Taath Kana Movie Trailer: जिद्द आणि संघर्षाची उत्कंठावर्धक कथा दाखवणाऱ्या

Bahubali : The Epic चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा!
एस.एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लूजन’ या दोन्ही चित्रपटांना एकत्रित करत ‘बाहुबली : द एपिक’ हा चित्रपट ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जगभरात रिलीज झाला… चित्रपटाच्या दोन्ही भागांनी वैयक्तिक इतिहास रचले असताना आता या तिसऱ्या मर्जर भागाने प्रेक्षकांना वेडलं केलं आहे… या नव्या व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून पहिल्याच दिवशी १० कोटींचा गल्ला पार केला आहे…
सॅकनिलकच्या माहितीनुसार ‘बाहुबली : द एपिक’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ९.२५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी २.६४ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण १३.०४ कोटींची कमाई केली आहे… तसेच, Sacnilk च्या अहवालानुसार, ‘बाहुबली: द एपिक’ने महेश बाबूच्या ‘खलीजा’ आणि ‘लोका चॅप्टर 1 चंद्रा’ या चित्रपटांना मागे टाकलं आहे.

राजामौली दिग्दर्शित आणि प्रभास, राणा दग्गुबाती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत.. ‘बाहुबली द एपिक’ हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2D, 4DX, IMAX 2D आणि डॉल्बी सिनेमा 2D मध्ये देखील प्रदर्शित झाला आहे.
================================
हे देखील वाचा : दिग्दर्शक एस.एस.राजामौलींच्या Bahubali Franchiseच्या अद्भूत गोष्टी!
================================
जगभरात ११५० पेक्षा अधिक स्क्रीनवर रिलिज झालेला ‘बाहुबली: द एपिक’ अमेरिकेत ४०० पेक्षा जास्त स्क्रीन, ब्रिटन आणि आयर्लंडमध्ये २१०स्क्रीन, तसेच UAE, ऑस्ट्रेलिया आणि साउथ ईस्ट एशिया मधील अनेक ठिकाणी हा चित्रपट दाखवला जात आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi