Sushmita Sen to Raveena Tondon : ‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटींनी दत्तक
 
                          
         Salman Khan याच्या ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये बिग बींची एन्ट्री?
सलमान खान सध्या बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत आहे… एकीकडे त्याला पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे; तर दुसरीकडे त्याचा नवा कोरा चित्रपटही चर्चेत आहे… ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटानंतर आता सल्लू ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात झळकणार आहे… अशातच चित्रपटाचा दिग्दर्शक अपूर्व लाखियाने शेअर केलेल्या एका फोटोने चाहत्यांच्या मनात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोमध्ये अपूर्व लाखिया महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत दिसत असल्यामुळे आता सलमानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात बच्चन साहेबांची एन्ट्री होणार का? असा प्रस्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे… खरंच बिग बी चित्रपटात असणार की नाही जाणून घेऊयात..(Battle Of Galwan Movie)

तर, अपूर्व लाखिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की,“अंदाज लावा ते मला काय म्हणत आहेत. #LegendOnTheSetToday.” आणि अपूर्वच्या या एका पोस्टमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत… काही नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिलं आहे की, बिग बी या सिनेमात एक खास भूमिका साकारणार आहेत का? काही लोकांनी लिहिलं आहे की, हे खरोखर घडतंय का? सलमान खान आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकत्र दिसणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांनी विचारायला सुरवात केली.
दरम्यान, जर का ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात हे दोन्ही अभिनेते एकत्र दिसले तर हा सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांचा एकत्रित चौथा चित्रपट ठरेल. यापूर्वी दोघांनी ‘बागबान’, ‘बाबुल’ आणि ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटांमध्ये स्क्रिन शेअर केली होती.. एकत्र काम केलं होतं.. आहे. तसंच, ‘हॅलो ब्रदर’ चित्रपटात अमिताभ बच्चन हे फक्त देवाच्या आवाजात (कॅमियो) भूमिकेत होते. (Bollywood)

या चित्रपटातील आणखी एक मोठं सरप्राईज म्हणजे अभिनेता गोविंदा (Govinda). होय ! सलमान खान आणि गोविंदा तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करणार आहेत. या जोडगोळीने आधी २००७ मध्ये ‘पार्टनर’ आणि ‘सलाम-ए-इश्क’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं… तर, गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांचा ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट तुफान गाजला होता… आता ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात जर का सलमान खान, गोविंदा आणि अमिताभ बच्चन एकत्र दिसले तर प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे…
आता जरा चित्रपटाच्या कतेकडे वळूयात… ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचं कथानक सत्य घटनेवर आधारित आहे…लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या तणावपूर्ण संघर्षाने जगाचे लक्ष वेधलं होतं. या युद्धाची परिस्थिती हाताळण्यासाठी भारतीय सैन्याच्या १६ बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू होते…या संपूर्ण घटनेत भारतीय जवानांनी दाखवलेलं धैर्य आणि देशभक्तीची भावना विलक्षण होती…
================================
हे देखील वाचा : Kantara : The Legend-Chapter 1 मधील ‘तो’ म्हातारा कोण होता?
================================
‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात सलमान खान कर्नल संतोष बाबू यांची भूमिका साकारत असून, त्यांच्या शौर्य, नेतृत्व आणि त्यागाची गाथा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडली जाणार आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटात सलमान खानसह चित्रांगदा सिंग, अंकुर भाटिया, अभिलाष चौधरी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. शिवाय ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये खरंच बिग बींची एन्ट्री झाली तर बॉलिवूडच्या इतिहास पहिल्यांदाच अनपेक्षित मल्टीस्टारकास्ट दिसेल हे मात्र नक्की..
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
