
Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते घडले!
‘हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हात होता है…’ तुम्ही म्हणाल की आज मला झालंय तरी काय? पण खरंच पुरुषाला त्याच्या करिअरमध्ये मदत करणारी त्याची आई, बायको, बहिण यांचा वाटा नक्कीच असतो… मात्र, पुरुषप्रधान संस्कृतीत एखादी बाई घरातील काम करण्यासोबतच घराची पर्यायाने नवऱ्याची देखील आर्थिक जबाबदारी घेऊ शकते हा विचार अजूनही समाजमान्य नाही… आज आपण बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्यांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्यांच्या बायकोने त्यांना करिअरच्या स्ट्रगल काळात त्यांना मदत केलीये…..(Bollywood News)

पहिला अभिनेता ज्याने अभिनयाच्या करिअरची सुरुवात हिंदी मालिकांमधून केली… मालिकाविश्वात प्रसिद्ध असूनही त्याने चित्रपटात जाण्याचा निर्णय घेतला आणि एक नवी सुरुवात केली.. तो अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी (Vikrant Massey).. १-२ वर्षांपूर्वी एका मुलाखतीत विक्रांतने त्याच्या बायकोने त्याला financial मदत कशी केली याबद्दल तो असं म्हणाला होता की, “वयाच्या २४व्या वर्षापासून तो मालिकेत काम करत होता आणि त्यावेळी तो दर महिना ३५ लाख कमवत होता.. मालिकेत करिअर सेट झालं असताना अगदी करिअरच्या पीकवर असताना मी चित्रपटांत जायचा विचार केला आणि माझ्या बायकोने मला सर्पोट केला…” मालिकाविश्वाला रामराम केल्यानंतर चित्रपटात काही संधी मिळाली नाही आणि विक्रांतची जमापुंजी संपली.. त्या काळात विक्रांतची बायको शीतल हिने त्याला आर्थिकरित्या पाठबळ दिलं.. विक्रांत दरदिवशी वेगवेगळ्या जागी ऑडिशन्स द्यायला जायचा आणि शीतल मात्र खंबीरपणे त्याच्या मागे उभी राहिली होती..(Entertainment News Tadaka)

आपला पुढचा सेलिब्रटी आहे आपल्या सगळ्यांचा लाडका कालिन भैय्या.. अर्थात द ग्रेट पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi)… इंडस्ट्रीत कोणताही बॅकअप किंवा ओळख नसताना त्यांनी अभिनेता होण्याचं स्वप्न पाहात मुंबई गाठली… मृदुला त्रिपाठी यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर ८ वर्ष होऊनही त्यांच्याकडे काहीच काम नव्हतं… मात्र, या काळात मृदुला यांनी नोकरी करत, घर आणि पंकज यांनाही सांभाळलं…एकीकडे पंकज त्रिपाठी आपलं अभिनेता होण्याचं स्वप्न पुर्ण करण्याच्या वाटेवर होते तर दुसरीकडे मृदुला त्रिपाठी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या…पंकज यांनी better india शी बोलताना एकदा म्हटलं होतं की, “माझ्याकडे माझ्या स्ट्रगलच्या काळाची कोणतीही sad बाजू नाहीये.. म्हणजे मी फुटपाथवर झोपलो होतो किंवा बरेच दिवस भुकेला होतो.. त्याचं कारण माझी बायको आहे.. कारण तिने माझी आणि कुटुंबाची जबाबदारी तिच्या खांद्यावर घेतली आणि आज मी एक अभिनेता म्हणून तिच्यामुळेच घडलो … खरं तर मी सगळ्यांना सांगतो she is the man of the house…”(Latest Bollywood News)

आता या पुढचा जो अभिनेता आहे त्याने केवळ भारतातच नाही तर जगभरात आपल्या नावाचा एक ब्रॅण्ड तयार केलाय.. तो म्हणजे किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan)… आज जरी तो हजारो कोटींचा मालक असला तरी त्याची सगळी मन्नत ही त्याची बायको गौरी खान हिने त्याच्या पाठीशी उभी राहून पुर्ण केलीये… दिल्लीहून मुंबईला आलेल्या शाहरुख खानकडे काही दिवस पुरतील इतकेच पैसे होते… ना काम होतं ना राहायला घर.. पण बॉलिवूडवर राज्य करण्यासाठी आलोय इतकं मात्र शाहरुखचं ठरलं होतं… ज्यावेळी शाहरुख the king khan नव्हता तेव्हा त्याची बायको गौरी याने त्याला सपोर्ट केला होता… गौरीने mentally आणि financially सपोर्ट केल्यामुळेच मी काहीतरी करु शकलो असं शाहरुखने त्याच्या अनेक इंटरव्ह्यु मध्येही म्हटलंय… इतकंच नाही तर एकदा करण जोहरशी बोलताना शाहरुखने cofresss केलं होतं की करोना काळात गौरी ही आमच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती….(Entertainment News In Marathi)

या पुढच्या अभिनेत्याने radio jockey म्हणून सुरुवात केली आणि नंतर बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली… २०१२ मध्ये ‘विकी डोनर’ चित्रपटातून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) याने स्वत:ला सिद्ध करेपर्यंत त्याचा प्रवास काही सोप्पा नव्हता… त्याच्या स्ट्रगलींगच्या काळात त्याची बायको ताहिरा कश्यप त्याच्यासोबत उभी होती.. शाळेत शिक्षिकेची नोकरी करत घराची आर्थिक जबाबदारी ती सांभाळत होती.. आयुष्यमानने एका इंटव्ह्युमध्ये सांगितलेलं की, “जेव्हा मी ताहिरासोबत लग्न केलं तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते.. असं असूनही तिने माझ्याशी केवळ माझ्यावर असणाऱ्या प्रेमापोटी लग्न केलं..तिने मला माझं passion follow करायला सांगितलं आणि ती तिची PR Firm आणि नोकरी दोन्ही सांभाळत होती… she is the strongest piller behind my acting career….”, असं तो म्हणाला होता…

आता शेवटचा अभिनेता म्हणजे family man मधला जे के तळपदे अर्थात शारीब हाश्मी (Sharib Hashmi)… त्याने वयाची तिशी क्रोस केल्यानंतर अभिनय आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये सुरुवात केली.. नोकरी सोडून शारीबने इंडस्ट्रीत नव्याने सुरुवात खरं तर केली होती… एका इंटरव्हयूमध्ये शारीब म्हणाला होता की, “ज्यावेळी मी माझ्या बायकोला नासरिनला सांगितलं की मला अॅक्टिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यावेळी तिने मलला सपोर्ट केला.. इतकंच नाही तर त्याआधी आम्हाला बाळ झाल्यानंतर तिने तिची नोकरीही सोडली होती… पण जेव्हा माझ्या करिअरचा नवा प्रवास सुरु होणार होता त्यावेळी पु्न्हा तिने नोकरी केली आणि माझं घर आर्थिकरित्या सांभाळलं… त्यामुळे हो मी काही काळ नक्कीच माझ्या बायकोच्या आर्थिक मदतीवर होतो आणि आज मी त्यामुळेच यशस्वी झालोय…”
================================
=================================
कदाचित आता आपण ज्या कलाकारांबद्दल बोललो त्यापेक्षा असे बरेच अभिनेते असतील ज्यांच्या बायकोच्या सपोर्टमुळे आज ते स्टार्स आहेत… पण आता आपण ज्या अभिनेत्यांबद्दल बोललो त्यांनी पुढाकार घेत पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्या बायकोला यशस्वी करिअरचं क्रेडिट दिलंय… शिवाय या प्रत्येक कलाकाराच्या बायकोने केवळ त्यांच्या यशात नाही तर वाईट काळातही साथ देत एक आदर्श नक्कीच मांडला आहे….(Bollywood Gossips)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi