ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’ 12 वर्षांनंतर पून्हा प्रेक्षकांच्या भेटीला, दोन आठवड्यात केली कोटींची कमाई
गेल्या काही वर्षांत वर्षानुवर्षे जुने सिनेमे पुन्हा चित्रपटगृहात प्रदर्शित होताना पहायला मिळत आहेत. शाहरुख खान आणि काजोल स्टारर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे‘ गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईतील मराठा मंदिर या थिएटरमध्ये लावला जातो. त्याचबरोबर चित्रपटगृहमालक एकापाठोपाठ एक जुने सिनेमे पुन्हा प्रेक्षकांसाठी प्रदर्शित करत आहेत. यापूर्वी काही थिएटर मालकांनी सलमान खानचा गौरव हा चित्रपट ही पुन्हा प्रदर्शित केला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता नुकताच रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार‘ हा चित्रपटही पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.(Ranbir Kapoors Rockstar Movie)
काही आठवड्यांपूर्वी रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार‘ पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आणि रणबीर कपूरच्या या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद ही मिळताना दिसत आहे. चित्रपटाच्या कमाईत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. १२ वर्षांनंतरही २ आठवड्यांत ‘रॉकस्टार’ने बॉक्स ऑफिसवर तब्बल १.१० कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे चित्रपटगृह मालक ही खूप खूश आहेत. जिथे नवे सिनेमे १ कोटी कमावण्यासाठी अनेक दिवस धडपडताना दिसतात हे चित्र उघड आहे. तर दुसरीकडे 12 वर्षे जुना हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. मात्र, चित्रपटगृह मालकांनी आतापर्यंत या चित्रपटाच्या तिकिटाची किंमत कमी ठेवली आहे.
14 दिवसांत ‘रॉकस्टार’ला मोठ्या पडद्यावरतब्बल 1.10 लाख लोकांनी पाहिलं आहे. म्हणजेच गेल्या दोन आठवड्यांत या चित्रपटाची 1 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत.चित्रपटाला मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता चित्रपटगृह मालकांनी तिसऱ्या आठवड्यातही ‘रॉकस्टार‘ थिएटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्याच्या अखेरीस उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार‘ पीव्हीरिनॉक्समध्ये पाहायला मिळतो.(Ranbir Kapoors Rockstar Movie)
=============================
हे देखील वाचा: लग्नानंतर Munawar Faruqui चा पहिला फोटो आला समोर, पत्नी महजबीनचा हात पकडून कापला केक
=============================
रॉकस्टार हा २०११ साली प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून अभिनेता शम्मी कपूर ह्याच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे ए.आर. रहमानने दिलेले संगीत देखील खुप लोकप्रिय झाले होते.