..’ हे गाणं महेंद्र कपूर यांनी आपल्या पहाडी आवाजामध्ये अतिशय अप्रतिम रित्या गायले. त्या प्रसंगाला हे गाणे चपखल बसले. या गाण्याला संगीत होतं रवि यांचं होतं. हे गाणं त्या काळात तर प्रचंड गाजलच पण आज देखील तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्याला त्या वर्षीचा फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला!