महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई
विकी कौशल स्टारर ‘बॅड न्यूज’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. 19 जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये दाखल होणारा हा चित्रपट चाहत्यांना आवडत आहे. त्यामुळेच अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर तब्बल २० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आणि त्याचमुळे विकी कौशलच्या हिट लिस्टमध्ये या चित्रपटाचा समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या वीकेंडमध्ये ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाने तीन दिवसांत ३०.६२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने शुक्रवारी ८.६२ कोटी, शनिवारी १०.५५ कोटी आणि रविवारी ११.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे . म्हणजेच या चित्रपटाने तीन दिवसांत एकूण तब्बल ३०.६२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या या शानदार सुरुवातीमुळे निर्माते ही खूप खूश आहेत.(Bad Newz Box Office Collection)
‘बॅड न्यूज’ या चित्रपटाची कथा एका अनोख्या विषयावर आधारित आहे. या चित्रपटातील विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. चित्रपटाचे संगीतही लोकांना आवडत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद तिवारी यांनी केले आहे. ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाचे अभिनेते आनंद तिवारी यांनी ‘बॅड न्यूज’ या चित्रपटाचीची निर्मिती केली आहे. या सिनेमाचे संपूर्ण बजेट 80 कोटी होते. आणि आता पहिल्याच दिवशी ८.६२ कोटींची कमाई करणारा ‘बॅड न्यूज’ विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे.
‘बॅड न्यूज‘ हा अक्षय कुमारच्या गुड न्यूज चित्रपटाचा स्पिरिच्युअल सिक्वेल आहे. गुड न्यूजचे लाइफटाइम कलेक्शन २०१.१४ कोटी रुपये होते आणि हा चित्रपट ही बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता विकी कौशल स्टारर ‘बॅड न्यूज‘ बॉक्स ऑफिसवर त्याच्या प्रीक्वेलप्रमाणे कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.(Bad Newz Box Office Collection)
=========================
=========================
इतर चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर कल्की 2898 एडीने भारतात 616.7 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात १००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हिंदुस्थानी 2 ने भारतात 75.54 कोटी आणि जगभरात 132 कोटींची कमाई केली आहे. सरफिराचे भारतात कलेक्शन २१.२२ कोटी आणि वर्ल्डवाइडमध्ये २८.२ कोटींवर पोहोचले आहे. तर किलने भारतात 20.08 कोटी आणि जगभरात 41 कोटींचा गल्ला जमवला आहे.