Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mehmood : फिर वही शाम वही गम वही तन्हाई है…..

Chhaava चित्रपटातील काढून टाकलेला ‘तो’ सीन आला समोर!

Shah Ruk Khan : “राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी एक हात…”

Jolly LLB 3 : अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो!

‘ठरलं तर मग’ मध्ये पूर्णा आजीची भूमिका रिप्लेस होणार का?

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

Ramayana :  ‘ओटीटी किंग’ साकारणार सुग्रीवाची भूमिका!

War 2 Or Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली माजी?

‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!

Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘या’ कारणामुळे मुमताजने मर्सिडीजची चावी अमिताभला दिली !

 ‘या’ कारणामुळे मुमताजने मर्सिडीजची चावी अमिताभला दिली !
बात पुरानी बडी सुहानी

‘या’ कारणामुळे मुमताजने मर्सिडीजची चावी अमिताभला दिली !

by धनंजय कुलकर्णी 19/10/2023

अमिताभ बच्चन यांच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंग काळातील हा किस्सा आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये याचा उल्लेख  होता. अमिताभ बच्चन अत्यंत कल्चर्ड अभिनेते आहेत हे त्यांनी वारंवार सिद्ध केले आहे. कृतज्ञता व्यक्त करताना ते मोठ्या खुल्या दिलाने ती गोष्ट सांगत असतात. हा किस्सा आपल्याला त्याचाच प्रत्यय देतो. त्यावेळी म्हणजे १९७१ साली अमिताभ ओ पी रल्हन यांच्या ‘बंधे हाथ’ या चित्रपटात भूमिका करत होते.  अमिताभ बच्चन यांचा डबल रोल असलेला हा पहिला चित्रपट होता. यात त्यांची एक नायिका मुमताज होती. ( आणि दुसरी होती कुमुद छूगानी!) त्यावेळी अमिताभचा स्ट्रगल चालू होता. एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप होत होते. भविष्य अंधकार मय होते. या काळात त्याच्याकडे फियाटची जुनी सेकंड हॅन्ड गाडी होती.अत्यंत मोडकळीस आलेली हे डबडा गाडी होती. खूप आवाज करत असे. चित्रपटाची नायिका मुमताज तेव्हा टॉप मोस्ट एक्ट्रेस होती. तिच्याकडे शानदार मर्सिडीज बेंझ होती. अमिताभ रोज तिच्या मर्सिडीजकडे मोठ्या कौतुकाने पाहत असे आणि तिला म्हणत असे,” एक दिवस मी देखील अशीच मर्सिडीज घेणार आहे!” पण व्यावसायिक यश त्याचे हे स्वप्न पूर्ण करत नव्हते. अमिताभ खूप स्वाभिमानी होता. मित्रांकडून किंवा कुटुंबाकडून पैसे घेऊन महागडी गाडी घेणे त्याच्या तत्वात बसत नव्हते.(Mumtaz) 

शूटिंगच्या दरम्यान मुमताज (Mumtaz) आणि अमिताभ खूप गप्पा मारत असत. त्यांच्यात चांगली मैत्री देखील झाली होती. अमिताभ कायम आपले पुढचे प्लॅन सांगत. यांची मैत्री आजही अबाधित आहे पण ‘बंधे हाथ’ या दोघांचा हा एकमेव चित्रपट ठरला. शूटिंग झाल्यानंतर दोघेही आपापल्या गाडीतून सेट वरून निघून जात. त्यावेळी जाताना पुन्हा एकदा मुमताजच्या ‘मर्सिडीज’ गाडीकडे कौतुकाने पाहत असे. अमिताभच्या भावना मुमताज ओळखत होती. एक दिवस शूटिंग झाल्यानंतर अमिताभ पार्किंगकडे गेला. तिथे त्याला त्याची फियाट गाडी दिसली नाही. त्यांनी इकडे तिकडे पाहत असतानाच मुमताजच्या गाडीचा ड्रायव्हर तिथे आला आणि तो अमिताभला  म्हणाला,” आपकी गाडी मॅडम जी ले कर गई है और उनकी गाडी की चाबी आपको दी है!” असे म्हणून त्याने मर्सिडीज गाडीची चावी अमिताभला दिली. ड्रायवरने अमिताभला सांगितले,” मॅडमने या विक एंडसाठी  गाडी वापरायला दिली आहे.” अमिताभसाठी तो खूप आनंदाचा क्षण होता. जी गाडी रोज तो पाहत होता ती गाडी आज त्याला चालवायला मिळणार होती. अमिताभचे एक स्वप्न मुमताजने एका विक एंड पुरते का होईना पूर्ण केले होते. अमिताभने आयुष्यात पुढे अनेक गाड्या घेतल्या पण मुमताच्या मर्सिडीजने त्याला जो आनंद दिला तो कायम त्याच्या स्मरणात राहिला. (Mumtaz)

जाता जाता थोडंसं ‘बंधे हाथ’ या चित्रपटाबद्दल. खरंतर हा एक cult classic चित्रपट आहे. पण त्या काळात सुपर फ्लॉप ठरला. आज जेव्हा हा चित्रपट आपण पाहतो त्यावेळी तो नक्कीच आपल्याला आवडतो. या चित्रपटात अमिताभचा डबल रोल होता. चित्रपटाचे दिग्दर्शन ओ पी गोयल यांनी केले असले तरी सर्वजण सांगतात की, या चित्रपटातील ओ पी रल्हन केले  होते. हा चित्रपट त्यांनीच पंधरा वर्षांपूर्वी बनवलेल्या एका सिनेमाचा रिमेक होता. शम्मी कपूर आणि रागिनी यांना घेऊन १९५८ साली ओ पी रल्हन यांनी ‘मुजरिम’ हा चित्रपट बनवला होता. त्याचाच रिमेक होता ‘बंधे हाथ’. (Mumtaz)

========

हे देखील वाचा : ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन

========

या चित्रपटाला संगीत आरडी बर्मन यांचे होते. हा सिनेमा १६ फेब्रुवारी १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि सुपर फ्लॉप झाला. नंतर तीनच महिन्यानी म्हणजे ११ मे १९७३ रोजी ‘जंजीर’ हा अमिताभच्या सुपरस्टार पदाचा उदय करणारा सिनेमा रिलीज झाला आणि सुपर हिट ठरला. नंतर काही महिन्यांनी ओ पी रल्हन पुन्हा एकदा ‘बंधे हाथ’ रिलीज केला आता अमिताभच्या नावाची जादू प्रेक्षकांच्या लक्षात आली होती. आता मात्र या सिनेमाला लोकप्रियता मिळत गेली. नंतर सत्तर आणि ऐंशीच्या दशकात matinee शो मध्ये पुन्हा पुन्हा री रन हा सिनेमा येत होता आणि अमिताभचे चाहते पुन्हा पुन्हा हा सिनेमा पाहत होते!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Bollywood Bollywood Chitchat Celebrity Entertainment Featured Mumtaz
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.