Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Balasaheb Thackeray : संजय तुरुंगातून बाहेर काढण्यात बाळासाहेबांचं योगदान
अभिनेता संजय दत्त याला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. ५ वर्ष तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर संजय दत्त बाहेर आला होता, पण त्याला तुरुंगातून सोडवणं सोप्पं नव्हतं त्यासाठी आम्ही खुप कष्ट केल्याचं ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले. निर्माते राजन लाल यांच्या बायोग्राफी लॉंच सोहळ्याला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी संजय दत्तला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी फार मदत केली होती असं म्हटलं. नेमकं काय म्हणाले सिन्हा जाणून घेऊयात… (Entertainment tadaka)
बाळासाहेबांमुळे संजय दत्त तुरुंगातून बाहेर….
Shatrughan Sinha म्हणाले की, “सुनील दत्त माझ्या मोठा भावासारखे होते. त्याकाळी मुंबईत फार दंगली सुरु होत्या. तेव्हा मी आणि सुनील दत्त (Sunil Dutt) दंगलीचं ते वातावरण पार करत राजन लाल यांच्या घरी त्यांना भेटायला आणि गप्पा मारायला जात असायचो. एकीकडे दंगली सुरु होत्या तर दुसरीकडे तुरुंगात असलेल्या Sanjay Dutt ला बाहेर कसं काढायचं याचा आम्ही विचार करत होतो. आणि आमचं सौभाग्य होतं की या कठिण प्रसंगातून संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मदत केली. त्यांनी संजय दत्तसोबत आमची भेट घडवून दिली होती. त्यामुळे हे सांगणं अतिशयोक्ती नसेल की संजय दत्तच्या करिअरमध्ये आणि त्याला इतक्या मोठ्या संकटातून वाचवण्यात बाळासाहेब ठाकरेंचं खुप महत्वाचं योगदान आहे”. (Bollywood Update)

संजय दत्तला ढुंढते रह जाओगे असं टायटल लागू होतं
पुढे संजय दत्त जेलमधून बाहेर आल्यानंतरच्या आठवणींना उजाळा देत सिन्हा म्हणाले की, “ज्यावेळी संजय दत्त जेलमधून सुटून बाहेर आला त्यानंतर संजय माझ्या घरी आला आणि आम्ही सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मग आम्ही राजन लाल यांच्या घरी जाऊन खुपवेळा चर्चा करत बसलो. मात्र, त्यानंतर आम्ही संजय दत्तला भेटण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे त्याला ‘ढुंढते रह जाओगे’ असं टायटल लागू झालं आहे, पण याचा अर्थ असा नाही की तो चांगला मुलगा नाही आहे. नक्कीच काहीतरी कारण असेल ज्यामुळे त्याच्याशी आता संपर्क होऊ शकत नाहीये”. (Untold Stories)
======
हे देखील वाचा : Madhuri Dixit-Nene : सुपरस्टार असूनही माधुरीला का मिळायचा आईचा ओरडा?
======