Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Balraj Sahni : बलराज सहानी यांनी वाचवले मीना कुमारीचे प्राण!

 Balraj Sahni : बलराज सहानी यांनी वाचवले मीना कुमारीचे प्राण!
बात पुरानी बडी सुहानी

Balraj Sahni : बलराज सहानी यांनी वाचवले मीना कुमारीचे प्राण!

by धनंजय कुलकर्णी 22/01/2025

आमिर खान आणि राणी मुखर्जी यांचा ‘गुलाम’ हा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असेलच. या चित्रपटात सुरुवातीलाच एक चित्त थरारक प्रसंग होता. रेल्वेच्या रूळावरून समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावत जायचा हा एक डेंजर प्रसंग होता. आमिर खानने या प्रसंगात बाजी मारली होती. या सीनला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. पण असाच एक प्रसंग साठच्या दशकात देखील चित्रित केला होता. त्यात फरक फक्त एवढाच होता इथे (गुलाममध्ये) समोरून येणाऱ्या ट्रेनच्या दिशेने धावायचे होते तर तिथे रेल्वे ट्रॅकवरून धावायचे होते आणि मागून ट्रेन येते असा प्रसंग होता. (Balraj Sahni)

ख्यातनाम अभिनेते बलराज सहानी (Balraj Sahni) यांनी त्यांच्या आत्मकथेमध्ये या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन केले आहे आणि त्यांनी हा प्रसंग लिहिल्यानंतर, ”माझ्या हट्टापायी मी माझे स्वतःचे आणि एका अभिनेत्रीचे प्राण गमावणार होतो. पण सुदैवाने तो प्रसंग टळला आणि आम्ही दोघे वाचलो!!” कोणता होता तो प्रसंग? आणि कोणत्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ही घटना घडली होती? साठच्याच्या दशकामध्ये संगीतकार सलील चौधरी यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता. माझ्या माहितीनुसार त्यांनी दिग्दर्शित केलेला हा कदाचित एकमेव हिंदी चित्रपट होता.

चित्रपटाचे नाव होते ‘पिंजरे के पंछी’. या चित्रपटात बलराज सहानी आणि मीनाकुमारी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटातील एका प्रसंगांमध्ये मीना कुमारीला ट्रेनच्यासमोर आत्महत्या करायची होती त्यासाठी ती रुळावरून धावत असते आणि तिला आत्महत्यापासून प्रवृत्त करण्यासाठी बलराज सहानी मागे धावतो असा शॉट होता. दिग्दर्शक सुनील चौधरी यांनी मीना कुमारी आणि बलराज सहानी (Balraj Sahni) या दोघांनाही डुप्लिकेटचा वापर करून हे शूट करू असे सांगितले पण त्यावेळी बलराज सहानी वास्तववादी चित्रपट आणि वस्तुनिष्ठ भूमिका करण्यामध्ये वाकबगार होते. त्यांनी सांगितले. “आम्ही दोघेही पूर्ण काळजी घेऊ आणि स्वतःच हा शॉट देवू.”

सुनील चौधरी आणि इतर क्रू मेंबर्सनी त्यांना हर प्रकारे समजून सांगितले पण बलराज सहानी आणि मीना कुमारी आपल्या हट्टावर कायम होते. लोणावळा आणि खंडाळा याच्या दरम्यान या शॉटचे चित्रीकरण होणार होतं. गंमत म्हणजे आधी ट्रेन न येण्याच्या वेळात यांनी शूटिंग करायचे ठरवले. त्या पद्धतीने रिहर्सल झाली आणि शॉर्ट सुरू झाला. पण अचानक एक ट्रेन त्यांच्या पाठीमागून धडधड येताना जाणवली. आता मात्र दोघांची पाचावर धारणा झाली. मीना कुमारी तर पुरती घाबरली तिचे पाय लटपटू लागली. आपण रेल्वेच्या रूळावर पडतो की काय अशी तिला भीती वाटू लागली. रेल्वेच्या बाजूला खडी होती आणि उतार होता. बाजूला भरपूर झाडी होती. मीनाकुमारी बिचारी भीतीने घामाघूम झाली पण तिच्या पाठीमागून येणाऱ्या बलराज सहानीने तो बाका प्रसंग ओळखला आणि त्याने त्वरेने मीना कुमारीला आपल्या हाताने बाजूला ढकलले आणि स्वतः (Balraj Sahni) देखील बाजूला उडी मारली!! काही क्षणाचा अवकाश पाठीमागून ती  ट्रेन धाड धाड निघून गेली. (Untold stories)

ड्रायव्हरला देखील आश्चर्य वाटले कारण त्याने बऱ्याचदा बेल शिट्टी वाजवून त्यांना सावध केले होते. ऐनवेळेला गाडी इमर्जन्सी ब्रेक दाबणे म्हणजे घाटामध्ये मोठ्या संकटाला आमंत्रण करण्यासाठी होते. त्यामुळे हा मोठा बाका प्रसंग होता पण तो टळला. शूटिंग पॅकअप झालं. सुनील चौधरी यांनी सुटकेचा विश्वास टाकला. सर्व क्रू मेंबर्स यांच्या भांड्यात जीव पडला. हॉटेलवर गेल्यानंतर बलराज सहानी (Balraj Sahni) ने सगळ्या क्रू मेंबर्सची आणि विशेषत: मीना कुमारीची माफी मागितली. “माझ्या हट्टा खातर हा प्रसंग चित्रित करायला मी भाग पाडलं. याचा त्यांना पश्चाताप होत आहे. मला माफ करा.”

दोघांच्या ही पायाला आणि हाताला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. बलराज सहानी (Balraj Sahni) यांनी त्यांच्या ‘मेरी आत्मकथा’ या आत्मचरित्रात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. त्यात त्यांनी असे लिहिले आहे, ”जर काही मिनिटांचा फेरफार झाला असता तर कदाचित मीना कुमारी आणि मी दोघेही पुन्हा कुणाला दिसलो नसतो!” ‘पिंजरे के पंछी’ हा पिक्चर सुपरफ्लॉप झाला त्यामुळे या प्रसंगाची फारशी चर्चा झाली नाही. पण हा चित्रपट आणखी एका कारणामुळे लक्षात राहिला.

===============

हे देखील वाचा : Dilip Kumar : दिलीप कुमार यांचा ‘काला आदमी’ हा सिनेमा का बनला नाही?

===============

मीना कुमारी आणि कमाल अमरोही यांच्यामुळे. कारण याच सिनेमाच्या सेटवर कमाल अमरोही यांचे सहाय्यक अली बकर मीना कुमारीवर पाळत ठेवण्यासाठी येत असत. त्यांचा संशय असा होता मीना कुमारीला गीतकार गुलजार चोरून भेटायला सिनेमाच्या सेटवर येतात. एकदा गुलजार सेटवर आले असताना अलीबकर आणि मीना कुमारी यांच्यात जोरदार भांडण झालं. असे म्हणतात थोडीशी बाचाबाची देखील झाली. पण या प्रसंगानतर मीना कुमारीने कमाल अमरोही यांच्या घरात पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथूनच ते खऱ्या अर्थाने सेपरेट झाले. १९६४ सालापासून मीना कुमारी अभिनेता विनोदवीर मेहमूद यांच्या घरी राहू लागली. मेहमूद यांनी मीना कुमारीची धाकटी बहीण हिच्याशी लग्न केले होते. (Entertainment mix masala)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor amir khan Balraj Sahni Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment ghulam meena kumari pinjre ke panchi rani mukharjee
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.