Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!

 यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!
because-of-this-sridevi-and-aamir-khan-could-not-work-together-marathi-info
बात पुरानी बडी सुहानी

यामुळे श्रीदेवी आणि आमिर खान एकत्र काम करू शकले नाहीत!

by धनंजय कुलकर्णी 05/07/2023

आपल्याकडे हिंदी सिनेमात काही समज आहेत आणि ते पक्के आहेत. या समजूतीवर निर्माते इतकी चिकटून आहेत की, त्याच्या बाहेर पडायला तयारच नाही. अर्थात अलीकडे यात थोडे बदल दिसताहेत काही वर्षात तसे परिणाम दिसू लागलेले आहेत पण त्याचं प्रमाण थोडेसे कमीच आहे. आपल्याकडे हिंदी सिनेमांमध्ये नायक हा कायम नायिकेपेक्षा उंच असावा लागतो! कमी उंचीचा नायक आणि अधिक उंचीची नायिका असला प्रकार इथे कधी चालत नाही. त्यामुळेच समकालीन असून ही काही जोड्या जमू शकल्या नाहीत. त्यापैकी एक म्हणजे आमिर खान आणि श्रीदेवी. (Sridevi)

आमिर खान हिंदी सिनेमाच्या दुनियेत १९८४ साली होली या चित्रपटातून त्याच्या एक वर्ष आधी श्रीदेवीचा (Sridevi) पहिला चित्रपट ‘हिम्मतवाला’ प्रदर्शित होऊन सुपर हिट झाला होता. परंतु पहिले पाच सहा वर्ष आमिर खान सिनेमाच्या इतर गोष्टींच्या अभ्यासात बिझी असल्यामुळे त्याचा नायक म्हणून पहिला फुलफ्लेज सिनेमा ‘कयामत से कयामत तक’ १९८८ साली आला. तो पर्यंत श्रीदेवी (Sridevi) सुपरस्टार बनली होती. प्रत्येकजण तिच्यासोबत काम करायला उत्सुक होता. मागच्या पिढीच्या धर्मेंद्र, अमिताभ, राजेश खन्ना, जितेंद्र सोबतच ऋषी कपूर, राजबब्बर, कुणाल गोस्वामी, सनी देओल, संजय दत्त हे सुद्धा तिचे नायक बनत होते. याचं कारण श्रीदेवीचा फॅन फॉलोअर संपूर्ण देशभर पसरला होता. श्रीदेवी (Sridevi) म्हणजे हमखास यश असं जणू सूत्रच तयार झालं होतं. त्यामुळे सहाजिकच प्रत्येक नायकाला तिच्यासोबत काम करायचं होतं. परंतु आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) यांनी एकत्रित एकही सिनेमा केला नाही याचं कारण होतं दोघांमधल्या उंचीतील जवळपास तीन साडेतीन इंचाच्या फरकाचे!  श्रीदेवीची उंची पाच फूट सहा इंच होती तर आमिर खानची उंची पाच फूट तीन-साडेतीन इंच आहे.  

या दोघांचे पहिले फोटोशूट १९८९ साली झाले. तेव्हा आमिर खानचा ‘कयामत से कयामत तक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि लोकप्रिय झाला होता. त्यामुळे सगळीकडे त्याची मोठी डिमांड होती. ‘मूव्ही’ या मॅगझिनचे संपादक दिनेश राहेजा यांनी या दोघांना घेऊन एक फोटोशूट करून आपल्या अंकाच्या मुखपृष्ठावर छापायचे ठरवले. त्या पद्धतीने या दोघांना एकत्रित आणले गेले. त्या दिवशी श्रीदेवी हाय हिलच्या सँडल्स म्हणून आली होती. आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) दोघे फोटोशूट साठी तयार झाले परंतु जेव्हा आमिर खानने बघितले की, श्रीदेवीची उंची आपल्यापेक्षा बरीच जास्त आहे त्यावेळेला तो खूप नर्व्हस  झाला. फोटोग्राफर, संपादक यांनी श्रीदेवीकडे (Sridevi) पाहिले तिने ताबडतोब ओळखले आणि आपल्या पायातील हाय हिल्स सँडल्स काढून टाकले आणि दोघे पुन्हा फोटोशूटला तयार झाले. पण तरीही श्रीदेवी जास्तच उंच दिसत होती. त्यामुळे पहिला फोटो श्रीदेवीला (Sridevi) उभा करून घेतला आणि तिच्याजवळ आमिर खान खाली बसलेला दिसला. यानंतरच्या फोटोशूटमध्ये श्रीदेवीने मॅच्युरिटी आणि प्रोफेशनलिझम दाखवत अशी पोस्ट दिली ज्यामध्ये आमिर खान तिच्यापेक्षा उंच दिसला. अशा पद्धतीने त्यांचे पहिले फोटोशूट पूर्ण झाले आणि हा फोटो ‘मूव्ही’ या मॅगझिनच्या कव्हर वर प्रकाशित झाला.

=======

हे देखील वाचा : शम्मीकपूरच्या एका धूनने बनले होते हे लोकप्रिय गीत!

=======

आमिर खानला श्रीदेवीचा (Sridevi) अभिनय प्रचंड आवडत होता. तिच्यासोबत एखादा तरी चित्रपट करावा असं त्याला कायम वाटत होतं. त्याने महेश भटकडे तसा हट्ट देखील धरून होता. ‘रोमन हॉलिडे’ या गाजलेल्या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक हिंदीत करावा असं त्याला वाटत होतं आणि या रिमेकमध्ये श्रीदेवीसोबत आपण भूमिका करावी अशी त्याची इच्छा होती. परंतु महेश भटने आमिर खानला सांगितले,” या रोमन हॉलिडेवर आपल्याकडे भरपूर हिंदी चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यातील एका चित्रपटात तू पूजा  भट सोबत काम देखील केलेले आहे. त्याचा दिग्दर्शक मी स्वतः होतो. चित्रपट होता ‘दिल है के मानता नही…’ “तरी आमिर खानला कथानकात काहीसे बदल करून चित्रपट करू असा आग्रह त्याने महेश भटकडे धरला होता. परंतु काही कारणाने तो योग जुळून आलाच नाही आणि आमिर खान आणि श्रीदेवी (Sridevi) यांनी कधीही एका चित्रपटात काम केले नाही. खरंतर आमिर खानचे समकालीन सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही श्रीदेवी सोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सलमान खानने श्रीदेवीसोबत (Sridevi) ‘चांद का टुकडा’ आणि ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात तर शाहरुख खानने श्रीदेवीसोबत ‘आर्मी’ या चित्रपटात भूमिका केली. परंतु आमिर खानला मात्र अशी संधी कधी मिळाली नाही याचे दुःख त्याला कायम वाटत राहिले. श्रीदेवीच्या निधनानंतर तिला श्रद्धांजली अर्पण करताना देखील त्याने या भावना व्यक्त केल्या होत्या.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan actor actress Bollywood bollywood update Celebrity Entertainment Featured Sridevi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.