Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Ahemdabad Airplane Crash :विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Banjara Marathi Movie: मैत्रीची आठवण करून देणार ‘होऊया रिचार्ज’ ‘बंजारा’तील जबरदस्त गाणे प्रदर्शित

 Banjara Marathi Movie: मैत्रीची आठवण करून देणार ‘होऊया रिचार्ज’ ‘बंजारा’तील जबरदस्त गाणे प्रदर्शित
Banjara Marathi Movie Song
मिक्स मसाला

Banjara Marathi Movie: मैत्रीची आठवण करून देणार ‘होऊया रिचार्ज’ ‘बंजारा’तील जबरदस्त गाणे प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 26/04/2025

Banjara Movie: वी. एस. प्रॉडक्शन्स निर्मित आणि मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत‘बंजारा’ हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. मैत्री आणि आत्मशोध यांचा सुंदर मेळ असणाऱ्या ‘बंजारा‘ या चित्रपटातील ‘होऊया रिचार्ज’ हे स्फूर्तिदायी गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून यामध्ये तीन मित्रांची मोटरसायकलवरील अनोखी सफर दाखवण्यात आली आहे.  बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक शान आणि अवधूत गुप्ते यांच्या कमाल आवाजातील या गाण्याला गुरू ठाकूर यांच्या शब्दांची आणि अवधूत गुप्ते यांच्या संगीताची जोड लाभली आहे.(Banjara Marathi Movie Song)

Banjara Marathi Movie Song
Banjara Marathi Movie Song

स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात मित्रांची धमाल दिसत असतानाच निसर्गसौंदर्यही अनुभवायला मिळत आहे. प्रत्येकाला आपल्या मैत्रीची आठवण करून देणारे हे गाणे पाहायला जितके सुखावह आहे तितकेच श्रवणीय आहे.दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात, ‘होऊया रिचार्ज’ या गाण्यात केवळ प्रवासच नाही तर आत्मशोध घेण्याची प्रेरणा देण्यात आली आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात जिथे आपण थोडे थांबून स्वतःकडे पाहाणे विसरतो, तिथे हे गाणे थोडे थांबायला आणि रिचार्ज व्हायला सांगते. गाणे तयार करताना प्रत्येक फ्रेममध्ये ती सफर जिवंत वाटावी, यासाठी खूप मेहनत घेतली आहे. हे गाणे ऐकून प्रेक्षकांना मित्रांसोबत असा एखादा प्रवास करावा, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. “

Banjara Marathi Movie Song
Banjara Marathi Movie Song

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, ” ‘होऊया रिचार्ज’ या गाण्यातून आम्हाला ऊर्जा आणि सकारात्मकता प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. काहींना हे गाणे नॉस्टॅलजिक बनवेल तर काहींना आपल्या मित्रांसोबत एखाद्या सहलीचे आयोजन करण्याची इच्छा निर्माण होईल. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा ‘बंजारा‘ असतो. फक्त त्याला याची जाणीव होणे गरजेचे आहे. असे म्हणतात, प्रवासात माणूस नव्याने सापडतो. हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटातून आणि गाण्यातून केला आहे. (Banjara Marathi Movie Song)

==================================

हे देखील वाचा: April May 99: बोमन इराणी यांच्या उपस्थितीत ‘एप्रिल मे ९९’ मधील ‘समर हॅालिडे’ गाणे लाँच…

===================================

‘बंजारा‘ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन निर्माती असून शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट १६ मे ला प्रदर्शित होत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aditya Dhanraj banjara marathi movie song Banjara Marathi Movie trailer bharat jadhav Entertainment Marathi Movie saksham kulkarni Sharad Ponkshe Sneh Ponkshe sunil barve
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.