Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

स्टार प्रवाहच्या ‘काजळमाया’ मालिकेत होणार ‘या’ सुप्रसिद्ध नायिकेची एंट्री !

Asambhav Movie Poster: प्रेम की सुड? रहस्यांनी भरलेला ‘असंभव’च्या पोस्टर्सने

एकेकाळी Oscars मध्ये पोहोचला होता, आता चालवतो रिक्षा!

Heer Ranjha या सिनेमाचे सर्व संवाद काव्यात्मक शैलीत (Poetic Form)

दिवाळीत Thama आणि प्रेमाची गोष्ट २ येणार आमने-सामने!

‘महाभारत’ मालिकेतील कर्ण काळाच्या पडद्याआड; अभिनेते Pankaj Dheer यांचा कॅन्सरने

Kantara 1 ओटीटीवर कधी येणार?

ManaChe Shlok चित्रपट अखेर नव्या नावासह पुन्हा होणार प्रदर्शित!

‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Makadchale Marathi Drama: बाल प्रेक्षकांना मनसोक्त आनंद देणाऱ्या ‘माकडचाळे’ नाट्याचा दिवाळीत शानदार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Banjara Marathi Movie Teaser: निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी….

 Banjara Marathi Movie Teaser: निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी….
Banjara Marathi Movie Teaser
मिक्स मसाला

Banjara Marathi Movie Teaser: निसर्गरम्य सिक्कीममध्ये उलगडणार तीन मित्रांची कहाणी….

by Team KalakrutiMedia 26/03/2025

Banjara Movie Teaser: मैत्री आणि आत्मशोधाचा अर्थ उलगडून भावनिक प्रवास घडवून आणणारा ‘बंजारा‘ चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. ‘बंजारा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील पहिलाच चित्रपट आहे, ज्याचे चित्रीकरण सिक्कीमसारख्या निसर्गरम्य ठिकाणी झाले आहे. सिक्कीमच्या १४ हजार फूट उंच पर्वतरांगांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले असून, हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक अनोखा अनुभव ठरणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांनी केले आहे. या चित्रपटात शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर रोहिणी विजयसिंह पटवर्धन आणि शरद पोंक्षे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.(Banjara Marathi Movie Teaser)

Banjara Marathi Movie Teaser
Banjara Marathi Movie Teaser

नुकत्याच झळकलेल्या टीझरमध्ये तीन मित्रांची मोटरसायकलवरून सुरू झालेली सफर पाहायला मिळत आहे. मात्र यात दोन वेगळ्या जनरेशन्सच्या मित्रांचे गट दिसत असून हे निश्चितच प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवणारे आहे. विशेष म्हणजे, शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे यांचा जबरदस्त ट्रेंडी लुक यात दिसत आहे. सिक्कीमच्या डोंगराळ भागात चित्रित झालेली ही कथा निसर्गप्रेमी आणि प्रवासप्रेमींना आकर्षित करणारी ठरेल. या मित्रांचा हा अनोखा प्रवास कसा त्यांच्या मैत्रीला एक वेगळी दिशा देणार, हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच समजेल.

Banjara Marathi Movie Teaser
Banjara Marathi Movie Teaser

निर्माते शरद पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा’ हा माझ्या अभिनय आणि निर्मिती कारकिर्दीतील एक विशेष टप्पा आहे. या चित्रपटात मैत्री आणि आत्मशोधाच्या प्रवासाला जे महत्त्व दिले आहे, ते प्रत्येकाला भावेल, असा विश्वास आहे. सिक्कीमच्या अप्रतिम लोकेशन्सवर शूटिंग करताना अनुभवलेले सुखद क्षण चित्रपटात तुम्हाला पडद्यावर नक्कीच अनुभवता येतील. ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी असून आयुष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देणारी ठरेल. कदाचित माझ्या वयाचे मित्र नॉस्टेल्जिक बनून अशा सहलीचे आयोजनही करतील.”

============================

हे देखील वाचा: Phule Movie Official Trailer: एका क्रांतिकारी युगपुरुषाचा गौरव ‘फुले’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

============================

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतात,” ‘बंजारा‘ ही केवळ प्रवासाची कथा नाही तर ती आपल्या आतल्या आत्म्याचा शोध घेण्याचा प्रवास आहे. या चित्रपटाद्वारे मी मैत्री, प्रेम, हरवलेले स्वप्न आणि नव्याने उलगडणारे जीवन यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेली ही कथा प्रेक्षकांना नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल, अशी आशा आहे. प्रत्येक पात्राच्या प्रवासात आपण स्वतःला कुठेतरी पाहू शकतो, हेच ‘बंजारा’चे वेगळेपण आहे. जीवनात अनेकदा थांबून स्वतःकडे पाहाण्याची गरज असते आणि हा चित्रपट त्याची आठवण करून देणारा आहे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Banjara Marathi Movie Teaser Banjara Marathi Movie trailer bharat jadhav Entertainment Marathi Movie Sharad Ponkshe Sneh Ponkshe Movie sunil barve
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.